
Grower Cum composter by गच्चीवरची बाग
- 👉 gardening मध्ये वारंवार fail होताय का?
- 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
- 👉 तुमचं स्वतःचं garden असावं असं वाटतंय का?
- 👉 मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही सुरू कराल का?
गच्चीवरची बाग नाशिक हा participatory environmental activities गेल्या सात वर्षापासून नाशिक मधे व महाराष्ट्रात रूजवत आहोत. आम्ही पूर्णवेळ प्रत्यक्ष भाजीपाल्याच्या बागा फूलवून देण्याचे काम करत आहेत. या विषयी आम्ही वेगवेगळे प्रयोग करून पाहतो. ते विविध ठिकाणी रूजवून पाहतो. त्यातीलच एक प्रयोग आपल्यासाठी देत आहोत.
बाजारात सध्या कंपोस्टर यंत्राची धूम आहे. घरच्या कचर्याचे कंपोस्टींग हे गरजेचेच आहे. ते प्रत्येकाने आपले पर्यावरणीय कर्तव्य म्हणून पार पाडलेच पाहिजे. पण बाजारातील कंपोस्टर हे फक्त हिरव्या कचर्याचे खतात रूंपातर म्हणजेच त्याचे व्यवस्थापन करणेसाठी उपलब्ध आहेत. आम्ही याही पूर्वी गच्चीवरची बागेने All in one Waste composter – Devil Digester विकसीत केला आहे.
त्याचीच नवीन आवृत्ती म्हणजे “ग्रोव्हर कम कंपोस्टर” आम्ही विकसीत केला आहे. बाजारातील कंपोस्टरच्या किमती एवढा आहे. त्यात आपण रोजचा कचरा डंम्प करू शकता. तसेच त्यात कंपोस्टींग करता करता त्यात पालेभाजी, फळभाजी (वांगी, टोमॅटो, मिरची) वेलवर्गीय व एकादे वर्षायु झाड उगवू शकता. ( उदाः शेवगा, पपई) हा २०० लिटर क्षमतेचा ड्रम असून त्याला ५२ कप्पे करण्यात आले आहेत.
त्यात आपण सलाडसाठी उपयुक्त अशा भारतीय व विदेशी पालेभाज्यांची लागवड करू शकता. प्रत्येकी ५ किंवा १० कप्प्यात आपण एक भाजी या प्रमाणे १० प्रकारच्या भाज्या लागवड करू शकता. वरील भागात वर्षायु झाड लागवड करू शकता. तसेच उर्वरीत २ कप्प्यात वेलवर्गीय बियांची लागवड करू शकता.
कसे काम करते…. या ड्रमला बाहेरील बाजूस कपाच्या आकाराचे ५२ कप्पे केले असून त्यात ते चौफेर आहेत.
वरील बाजू कडून म्हणजे ड्रमच्या मधोमध एक पाईप दिलेला असून त्यात रोजचे खरकटे अन्न, हिरवा कचरा आपण त्यात टाकू शकता. तळाशी त्याला छिद्र दिलेले असून त्यातून पाण्याचा निचरा होतो. निचरा होणारे पाणी पुन्हा वापरू शकता. यात उत्तम प्रकारे यात पालेभाज्यांची निर्मिती होते.
याला चौफेर उन्हाची गरज असते. ते आपण बाल्कनीत, टेरेस व अंगणात मधोमध ठेवू शकता. यात गांडूळ सोडलेली असल्यामुळे कंपोस्टींगचे ते खत बनवतात. व तेच खत रोपांना पुरवतात. यात थोडी सोय सुविधा केल्यास त्यास सहजतेने फिरवता येताे. पण फिरवणे शक्य नसल्यास अर्ध्या भागात ऊन येत नसल्यास तेथे Exotics भाज्या सहजतेने उगवता येतात.
आपल्याला “ग्रोव्हर कम कंपोस्टर” पहावयाचा असल्यास नक्कीच आमच्या बागेला भेट देवू शकता.
गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.
गच्चीवरची बाग updates साठी गच्चीवरची बाग नाशिक page like करा ..
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
Comments are closed.