Home composting and kitchen gardening workshop

विषमुक्त भाजीपाला ही काळाची गरज झाली आहे. योग्य पोषणाअभावी आधुनिक जगातील सुख सुविधा व आरोग्य सुविधा यांचा योग्य तो परिणाम यावा यावयास वेळ लागतो. रासायनिक भाजीपाला हा आरोग्याला घातकच आहे हे आता सर्वमान्य होत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रासायनिक भाज्यांना चवच नसते अशी चव हरवलेले आपण शहरातली माणसे हॉटेलचे जेवण जवळ करतात पण यातून योग्य पोषण मिळतच नाही. खरं पोषण आणि खरं खरी चव अनुभवायची असेल तर घरच्या घरी भाजीपाला पिकवणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. घरचा भाजीपाला म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोक्यात येतं की त्यात खूप खर्च लागेल पण हा केवळ गैरसमज असून आपण वेळ दिला, त्याचे विज्ञान, निसर्गचक्र समजून घेतलं तर सहजरीत्या घरच्या घरी भाजीपाला पिकवू शकतो आणि त्याचा जोडीला होम कंपोस्टिंग हे खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच गच्चीवरची बाग नाशिक व महाराष्ट्र टाइम्स नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मागील दोन वर्षातील ही चौथी कार्यशाळा संपन्न करत आहोत येत्या 6 ऑक्टोबर 2019 रविवार रोजी नाशिक येथे संपन्न होणार आहे. या कार्यशाळेत लोकसत्ता ह्या वर्तमानपत्रातील गच्चीवरची बाग या सदराचे व गच्चीवरची बाग पुस्तकाचे लेखक संदीप चव्हाण हे स्वतः स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळे नंतरही ही आपण त्यांच्याशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून भाजीपाला निर्मिती व कंपोस्टिंग साठीचे मार्गदर्शन मिळवू शकता. तर आपण सहकुटुंब सहभागी व्हावे या अपेक्षेने. http://www.gacchivarchibaug.in

9850569644/8087475242


Home composting and जे kitchen gardening workshop

Chemical free food is necessary of this era. Lack of proper & origin nutrition takes time to bring about the right effects of the well-being and health care of the modern world. It is becoming increasingly common that chemicals are dangerous to health, and most importantly, people in the city who miss the taste of chemicals have no taste, but they do not get proper nutrition. There is no choice but to cook homemade vegetables if you want to experience true nutrition and true taste.
Home vegetable said that it comes to our head for the first time, it will cost a lot, but it is only a misunderstanding and if we give the time, understanding the nature and nature of the cycle, we can easily grow vegetables in our house and home composting is very important for the couple. This is the fourth workshop in the last two years in collaboration with Maharashtra Times Nashik doing nuns.
It will be held on Sunday, October 6, 2019 in Nashik. The workshop will be directed by Sandip Chavan, author of the Gachivarchari Bagh column in the newspaper Lokasatta, and Sandeep Chavan, the author of the Gachchivar Bagh book. After the workshop you can also contact them through social media and get guidance on vegetable production and composting. So expect you to join a family.

http://www.gacchivarchibaug.in

9850569644/8087475242

By Gacchivarchi Baug Nashik

Grow, Guide, Build, Procuts. Sale N Services: hi, Welcome to My Grow Orgranic - Gacchivarchi baug Gardening Youtube Channel. i am sandeep chavan, Nashik Maharashtra. 23 years studied in grow organiclay in urban Farming n 13 years field experiece . Growing organiclay my Passion And profestion. terrace garden Expert, i am sharing here my work of vegetables Gardening Tips, Tricks n Ideas. You get all the helpful info on Urban Home Gardening, how to build a terrace vegetable garden, Kitchen garden in Hindi n marathi. vegetable gardening for beginners, gardening tips, how to Grow plants in a pot, bags, lands n terrace. , how to grow organic vegetables at home, Organic fertilizer and its uses and techniques like seed germination, growing plants, cuttings, Fertilizers, Soil types, pest control, Garden Decor Idea, Garden Science, Tips & Tricks. how to understand soil machanisum . home made pesticides. lots of ideas. expenrence want share with you. i also run Online gardening course, weekly live session. grow vegetables. guide digitaly, build setups. sale gardening products n E books also. lets join us n grow your own food at your own yard. i like to create Shorts, Youtube Shorts n Video. sandeep chavan. gacchivarhi baug. #vegetablegardeningingrowbags #growbagsepicgardening #groworganic गच्चीवरची (विषमुक्त भाजीपाल्याची) बाग अर्थात ऑरगॅनिक भाजीपाल्याची बाग. आम्ही पूर्ण वेळ काम करतो. गच्चीवरची बाग या पर्यावरणपुरक उद्मशीलता नाशिक शहरात रूजवत आहोत. गच्चीवरची बाग या उपक्रम येत्या मार्च २०२१ मधे १० व्या वर्षात पदार्पण करत आहे. शहरात गच्चीवर S.M.A.R.T पध्दतीने विटांचे वाफ्यामधे, अन्नपूर्णा बॅग्जसमधे वेलवर्गीय, कंदमुळं, पालेभाज्या, फळभाज्या, रानभाज्या अशा सर्वच प्रकारचा विषमुक्त भाजीपाला अर्थात ऑरगॅनिक व नैसर्गिक पध्दतीनी भाजीपाला पिकवून दिला जातो. तसेच फळझाडे, औषधी वनस्पती, फूलझाडे यांचेपण संगोपन केले जाते. या विषयीच्या सर्वच कामांना अर्थात कचरा व्यवस्थापन, होमकंपोस्टींगव गच्चीवरील बाग, टेरेस फार्म अशा सर्वच कामाना २००१ पासून शिकायला सुरवात झाली. थोडक्यात या विषयीच २१ वर्षाचा अनुभव पाठीशी असून मागील आठ वर्षापासून नाशिक शहरात या विषयावर पूर्ण वेळ काम करत आहे. आमचे काम हे Grow, Guide, Build, Products Sale N Services in Nashik या पंच अंगाने सुरू आहे. जणू एकाद्या वनस्पतीचे पंचाग समजूया. घरी पिकवलेल्या भाज्या या औषधाप्रमाणे असतात. त्याचे पंचाग हे म्हणजे मूळ, खोड, पान, फूल, फळ हे जसे कामास येते तसेच आमचे काम मराठी व हिंदी भाषिक बांधवासाठी उपयोगी आहे. गच्चीवरची बाग हे प्रातिनिधीक नाव आहे. पण त्यास विविध नावाने ओळखले जाते. टेरेस फार्मिग, गच्चीवरील बाग, गच्चीवरील माती विहरहीत बाग, सेंद्रीय शेती, अंगणातील परसबाग, हिरवा कोपरा, बाल्कनी गार्डन, संक्यूलंटस व कॅकट्स गार्डन, होम गार्डन, नेचर गार्डन, किचन गार्डन, गच्चीवरील ऑरगॅनिक भाजीपाल्याची बाग, Roof Top Garden, Terrace Garden, सज्जा पर सब्जी, छत पर खेत, बागवानी, Innovative Garden अशा विविध नावाने ओळखली जाते. आम्ही नैसर्गिक कचरा व्यवस्थापनाचेही काम करतो. तसेच आपल्याला भाजीपाला आपल्या घरी फुलवायचा असेन तर त्यासाठी विविध उत्पादने तयार केली आहे. सध्या आमच्याकडे बावन्न प्रकारच्या सेवा व सुविधा उपलब्ध आहेत. ज्यात माती, खत, Booster, Insects Control उपलब्ध आहे. लोकांनी घरच्या घऱी भाजीपाला पिकवण्यासंदर्भात सहज सोपे समजेल असे साधे पण विज्ञान आधारीत तंत्र विकसीत करणे, त्याविषयीचे ज्ञान उपलब्ध करून देणं. त्यातून नैसर्गिक पध्दतीने भाजीपाल्याची बाग फुलवता येईल. अधिक माहितीसाठी आमचा Blog Subscribe करा.

Grow Organic
error: Content is protected !!
%d bloggers like this: