दान एक रूपयाचे – पर्यावरण संवर्धनाचे

आपल्याला लेख, व्हिडीओ आवडल्यास आम्हाला किमान १ रूपया ते पुढील ऐच्छिक दान करा.


गच्चीवरची बाग ही पर्यावरण संवर्धन करणारी उद्मशीलता आहे. मार्च २०२२ मधे दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. एकादं बिज आकाशातून येवून मातीत पडावं. नि त्याला काळाने प्रतिकूलतेपासून झाकलं जावं. व योग्य वातावण मिळावं. त्याच कुणीतरी पालकत्व स्विकारावं या प्रमाणे गच्चीवरची बागेचे बिजाचे २००१ मधेच नाशिकच्या मातीत धुळपेरणी झाली. ते २०१३ पासून अंकुरल व रूजलं व त्याचं आम्ही पूर्णवेळ पालकत्व स्विकारले. याचे पूर्णवेळ पालकत्व स्विकारतांना पर्यावरण प्रेमीनी स्वागत केलं कारण लोकांच्या प्रश्नांना शंकाना कुणीतरी पूर्णवेळ उत्तर देणारं हवं होते. तर या बिजाने अंकुरण्यापासूनच नाशिककरांना आपलेसे केले. अंकुरण्यापासूनचा हा प्रवास आता रोपट्या पर्यंत म्हणजे दहाव्या वर्षात प्रदार्पण करत आहे. गच्चीवरची ऑरगॅनिक भाजीपाल्याची बागेचा डेमो प्रयोग, गच्चीवरची बाग एक्सटेंशन व व्हर्च्युअल प्रझेन्स या तिन ठिकाणी काम करतांना या रोपट्याला पाच फांद्या डवरल्या. त्या म्हणजे Grow, guide, Build, Products, Sales N Services…

हा सारा डोलारा आता बर्यापैकी बहरू लागला लागला. पण मध्यतंरी कोरोनाच्या वावटळीमधे कोडमडायला आलं होते. पण त्याला नाशिककरांनी, पर्यावरणप्रेमीनी जोर लावून तुटू दिलं नाही. खरं तर गच्चीवरची बाग हे पर्यावरण प्रदुर्षनाच्या सागरात आत्मशोधाला निघालेले जहाज आहे. त्याचा जाब विचारायला कुणीतरी असावं असा म्होरक्या मी आहे. पण याला पुढे नेण्याची, वल्हवण्याची ताकद लावणारे नाशिककर व पर्यावरण प्रेमी आहे. मी फक्त नाममात्र. खर श्रेय तुम्हा सगळ्याचे आहे.

कोरोना संकटात वाकलेल्या फांद्या तुटता तुटता वाचल्या पण जखमा अजून ओल्या आहेत. येत्या काही महिण्यात किंवा वर्षभरात त्या बर्या होतील. आम्ही तशी पावले उचलली आहेत. आम्ही नेहमी सांगत आलो की आम्ही बाय प्रोफेशन हे करत असलो तरी आमची पर्यावरण संवर्धनाची ही पॅशन (आस) आहे. आपल्याकडून सातत्याने वरील पाच फांद्याव्दारे सुर्यप्रकाश मिळत आहे. म्हणूनच तर जगण्यासाठी अन्न तयार होतेय.

यातील सर्वात महत्वाचा भाग आहे. लोकांना मार्गदर्शन Guide करणे होय. ते आम्ही युट्यूब ( Home Grow vegetable Services- गच्चीवरची बाग नाशिक) , कंन्टेन्ट ब्लॉग www.organic-vegetable-terrace-garden.com या व तसेच व्हाट्सअपच्या माध्यमांतून करत आहोत. होम कंपोस्टींग व घरी भाज्या उगवणे हे मुख्य काम आहे. त्या संदर्भात लोकांना वाचता येईल, डोळ्यांवर विश्वास बसेन असे काम उभे करत आहोत.

यातील सर्वात महत्वाचे म्हणजे कंन्टेन्ट ब्लॉगला दरवर्षी भेट देणार्या वाचकांची संख्या पन्नास हजाराच्या घरात पोहचली आहे. या वर पाचशे पेक्षा अधिक लेख व २५० पेक्षा व्हिडीओस आहेत. हे संकेतस्थळ चालविण्यासाठी वर्षाचा खर्च पंचवीस हजार आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपणास हा लेख, किंवा युट्यूबवरील व्हिडीओ आवड्यास आपण फक्त कमीत कमी एक रूपया व तेथून पुढे रक्कम तुमच्या ऐच्छिकतेनुसार डोनेट करावा. जेणेकरून आमचा उत्साह वाढेल. (वाचन अर्थात पर्यावरण दान कर्त्त्याची यादी आम्ही संकेतस्थळावर वेळोवेळी प्रकाशीत करणार आहोत.) तसेच त्यातून निर्माण होणारा पैसा हा संकेतस्थळ जिवंत (चालू वर्ष व पुढील वर्ष) रहाण्यासाठी वापरता येईल. तेव्हा कृपया हा लेख इतरांनाही पाठवा. त्यासाठी आमचे प्रयत्न वर दिलेल्या संकेतस्थळावर जावून तपासून शकता.

(सदर उपक्रम हा आपल्या पुढील पिढीसाठी आकार घेत आहे. कारण यात आरोग्य, पर्यावरण, सामाजिक प्रश्नावर काम करणारा आहे. तसेच जल, जंगल जमीन या विषयीच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. अशी सर्वव्यापी संकल्पना जगवणे, टिकवणे फक्त गावकरांच्या हाती आहे. कारण राव त्यांच्या पुढील पिढ्या मजबूत करण्यात गुल आहे. त्यामुळे रावं न करी ते गावकरी म्हणून जगनाथ्थाच्या हाती हा रथ सोपवत आहे. आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

सोबत QR कोड देत आहे. किंवा (9850569644 G Pay, Phone Pay) किंवा UPI id देत आहे.

तुम्ही यू ट्यूबवर आहात. आपली दर्शकांची संख्या वाढवायाचीय

व्हिडीओ चालला तर चांद तक नाही तर रात तक… अशी गंमत होते.
आपल्या यूट्यूबवरील दर्शकांची संख्या वाढवायची म्हणजे नव्याने यू ट्यूबवर येणार्या मंडळीसाठी हे मोठे आव्हान असते.


तुम्ही यू ट्यूबवर आहात. आपली दर्शकांची संख्या वाढवायाचीय,

How to increase subscribers & Viewers on YouTube Channel in Marathi

मग हे उपाय करून पहा..

आपल्या यूट्यूबवरील दर्शकांची संख्या वाढवायची म्हणजे नव्याने यू ट्यूबवर येणार्या मंडळीसाठी हे मोठे आव्हान असते. त्यातल्या त्यात आपल्याला आपला चॅनेल मॉनिटाईज (जाहिरातींचे पैशाच्या रूपात कमाई) करायचे असल्यास किमान एक हजार दर्शक व एका वर्षात ( कोणत्याही 365 दिवसात) दर्शकांनी चार हजार तास व्हिडीओ पाहणे गरजेच असते. हे करणे म्हणजे दिव्यच असते. कारण एकादा व्हिडीओ चालला तर चांद तक नाही तर रात तक… अशी गंमत होते.

अशा वेळेस आपल्याला वरील उदिष्ट्य साध्य करायचे असल्यास खालील गोष्टी करून पहा. आपल्याला त्याचाही नक्कीच फायदा होईल.

  • पहिले उदिष्ट हे एक हजार दर्शक मिळवण्याचे ठेवा. त्यासाठी आपल्याला छोटे छोटे व्हिडीओ संदेश देणारे बनवा. वीस सेंकदाचे व्हिडीओ हे मॉनिटाईज मधे म्हणजे कांऊटिगं हावर्स मधे पकडले जात नाही पण तुमचे दर्शक वाढवू शकता. कारण यावरच तुमचे दर्शक तुमच्या पुढील व्हिडीओला पहाण्यास उत्सुक होतात. ते त्यास सब्सक्राईब करतात.
  • नुसतेच छोटे व्हिडीओ बनवू नका. काही ठराविक कालाचेही व्हिडीओ बनवा.
  • तुमचे व्हीडीओ हे साधारण हजार दर्शकानी प्रत्येक व्हीडीओ पहावा असे अपेक्षीत धरले तर त्या प्रमाणात म्हणजे तुमच्याजवळील व्हिडीओची लांबी ही चाळीस तासांची तरी असावी. कारण नोंदवलेला प्रत्येक दर्शक हा तुमचे व्हीडिओ पाहिनच याची खात्री नसते. त्यातील काहीच जणांनी पाहतील असे गृहीत धरले तर तुमच्या व्हिडीओची लांबी वाढवणे गरजेचे ठरते.
  • यासाठी तुम्हाला एका ठराविक अंतराने व्हिडीओ अपलोड करणे गरजेचे ठरते.
  • आपल्याकडे कंटेट ब्लॉग असल्यास त्या लेखामधे आपले व्हिडिओ मर्ज करा. त्यावरूही तुमच्या चॅनेलचे दर्शक वाढीस मदत होते.
  • फेसबूक सारख्या पेजेसवर आपले व्हिडिओ शेड्यूल करा. म्हणजे ठराविक अंतराने ते दर्शकांपर्यंत पोहचू शकतील. व ते तुमच्या चॅनेल वर सभासदत्व घेतील.
  • आपले एकदा हजार दर्शक पूर्ण झाले की आपोआपोच आपले तास व दर्शकांची नोंदणी वाढीस लागते. पण येथे निवांत बसू नका. व्हिडीओ हे ठराविक अंतराने बनवणे व ते अपलोड करत राहणे फार गरजेचे असते. यामुळे तुमचे दर्शक हे चॅनेलला भेट देत राहतात. व्हिडीओ संगीतमय असल्यास ते त्यास पुन्हा पुन्हा पाहतात.
  • आपल्या सारखेच माहिती देणारी इतरांच्या चॅनेलवरील व्हिडीओ लाईक करा. त्यावर नोंदवलेल्या योग्य प्रतिक्रियांना लाईक्स करा.

ही माहिती वापरून पहा. आपले व्हिडीओचे दर्शक व संख्या वाढलेली नक्कीच दिसेल.

क्रिएटीव्ह मिडीया टीम, गच्चीवरची बाग, नाशिक.

Telegram वर गच्चीवरची बाग


गच्चीवरची बाग नाशिक
http://www.gacchivarchibaug.in
https://t.me/gbnashik

गच्चीवरची बाग नाशिक या उपक्रमाचे आपल्याला रोज अपडेट हवे असल्यास टेलिग्राम वरील वरील चैनल ला भेट द्या.

आणखी वाचा…

About Us…

गोगलगाय उपद्रवी किडा…

झा़डांचे टॉनिक जिवामृत

Not Only Consultancy …Much more

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…

गच्चीवरच्या बागेला खतपाणी…

ऑनलाईन खरेदी करा..

गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र

पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?

टेलेग्राम वर गच्चीवरची बाग..

बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…

कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी…

गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा

विकास पिडीया वर गच्चीवरची बाग

गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…

Personal Work & Profile

कार्यपरिचय

माझे स्वप्न…

Official page of G.B.


गच्चीवरची बाग like करा

आणखी वाचा…

About Us…

गोगलगाय उपद्रवी किडा…

झा़डांचे टॉनिक जिवामृत

Not Only Consultancy …Much more

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…

गच्चीवरच्या बागेला खतपाणी…

ऑनलाईन खरेदी करा..

गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र

पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?

टेलेग्राम वर गच्चीवरची बाग..

बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…

कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी…

गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा

विकास पिडीया वर गच्चीवरची बाग

गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…

Personal Work & Profile

कार्यपरिचय

माझे स्वप्न…

%d bloggers like this: