कृपया लेख वाचण्यासाठी थोडा वेळ द्या…

नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. आपल्याला माहितीच आहे की गच्चीवरची बाग हा पर्यावरण संवर्धन करणारा उपक्रम आहे. मी आपल्याला खास अशा एका विनंतीसाठी हा लेख लिहीत आहे. कृपया थोडा वेळ काढून हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.


नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. आपल्याला माहितीच आहे की गच्चीवरची बाग हा पर्यावरण संवर्धन करणारा उपक्रम आहे. मी आपल्याला खास अशा एका विनंतीसाठी हा लेख लिहीत आहे. कृपया थोडा वेळ काढून हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.

गच्चीवरची बाग नाशिक Grow, Guide, Build, Products, Sales N services या पाच विभागात काम करत आहे. (सध्या कोव्हीड १९ मुळे फक्त क्रं दोनचं काम Guide जोरात सुरू आहेत) तर लोकांना विविध माध्यमांव्दारे मार्गदर्शन करणे, त्यांचे शंका निरसन करणे, त्यांना घरी भाजीपाला उगवण्यासाठी व कचरा व्यवस्थापनासाठी प्रेरीत करणे हे काम सुरवातीपासूनच करत आहोत. पुढेही करत राहणार आहे.

विविध सोशल मिडीयावर लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत.  या माध्यमात You Tube हे व्यासपिठ सुध्दा येते. गच्चीवरची बाग विषयी काम सुरू झाले तेव्हां या माध्यमांकडे दुर्लक्ष झाले. अर्थात त्यातले काही कळत नाही, ते अवघड आहे, तांत्रिक साधनांची गरज असते. या मुळे त्यावर गच्चीवरची बाग विषयी व्हिडीओ टाकणे टाळत होतो. पण कोव्हीड १९ मुळे हाताशी वेळ मिळाला. तसेच जे टाळायचे होते ते करावेच लागले. म्हणजे यू ट्यूब चॅनलवर फिल्म विषयी शिकत, सवरत ते माध्मय लोकांपुढे न्यावे लागले. कारण लेख लिहणे हे सोपे व यात हातखंडा असला तरी लिखाण हे माध्यम सर्वांनाच आवडते असे नाही. पण यूट्यूब हे माध्यम सर्वांनाच आवडते.

या माध्यमाचे वैशिष्ट्य म्हणजे जितके लोक व्हिडीओ पाहतील त्यातून थेंब थेंब पैसे साचून पैशाच्या रूपात परतावा मिळतो. ( खरं तर पैशा पेक्षा ही प्रक्रिया एकदाची पूर्ण करणे गरजेचे आहे)आम्ही या माध्यमांवर काम करायला सुरवात केली. कारण यातून गच्चीवरची बाग या पर्यावरणीय उपक्रमाला आर्थिक हातभार लागेल म्हणून जानेवारी २०२१ पासून पूर्ण क्षमतेने सुरवात केली.  आता या कामाला नऊ महिने पूर्ण होताहेत.

या माध्यमातून पैसे मिळवायचे असतील तर काही अटी असतात. एक हजार सब्जक्राईबर पूर्ण होणे. तो आम्ही नुकताच पूर्ण केलाय. दुसरी अट असते. चार हजार तास पूर्ण करणे. त्यातील फक्त नऊ महिण्यात दीड हजार तास पूर्ण झाले आहे. येत्या शंभर दिवसात म्हणजे ३१ डिंसेंबर २०२१ पर्यंत अडीच हजार तास पूर्ण करायचे आहेत.

आणि त्यासाठी तुमची रोजच मदत लागणार आहे. कारण हे तीन महिण्यात पूर्ण झाले नाही तर पुन्हा नव्याने सुरवात करावी लागणार. आणि हे फार टफ वर्क आहे. त्यासाठी पुन्हा वेळ मिळणे कधीच शक्य होणार नाही.

हे अडीच हजार तास पूर्ण करण्यासाठी आपली पुढील प्रमाणे मदत हवी.

या यूट्यूब चॅनेलचे सब्सक्राईब्रर वाढीसाठी याचे सदसत्व घेणे.

Home Grow vegetable Services गच्चीवरची बाग, नाशिक व्दारे प्रकाशीत झालेले अथवा तुमच्या पर्यंत आलेले व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करणे,

व्हिडीओ खाली आपल्या प्रतिक्रिया देणे. (चांगली वाईट काही चालेल पण मनापासून द्या)

बरीच मडळी व्हाट्स अपवर प्रतिक्रिया नोदंवतात.

 या माध्यमांतून मिळणारी मदत ही पुढील कामासाठी वापरण्यात येणार आहे.

 • ई पुस्तके प्रिंन्ट स्वरूपात प्रकाशीत करणे
 • http://www.organic-vegetable –terrace-garden.com हे संकेतस्थळाचा खर्च (डोमेन नेम, होस्ट प्लेस, वाय फाय इ. खर्च भागवणे.) वर्षभऱाचा खर्च २५ हजार ईतका आहे. तो  आताच्या परिस्थिती पुढे नेणे अवघड खूपच अवघड झाले आहे.
 • फिल्म बनवण्यासाठी सध्या मित्राचा मोबाईल व कॅमेरा वापरतोय. तो स्वतःचा घेणे
 • एडिटिंग साठी लागमारे फिल्ममोरा सॉफ्टवेअर विकत घेणे.
 • ई पुस्तके प्रिंन्ट स्वरूपात प्रकाशीत करणे
 • http://www.organic-vegetable –terrace-garden.com हे संकेतस्थळाचा खर्च (डोमेन नेम, होस्ट प्लेस, वाय फाय इ. खर्च भागवणे.) वर्षभऱाचा खर्च २५ हजार ईतका आहे. तो  आताच्या परिस्थिती पुढे नेणे अवघड खूपच अवघड झाले आहे. पण हे संकेतस्थळ लोकांच्या पसंतीला उतरले आहे. तसेच खर्या अर्थाने मार्गदर्शक ठरत आहे.
 • फिल्म बनवण्यासाठी सध्या मित्राचा मोबाईल व कॅमेरा वापरतोय. तो स्वतःचा घेणे
 • एडिटिंग साठी लागमारे फिल्ममोरा सॉफ्टवेअर विकत घेणे.

गच्चीवरची बाग हा व्यावसायिकरित्या जरी चालवत असलो तरी त्यामागील खरे काम लोकांना शिक्षित करणे हाच आहे. व ते निशुल्क करत आहोत. खर ती आमची खाज (पॅशन) आहे. तिला जिवंत ठेवण्यासाठी प्लीज लेखात सांगितल्या प्रमाणे आमचा चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. हे फक्त ३१ डिंसेबंर २०२१ पर्यतंच करायचे आहे.

हे आता नाही तर कधीच होणार नाही. आणि आम्ही पण या माध्यमांवर पुन्हा काम करणार नाही असे ठरवले आहे. कारण यात तन,मन, धन सारेच गुंतवले आहे. याहून जास्त गुंतवणूक आता होणार नाही. कारण वाढत्या वयात दृष्टी अधू होत चाललीय. तासन तास संगणकावर बसणे त्रासदायक होत आहे.

तेव्हां हे सारे तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे.

कारण हे पर्यावऱण संवर्धनाचे काम आहे. कृपया लेखात सांगीतल्या प्रमाणे मदत करावी. किमान हा लेख तरी इतरांपर्यत पोहचवा. ही कळकळीची विनंती.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

घरच्या घरी फुलवा भाज्यांचा मळा

आपल्या कुटुंबापुरता भाजीपाला घराच्या गच्चीत उगवण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे, असे मत ‘गच्चीवरची बाग’चे संचालक संदीप चव्हाण यांनी केले आहे.


गच्चीवरची बाग |digi
 

घरच्या घरी फुलवा भाज्यांचा मळा

करोना काळात असे करा व्यवस्थापन

Gokul Pawar

Gokul Pawar

 

नाशिक |Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रे वाढत आहेत. लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, भाजीपाला सारखा हाताळू नये, भाजी घ्यायला एकदम गर्दी करू नये असे आवाहन यंत्रणा वारंवार करत आहे. आपल्या कुटुंबापुरता भाजीपाला घराच्या गच्चीत उगवण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे, असे मत ‘गच्चीवरची बाग’चे संचालक संदीप चव्हाण यांनी केले आहे.

सहज पिकवा भाज्या !

आता राज्यात ‘ अनलॉक महाराष्ट्र’ मोहीम सुरु झाली आहे. पण करोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा काळात संसर्गित भाज्या आपल्या घरी आल्या तर? किंवा आपण संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आलो तर? त्यापॆक्षा भाज्या घरीच उगवल्या तर? घरी भाज्या पिकवणे अवघड नाही. त्यासाठी माती, पालापाचोळा, कंपोस्ट खत अशी थोडीशी पूर्वतयारी करावी लागते. पावसाळा सुरु आहे. त्यामुळे पालापाचोळा मिळणे अवघड आहे. त्यामुळे सध्याच्या काळापुरते आवश्यक कंपोस्ट खत नर्सरीतून आणले तरी चालेल.

घराच्या बाल्कनी, खिडकी, गॅलरी, उपलब्ध वस्तू उदाहरणार्थ प्लास्टिक कापड, बादल्या, टब, गोणपाट, तेलाचे डबे, शीतपेयाच्या किंवा पाण्याच्या बाटल्या असल्या तरी त्यात तुम्ही भाज्या पिकवू शकता. तुमच्याकडे ४ इंच खोली असलेल्या सव्वा लिटर पाण्याच्या बाटल्या असली तरी त्यात सुद्धा अंबाडी, पालक, आंबटचुका अशा पालेभाज्या लावू शकता. चार बाटल्यांमध्ये पालेभाज्यांची रोपे लावली तर दोन जणांपुरती पालेभाजी सहज मिळते. १ फूट लांबीरुंदीच्या आणि ४ इंच खोल असलेल्या कुंडीत देखील दोन माणसांची पालेभाजी सहज उगवते असेहीते म्हणाले.

अशी करा कुंडी तयार !

तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनाच्या तळाशी नारळाच्या शेंड्या, त्यावर किचनवेस्ट/ पालापाचोळा दाबून भरा. थोडी माती टाका. झाली कुंडी तयार. एखाद्या कुंडीत झाडं नसेल तर त्यातील माती वापरा. बियाणे पेरा आणि साधारणतः महिनाभरात आपण उगवलेल्या भाज्या खायचा आनंद घ्या. लॉकडाऊनमुळे जो वेळ मिळाला आहे तो अधिकाधिक या आपल्या गच्चीवरच्या बागेसाठी द्या.

आपण गच्चीतल्या बागेत सर्वच भाज्या पिकवू शकतो. पालेभाज्या साधारणतः सव्वा महिन्यात तर कांदापात महिनाभरात येते. या रोपांना सतत उन्हाची गरज नसते. थोडे ऊन, थोडी सावली अशी जागा चालते. सकाळचे उब मिळाले तरी पुरते. खूप जास्त पाणी घातलेले चालत नाही. कीड दिसते आहे का याचे वारंवार निरीक्षण करावे लागते. तिचे नियंत्रण घरच्या घरी करता येते. देशी गायीचे गोमूत्र थोडेसे सौम्य करून, ते नसेल तर आंबट किंवा खराब ताक, हिंगाचे पाणी यांची पंधरा दिवसातून एकदा फवारणी केली तरी किडीचे नियंत्रण होते.

घरचे बियाणे !

बियाणे किंवा रोपे विकत मिळतात. पण तेव्ढ्यासाठीही बाहेर जायचे नसेल तर महिनाभरात भाज्या येतील अशा घरच्या बियाणांचा वापर करता येतो. मेथी, धने , मोहरी पेरा. थोडेफार पालकांचे बिज असेल तर पेरा. किंवा बाजारातून पालक जूडी मिळाल्यास पाने काढून त्याची खोडासहित लागवड करा. महिनाभरात पालक तयार होईल. कांदा, लसून लागवड करा. महिनाभरात कांद्यांची पात मिळेल.

तांदुळका, लाल माठ ही सहज येणारी वनस्पती आहे. थोडं बियाणं मिळालं, किंवा एकादे रोपे मिळाले तर ते वाढवा. गाजर, मुळा, बिट याचें खोड पुन्हा मातीत लावा. त्याच्या पानांपासून पराठे तयार करता येतात. मिरची, टोमॅटो, वांगी, बटाटे, वेलवर्गीय ( वाल, भोपळा, गिलके, दोडके, तोंडलीचा वेल ) यांची लागवड करा. घरच्या घरी भाज्या पिकवण्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा असे मला वाटते.

 

How can grow immunity power

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा लेख वाचाच.. सौदा फायदे का..


रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवाल…

vegies collage

Corona Virus या आजाराशी आपण सारेच लढत आहोत. योग्य ती काळजी घेत आहोत. मागील चार महिण्यापासून येत असलेल्या बातम्या, बरे झालेल्या रूग्णाचे अनुभव, डॉक्टारांचे प्रयत्न या सार्यातून काही उपचाराच्या पध्दतीत एक प्रकारचा Pattern दिसून येत आहे. या साथीच्या रोगावर काहीही रामबाम उपाय सध्या नाही. ज्या उपचाराच्या पध्दती आहेत त्या केवळ आपली प्रतिकार शक्ती वाढल्यानेच या आजाराची तिव्रता कमी शकतो किंवा त्याला आपण दूर ठेवू शकतो. तर आज आपल्या हाती शरिराची प्रतिकार शक्ती वाढवणे हे गरजेचे आहे.

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अनेक काढे, औषधे, पुरेशी झोप असे अनेक पर्याय आहेत. पण खरा मुद्दा आपण काय सेवन व कसे सेवन करत आहोत. हाच मुख्य गाभा आहे.

आपल्या जेवण हे चौरस आहार असावा. जेवणात असलेले पदार्थ, त्याची प्रक्रिया काय केली याला खूप महत्व आहे. जेवण व खाण्यातील पदार्थाचे प्रक्रिया करावयाचे अनेक प्रकार आहे.

