रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवाल…
Corona Virus या आजाराशी आपण सारेच लढत आहोत. योग्य ती काळजी घेत आहोत. मागील चार महिण्यापासून येत असलेल्या बातम्या, बरे झालेल्या रूग्णाचे अनुभव, डॉक्टारांचे प्रयत्न या सार्यातून काही उपचाराच्या पध्दतीत एक प्रकारचा Pattern दिसून येत आहे. या साथीच्या रोगावर काहीही रामबाम उपाय सध्या नाही. ज्या उपचाराच्या पध्दती आहेत त्या केवळ आपली प्रतिकार शक्ती वाढल्यानेच या आजाराची तिव्रता कमी शकतो किंवा त्याला आपण दूर ठेवू शकतो. तर आज आपल्या हाती शरिराची प्रतिकार शक्ती वाढवणे हे गरजेचे आहे.
प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अनेक काढे, औषधे, पुरेशी झोप असे अनेक पर्याय आहेत. पण खरा मुद्दा आपण काय सेवन व कसे सेवन करत आहोत. हाच मुख्य गाभा आहे.
आपल्या जेवण हे चौरस आहार असावा. जेवणात असलेले पदार्थ, त्याची प्रक्रिया काय केली याला खूप महत्व आहे. जेवण व खाण्यातील पदार्थाचे प्रक्रिया करावयाचे अनेक प्रकार आहे.
- शिजवलेले पदार्थः (भात, भाजी)
- अर्धेशिजवलेले पदार्थ (पोळी, भाकरी,)
- वाफवलेले पदार्थ ( कंदमुळे, भाज्या)
- आहे तसे (कच्चे) पदार्थ (फळे, कंदमुळे)
- तळलेले पदार्थ (भजी, वेफर्स)
- भाजून खाण्याचे पदार्थ (कंदमुळ, वांगी, बटाटे)
- अंबवलेले पदार्थ (इडली, मेदूवडा)
- तव्यावर किंवा कढईत परतवलेले पदार्थ (कारले, वांगेची काप)
- पातळ कच्चे द्रव्य (फळांचा ज्यूस, गव्हांकुर,)
- पातळ गरम द्रव्य (टोमॅटो, फुलकोबीच्या पानांचे सूप, विविध काढे)
- भिजवलेले वा मोड आलेले पदार्थ- कडधान्य़, तेलबिया.
- अंकूरीत पदार्थ
- दूग्ध जन्य पदार्थ (दूध, दही, खोबर्याचे दूध)
- पारंपरिक फास्ट फूड (मुरमुरे, फुटाणे, लाहया)
- ड्रिहायड्रेड केलेल्या भाज्या… वाळवणांचे पदार्थ..
यातील आपल्या रोजच्या आहात काय काय असते याचा विचार करण्याची आज गरज आहे.
काही सुत्र दतो…
- शरिराला रोज षड रसांची गरज असते.
- सर्व भाज्यांची एकत्र भाजी करून खाव्यात. गणेश उत्सवात २१ भाज्यांचा प्रसाद खातो. त्या प्रसादामागे नेमके काय सुत्र असावे याचा सुक्ष्म अभ्यास केला असता सहज येईल की त्यातून षढ रस आपल्या शरिराला मिळते.
- त्या घरीच उगवलेल्या असल्यास उत्तम म्हणजे कच्चे खाल्या तरी रसायनांचे सेवन टाळता येईल. आजारांना दूर ठेवता येईल. भाज्या कच्च्या खाव्यात. एकदा थायंलडला मुक्कामी असतांना तेथे वांग्याचे काम सलाड म्हणून देत असतं. खूप नवल वाटले. हे असे खातात. पण तेथे खाऊन पाहिले. खूप छान लागते.
- बरेचदा मंडळी हायड्रोफोनिक्स पध्दतीने उगवलेल्या भाज्या खातात. पण पंचमहाभूंतानी निर्मीत झालेला झाडपालाच आपल्यात रोगप्रतिकार शक्ती निर्माण करू शकतो.
आपल्याकडे पदार्थांच्या खूप सारी विवधता आहे. त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते. प्रत्येक घरातील स्वंयपाक घर हे खरे तर औषधाचा खजिना आहे. जो हजारो वर्षापासून त्याची परंपरा टिकून आहे. त्याला आता जाणीव पूर्वक पून्हा जोपसले पाहिजे.
शिजवलेले अन्न हे पूर्णतः वर्ज नाही. पण आहारात शिजवलले अन्नच असावे असेही नाही. ते कमीत कमी प्रक्रिया झालेले असावे. फास्ट फूड, हॉटेलचे पदार्थ हे अधिक वेळ शिजवलेले असते. शिजवल्यानंतही अधिक काळ संग्रहीत केलेले असते. त्यावर असंख्य अशा प्रक्रिया झालेल्या असतात. असे प्रोसेड्ड फूड टाळलेले उत्तम..
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644, 8087475242
You must be logged in to post a comment.