 • शिजवलेले पदार्थः (भात, भाजी)
 • अर्धेशिजवलेले पदार्थ (पोळी, भाकरी,)
 • वाफवलेले पदार्थ ( कंदमुळे, भाज्या)
 • आहे तसे (कच्चे) पदार्थ (फळे, कंदमुळे)
 • तळलेले पदार्थ (भजी, वेफर्स)
 • भाजून खाण्याचे पदार्थ (कंदमुळ, वांगी, बटाटे)
 • अंबवलेले पदार्थ (इडली, मेदूवडा)
 • तव्यावर किंवा कढईत परतवलेले पदार्थ (कारले, वांगेची काप)
 • पातळ कच्चे द्रव्य (फळांचा ज्यूस, गव्हांकुर,)
 • पातळ गरम द्रव्य (टोमॅटो, फुलकोबीच्या पानांचे सूप, विविध काढे)
 • भिजवलेले वा मोड आलेले पदार्थ- कडधान्य़, तेलबिया.
 • अंकूरीत पदार्थ
 • दूग्ध जन्य पदार्थ (दूध, दही, खोबर्याचे दूध)
 • पारंपरिक फास्ट फूड (मुरमुरे, फुटाणे, लाहया)
 • ड्रिहायड्रेड केलेल्या भाज्या… वाळवणांचे पदार्थ..

यातील आपल्या रोजच्या आहात काय काय असते याचा विचार करण्याची आज गरज आहे.

काही सुत्र दतो…

 • शरिराला रोज षड रसांची गरज असते.
 • सर्व भाज्यांची एकत्र भाजी करून खाव्यात. गणेश उत्सवात २१ भाज्यांचा प्रसाद खातो. त्या प्रसादामागे नेमके काय सुत्र असावे याचा सुक्ष्म अभ्यास केला असता सहज येईल की त्यातून षढ रस आपल्या शरिराला मिळते.
 • त्या घरीच उगवलेल्या असल्यास उत्तम म्हणजे कच्चे खाल्या तरी रसायनांचे सेवन टाळता येईल. आजारांना दूर ठेवता येईल. भाज्या कच्च्या खाव्यात. एकदा थायंलडला मुक्कामी असतांना तेथे वांग्याचे काम सलाड म्हणून देत असतं. खूप नवल वाटले. हे असे खातात. पण तेथे खाऊन पाहिले. खूप छान लागते.
 • बरेचदा मंडळी हायड्रोफोनिक्स पध्दतीने उगवलेल्या भाज्या खातात. पण पंचमहाभूंतानी निर्मीत झालेला झाडपालाच आपल्यात रोगप्रतिकार शक्ती निर्माण करू शकतो.

आपल्याकडे पदार्थांच्या खूप सारी विवधता आहे. त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते. प्रत्येक घरातील स्वंयपाक घर हे खरे तर औषधाचा खजिना आहे. जो हजारो वर्षापासून त्याची परंपरा टिकून आहे. त्याला आता जाणीव पूर्वक पून्हा जोपसले पाहिजे.

शिजवलेले अन्न हे पूर्णतः वर्ज नाही. पण आहारात शिजवलले अन्नच असावे असेही नाही. ते कमीत कमी प्रक्रिया झालेले असावे. फास्ट फूड, हॉटेलचे पदार्थ हे अधिक वेळ शिजवलेले असते. शिजवल्यानंतही अधिक काळ संग्रहीत केलेले असते. त्यावर असंख्य अशा प्रक्रिया झालेल्या असतात. असे प्रोसेड्ड फूड टाळलेले उत्तम..

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644, 8087475242

Garlic, jaggery, water , Homemade medicine in Covid-19

हे आपण करून पाहिले का?
लेख काळजी पूर्वक वाचा… हे तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला फायदयाचे ठरू शकेन. COVID-19 दरम्यान प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी व ताप, सर्दी, कफ खोकला वरील घगगुती प्रयोग आपण करून पहा…


health-benefits-of-garlic-main-image-700-350

Experiment: Growth resistance power Garlic, jaggery, water , Homemade medicine in Covid-19

लेख काळजी पूर्वक वाचा… हे तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला फायदयाचे ठरू शकेन.

कोरोना मुळे लॉकडाऊन सुरू झाले नि आपल्याच घरी आपण कैद करून घेतले. तॉ इतारांच्या संपर्कात न येण हाच त्यावर एक उपाय होता व आहे. मनाचे स्वास्थ जपण्यासाठी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतूवून घेणे हा मात्रा रामबाण उपाय ठरला. ह झाले मनाचे पण शरिराचे काय.. म्हणून आपल्याला खोकला, सर्दी, ताप येवू देवू नये म्हणून काय करता येईल याचा विचार केला. त्यावर घरगुती औषध काय करावं याचा प्रयत्न केला. या आधि ताप, सर्दी, कफ, खोकलावर घरच्या घरी उपचार केलेच होते. बाजाराती उठसूठ प्रतिजैविके ( Antibiotics) घेणे मी बर्याच अंशी टाळत असतो. त्यामुळे ताप, सर्दी, कफ, खोकला ( तासकखो) नियंत्रणाबाबत अनुभव गाठीशी होता.

पण हे आता निकराने टाळले पाहिजे शिवाय प्रतिकार शक्ती वाढवणे ही गरजेचे होते. म्हणून प्रतिकार शक्ती वाढावी, घसा स्वच्छ रहावा म्हणून रात्री लसूण खाऊन पाहिला. त्यावर पाणी पिऊन झोपलो. सकाळी घसा तर खाकरणे बंद झालेच. मग हा प्रयोग रोज रात्री करू लागलो. पण खरच एका लसणाने फरक पडेल का म्हणून चार पाच लसणाच्या पाकळ्या खाल्या. पण लसून खूपच तिखट लागला. म्हणून त्यासोबत एका रात्री गुळाचा खडा खाऊन पाहिला. तसाच दुसरा विचार म्हणजे लसणाच्या गुणधर्माला गुळ हा अनेक पटीने वाढवतो. म्हणून लसूण गुळ व त्यावर पाणी पिऊन पिलो. त्या रात्री खूपच छान झोप लागली. शरिर ताजेतवाणे झाले. मग काय.. रोजच हा प्रयोग रात्री सुरू झाला. एकदा भर दुपारी जेवण झाल्या नंतर हाच प्रयोग केला. त्या दुपारीपण पण छान झोप लागली. लसूण- गुळ खाल्या नंतर असे लश्रात आले की झोप तर लागतेच पण मेंदुही स्थिर राहतो. चिडचिड झाली नाही. मग काय रोज दुपार रात्री जेवणानंतर लसून-गुळ खाऊन पाणी पिऊ लागलो. मागील लॉकडाऊनच्या काळात एकही शिकं आली नाही. ताप, सर्दी, कफ, खोकला झाला नाही.

मला असे वाटते कदाचित हा प्रयोग आपल्या आर्युवेदामधेही असेनही. पण तो अपघाताने त्याचा पुन्हा प्रयोग केला. आपणही हा प्रयोग करून पहा. लसणाचा तोंडाला दुर्गंध येईन. पण गुळ पाणी सेवनाने हा गंध कमी होतो. तसेही तोडांवर मास्क लावल्यामुळे व कोरानामुळे आपल्याजवळ घरच्या व्यक्तिरिक्त कोणा फिरकत नाही. हा प्रयोग आपणही करून पहा. आपल्यालाही त्याचा काही प्रत्यय काय येतो तो कळवा.

टीपः ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी हा प्रयोग जपून करावा… तसेच हा प्रयोग माझ्या वैयक्तिक पातळीवर केला आहे. त्यातून कोणताही अफवेचा प्रयत्न नाही. फक्त माझा अनुभव येथे मांडतो आहे. पटलं तर घ्या. नाहीतर सोडून द्या..

कदाचित या प्रयोगाचा उल्लेख आयुर्वेदात असेनही. तोही कळवा किंवा हा प्रयोग नवीन असेन तर त्याचे विविध भाषेत भाषांतर करा. इतरांना पाठवा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.

Dr.Bagicha E-book

Dr. Bagicha… E book on Organic Vegetable Terrace Gardening… grow your Chemicale Free own food at your home


dr bagicha edited for saleघरच्या घरी भाजीपाला कशा उगवायाच्या याचे मागर्दशर्न करणारी पुस्तक थेट आपल्या मोबाईल व संगणकावर ई स्वरूपात…

गच्चीवरची  बाग व्दारे Dr. Bagicha हे ई-पुस्तक आपल्या हाती देतांना विशेष आनंद होत आहे. कोव्हीड- १९ या आजारामुळे lockdown झाले आहे. आपल्या प्रत्येकाच्या वेळ आहे. या काळात वेळ सत्कारणी लावण्याचे अनेक पर्याय हाताशी आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे घरीच विषमुक्त भाज्या उगवणे. त्यासाठी अनेक फोन येत आहेत. पण प्रत्यक्ष रूपात आपल्याहाती छापिल पुस्तक पोहचवणे अवघड आहे. तसेच या काळात गच्चीवरची बाग उपक्रम आर्थिक दृष्टया अडचणीत आला आहे. त्यास हातभार लागावा म्हणून या पुस्तकाची निर्मिती केली आहे. वरील दोनही गरजा लक्षात घेवून Dr. Bagicha हे ई-पुस्तक तयार करण्यात आले आहे.

पुस्तकाचे पहिली पाच पाने पाठवत आहोत. ते वाचून आपण 9850569644 या क्रंमाकावर गुगल पे / Instamojo चा वापर  करू शकता. पुस्तकाच्या दुसर्या पानावर त्याचे सहभाग मुल्य नोंदवण्यास आले आहे. तसेच महत्वाची सुचना केली आहे. सहकार्याच्या अपेक्षेत..

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

सुरवातीचे पाच पाने मिळवा dr. bagicha E-book1-5 pages

Beyond Corona virus disease (COVID-19)

एक झेन कथा सांगतो. एक शिकला सवरलेला व्यक्ती एका गावात फिरायला जातो. तेथे त्याला एक व्यक्ती दुपारचे जेवण आटोपून मस्त झाडाच्या गार सावलीत निवांत झोपलेला असतो. हा पर्यटक त्याला काही शब्द सुनावतो. अरे झोपलास काय. काहीतरी काम कर, ज्ञान मिळव, उद्योग (उठाठेव) कर, पैसे कमव, विकएंड ला फिरायला जा, मस्त आराम कर. मग तो गावकरी म्हणाला तेच तर करतोय…


Beyond Corona virus disease (COVID-19)

कोरोना … जसे जसे दिवस पुढे सरकाताहेत तसे तशी अनामिक भिती वाढत चाललीय. कुठे तोंड काढायची (दाखवायची) सोय राहिली नाही. कुणाच्या संपर्कात न येणे हाच एक खबरदारीचा उपाय आहे. पण ज्याची प्रतिकार शक्ती (जो बलवान असणार तोच जगेल हा तर निसर्गाचा नव्हे जंगलाचा नियम आहे) तो जगेल हे मात्र नक्की.

कोरोना विषाणू बदद्ल विचार करतो तेव्हा.. त्या विषयीचे अनेक पदर डोळ्यासमोर उलगडतात. प्रगतशील, वैज्ञानिक पध्दतीने व गतीने वेगाने बदल घडवून आणलेला माणूस प्राण्यासमोर केवळ ईश्वराला, निसर्ग देवतेला आर्त प्रार्थना करण्याशिवाय काही हातात उरलेले नाही. असे मला प्रकर्षाने जाणवते. इतकी हताश वेळ आपल्या सर्वावर आली आहे. युध्दस्थिती भासावी असे वातावरण तयार झाले आहे. आहे त्या परिस्थीतीला निपटून काढण्याची, त्याला सामोरे जायावयाची आपले शाश्त्रज्ञ, डॉक्टर मंडळी, लष्कर, समाजसेवक तयार आहेतच. पण ही वेळ माणसावर का यावी हाच खरा प्रश्न आहे.

सारा खेळ हा जिवाणू विषाणूंचा आहे. माणसाने सुरक्षीत वाटावे म्हणून अगदी उत्क्रांतीपासून त्याने पृथ्वीतलावरचे डोळ्यांना दिसेल ते हिंस्त्र प्राणी संपवत आणली. अगदी सुरक्षेचे टोक म्हणून त्याने माणसांच्या आक्रमक टोळ्यांचा नाश करत आला आहे. करत चालला आहे. पण हे सारे करतांना त्याने जिवाणू विषाणूंच्या जगताला कुठेही धक्का लावला नव्हता. या आधी महामारी, प्लेग सारखे साथीचे आजार आलेत, ते नंतर ओळखीचे होते,त्याची कारण सापडलीत.  पण ती फक्त पुनर्रावृत्ती होती. त्यामुळे त्यावर मात करता आली. पण तो जसा प्रगत होत गेला, यांत्रीक होत गेला तेव्हा अनेक नवे आजार सामोरे येवू लागले आहे. कारण मानव प्राण्याने विकासाच्या, उपभोगाच्या, सुख, सुविधाच्या नावाखाली जिवाणू व विषाणूंच्या परिसंस्थेला लावलेला धक्का आहे. कारण जिवाणू व विषाणू हे अल्पायुषी असतात. प्राप्त प्रतिकुल अनुकुल परिस्थितीत स्वतःला ते सुप्तावस्थेत अथवा प्रगत बनवू शकतात.  तसेच ते एकमेंकाना पुरक व नियंत्रीत करत असतात. तसेच हवेतील शुध्दता, त्यातील प्राणवायू, निसर्ग, या नुसार ते केवळ जन्म मृत्यू होत नसतो तर त्यात उत्क्रांत अवस्थे सोबत नव जिवाची निर्मीतीही असते. आत मूळ प्रश्न उरतो अशा विषाणूंना मारक, नियंत्रण करणारे असे जिवाणू नाहीतच का… नक्कीच असावेत. पण आपण ज्या पध्दतीने आजचे जीवन जगत आहोत त्यात आपण अगदी निरंक, अगदी निर्जंतूकपणे राहण्याचा, स्वच्छतेचा फोबीया घेवून जे जगत आहोत, वेगवेगळी रसायने वापरत आहोत. अगदी मातीतले गांडूळे संपवून टाकली. ज्या हाड नसलेल्या कोवळा जिवाला निसर्गाने स्टोन क्रशरची यंत्रणा बहाल केली आहे. तो जे जे खातो त्याची माती होते. त्यांच्या संपण्यानेही मातीतील विषाणूंचे अस्तित्व वाढले.  त्यामुळे जिवाणूंच्या अभावामुळे म्हणा किंवा रसायनांच्या स्वभावामुळे मुळे विषाणूंना मारक असे जिवाणू संपवत चालले आहोत.  माणसाची मातीशी नाळ तुटलीय. जंगल व निसर्गाशी नातं तुटलं. पंच महाभूतासोबत सहवास संपलाय. सकाळच्या सुर्योदयाची कोवळी किरण विसरलोत. पानाचा स्पर्श विसरलो, फुलांचा गंध विसरलोत. मातीचा स्वाद विसरलोय. तो शहरातील कुबट खोल्यात निवास करू लागलाय. असो… जगणं व जीवन शैली बदलावयाची गरज निर्माण झाली आहे हे मात्र नक्की…

आपल्याकडे या पूर्वीही महामारी येवून गेलीय. त्यावरही लोकांना मात केलीच होती ना… तेव्हा मात करण्याच्या काय पध्दती वापरल्या होत्या… याचा आपण विचारच करत नाही. जे जे उपाय आहेत ते केलेच पाहिडे. आज गोमुत्रावर टिका होतेय. पण गोमुत्र मासिक पाळीच्या काळात, लांब खोल्याच्या,कोंदट, कुंबट खोल्यात शिपडले जायचे. कारण ते विषाणूमारक होते म्हणूनच ना.  मलाही गोमुत्राचा अनुभव आला की, बागेत कीड नियंत्रक म्हणून (नाशक नाही) गोमुत्र फवारणी केली तर आपली श्वसनप्रक्रीयेची खोली (डेप्थ) वाढते. खोल, गंभीर, भरपूर श्वास घ्यावसा वाटणे. यातच सारे काही आले. जिवामृत हे बागेत खत व की नियंत्रक म्हणून वापरतो. पण मेलेल्या उंदारावर, सडलेल्या कचर्यावर टाकली तर त्याचा दुर्गंध नाहीसा होता. एवढेच काय मुतार्यामधील अमोनियाचा गंध ही नाहिसा करण्याची ताकद त्यात आहे. अर्थात सबकुछ गोमुत्र असे मला म्हणावयाचे नाही. ( पूर्वीच्या शुध्दतेत व आजच्या शुध्दतेत प्रचंड फरक आहे. कारण केवळ खाणंच नाही तर त्याचा सहवास, निवास सारंच बदललय)

हजारो वर्षापासून माणूस शिकत आहे. अनुभवाचे ज्ञानात रूपांतर करत आहे. त्याचे अनुभव, ज्ञान हे पिढ्यान पिढ्या पुढे नेत गेले. पण गेल्या ६०-७० वर्षात जी काही शालेय शिक्षणातून विज्ञानाचा बाहू झाला. नव्या पिढीने मागील पिढ्यांच्या अनुभवाना, ज्ञानालाच नव्हे तर शहाणपणाला सरळ सरळ खोटे, चुकीचे ठरवले गेले. येथेच आपल्या (wisdom) शहाणपणाची गोची झालीय. ज्ञान मिळाले पण त्याचं समायोजन, त्याचा समनव्य जो साधला गेला पाहिजे होता ते दूर्दैवाने झाला नाही.  गेला साठ सत्तर वर्षाचा काळ आहे मागील पिढ्याचे शहाणपण व नविन शिकलेल्या पिढ्याचे ज्ञान, विज्ञान याची गुफंन, सांगड घालता आली नाही. अर्थात सारेच बरोबर होते व सारेच चुकीचे होते हे दोन टोकांचे म्हणणे चुकीचे आहे. बंद घड्याळ ही दिवासातून दोन वेळेस बरोबर वेळ दाखवते हेही विसरून चालणार नाही. हे सारे नितांत समजून घेत पुढे गेले पाहिजे. सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून भारतीय संस्कृती कडे पाहिले जाते. पण मागील दोन तीन पिढ्यांच्या कालावधीत ते नामशेष झालय.

कोणताही अभ्यास करायचा नाही. इंस्टंट प्रतिक्रीया द्यायची. मत नोदवायचे. मग ते महापुरूष असो की आपले काही सण, रितीरिवाज असो. स्वांतत्र्य, आधुनिकता, प्रागतिक, पुरोगामी, धर्म, जातीच्या नावाखाली सारेच धोपटायचे.इतके उधळ कसे.. माझा मुलगा जेव्हा ईतर धर्माबद्दल, महापुरूषाबद्दल टोकांचे मत व्यक्त करतो. तेव्हा मी त्याला नेहमी सांगतो तू किती अभ्यास केला.. महात्मा गांधी बद्दल, नथुराम गोडसे बद्दल, आंबेडकराबद्दल, बुध्द- ईस्लाम, हिंदू धर्माबद्दल किती माहित आहे.  याचा आधी अभ्यास कर, त्याचे दाखले शोध, त्याची कार्यकारण भाव शोध, ईतिहासाचा शोध घे. त्या त्या प्राप्त परीस्थितीत ते ते तेव्हा योग्य होते. असे उथळ बोलून प्रतिक्रीया देणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास होतो. कोणता प्रतंप्रधान चांगला, त्याला आरे कारे म्हणणे ही आपली लायकीच नाही… पहिल्यांदा तिथ पर्यंत पोहचता येते का… पोहचण्याची, बरोबरी करण्याची ताकद असेल तरच त्याबद्दल बोलता येईल. असो… हे फक्त माणूस प्राण्याच्य उथळ स्वरूपाचं उदाहरण आहे. जे आपण स्वतःच्या अनुभवावर थोडक्यात सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत असतो जो जिवनात सर्वत्र लागू पडतो.

देशी गायीला ३३ कोटी देव निवास करतात. देव ही संकल्पना मदत करणारी, उपकार करणारी, प्राण वाचवणारी असे आपण मानतो. तर थोड्या वेळासाठी देव म्हणजे जीव असा आपण लक्षात घेतला तर हे ३३ कोटी जीव (जिवाणू) निवास करतात. जे माणूसच नव्हे तर एकूण जल जंगल, जमीन, पशू, पक्षी यांना जगवणारे आहे.

मागे एक सत्यकथा वाचण्यात आली होती, अमेरिकेतीन कोणत्यातरी बेटावर असाच अनामिक आजार आला होता. त्या बेटावर ति लोक एका पाठोपाठ मरण पावली होती. त्याचा शोध घेतला तेव्हा त्यांना फक्त एक बेटावरंच कुटुंब जिवंत राहिल्याचा लक्षात आलं. तपास व अभ्यासाअंती असे लक्षात आले की त्यांच्या किचनमधे कांदा चिरून ठेवला होता. त्यामुळे तेथे आजार पसरला नव्हता. कांदा हा सुक्ष्म जिवांना आकर्षीत करत असतो. त्या चिरलेल्या कांद्यावर त्या विशिष्ट विषाणूं आढळून आले होते.

या जगात कोणतेही सजिव प्राणी नाही राहिला तरी जिवाणू, विषाणूंची दुनिया कायम राहणार आहे. घडणार बिघडणार आहे. फक्त आपल्या हातात हेच आहे की हे किती बिघडवायचे किती घडवायचे.. किती विकासाच्या, आधुनिक, आरामच्या, श्रम शुन्य जगण्याच्या आहारी जायचे.

एक झेन कथा सांगतो. एक शिकला सवरलेला व्यक्ती एका गावात फिरायला जातो. तेथे त्याला एक व्यक्ती दुपारचे जेवण आटोपून मस्त झाडाच्या गार सावलीत निवांत झोपलेला असतो. हा पर्यटक त्याला काही शब्द सुनावतो. अरे झोपलास काय. काहीतरी काम कर, ज्ञान मिळव, उद्योग (उठाठेव) कर, पैसे कमव, विकएंड ला फिरायला जा, मस्त आराम कर. मग तो गावकरी म्हणाला तेच तर करतोय…

हा निवांतपणा आपल्या आयुष्यात आहे का?  हा निवांतपणा तोही एकांतात अनुभवावा म्हणून कोरोना आपल्या सर्वाच्याच वाटेल्या आला आहे हे मात्र नक्की… त्या निमित्ताने का होईना… हा या धर्माचा, जातीचा, पक्षाचा. गरीब, श्रीमंत, स्त्री पुरूष, मित्र, शत्रु सारे सारे पाश गळून पडावेत, सर्वांनाच जगण्याच सुख वाटेला याव, नि माणूस म्हणून आपण पुढे जावे, हीच ईश्वर ( ते ही आपण वाटे पाडून घेतलेल्या) चरणी प्रार्थना करू शकतो.

सदर लेखातून कोणत्याही उपचार पध्दतीचा दावा करत नाही.. हे चिंतन आहे. विविधअंगाने विचार करण्याची, त्याची अंमलबजावणी करण्याची प्रत्येकात क्षमता आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर पशू, पक्षी यांच्या वर्तनात काही बदल जाणवतोय का.. याचे निरिक्षण गरजेचे आहे. का हे फक्त माणसालाच भोवतय.  ते माणासालाच भोवणार असेन तर नक्कीच आपलीच चुक आहे. चुकत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.

%d bloggers like this: