नाशिक हे आपले आवडते शहर आहे. त्याला स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करायचे मान्य झाले आहे. मुळातच नाशिक शहराला स्मार्ट बनायला बर्याच काही शक्यता आहेत. स्मार्ट सिटी म्हणून बरेच मुद्यावर चर्चा, कार्यशाळा संपन्न झाल्यात..
स्मार्ट सिटी विकास होण्यासाठी शहरातील कचरा व्यवस्थापन हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कचरा प्रश्नाला संबधीत किंवा तिला सोडवण्यासाठीची जी काही वर्तमान पध्दत आहे तिच्यात आमुलाग्र बदल घडवून आणणे गरजेचे आहे. हे बदल तीन प्रकारे घडवू शकतात. या तीन गोष्टी म्हणजे कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण, बहुपर्यायी लोकसहभाग….
1)व्यवस्थापनः सध्या कचर्याची विल्हेवाट लावली जातेय. या विल्हेवाटीवर आज प्रशासन करोडो रूपये खर्च करत आहेत. एक म्हणजे कचर्याचे विल्हेवाटी ऐवजी व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. या दोन संकल्पनेत मोठा गभितार्थ आहे. विल्हेवाटीत प्रश्न संपवला अशी भावना असते पण प्रत्यक्षात त्यातून अनेक उपप्रश्नांची उत्पत्ती होत जाते. जे आज घंटागाडी प्रश्न, सफाई कामगार प्रश्न, डंपीग ग्रांऊड प्रश्न असे आहेत. व्यवस्थापन ही निरंतर प्रक्रिया आहे आणि स्वंयभू असते. . त्यावर अनेक पातळीवर एकाच वेळीस काम करता येते व त्यातून येणारे रिर्टन हे कायम स्वरूपी असतात. मुळात ते अबादीत तर असतात पण ते परिवतनशील सुध्दा असतात. अशी ही व्यवस्थापनाची संकल्पना कचरा प्रश्नाबाबत लागू केली पाहिजे.
2)विकेंद्रीकरणः व्यवस्थापनाचाच भाग पण त्यास ठळक व स्वंतत्र्यपणे पाहता येईल असा मुद्दा म्हणजे कचर्याचे विकेंद्रीकरण होय. सध्या कचरा विविध ठिकाणाहून गोळा करणे, तो साठवणे (नव्हे सडवणे) त्यासाठी अनेक अर्थांचे अर्थकारण साधने हे नियंत्रित केले पाहिजे थोडक्यात कचरा जेथे तयार होतोय तेथेच तो जिरवला पाहिजे.. त्या जिरवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजेत.
3)बहुपर्यायी लोकसहभागः कचरा व्यवस्थापनात लोकसहभाग महत्वाचा आहे. लोकसहभाग वाढावा यासाठी स्मार्ट पर्याय शोधले जाणार आहेत. पण हा पर्याय पण एकच एक असून चालणार नाही.. त्यासाठी अनेक पर्यायांची गरज आहे. शहरातल्या एकाद्या मुद्यावर परिवर्तन गरजेचे आहे असे मानल्यास त्यात लोकसहभाग खूपच महत्वाचा आहे. एकादे ध्येय साध्य करण्यासाठी लोकसहभाग हे साधन असले तरी ते काही यांत्रिक साधन नाही आहे. ते एक जीवंत प्रक्रिया आहे. त्यात अनेक भावभावना, समज-गैरसमज, हेवे-दावे, फायदा- तोटा, मान-सन्मान असे सारेच काही आले.. हा मुद्दा लक्षात घेवूया…
नेमकं येथेच गच्चीवरची बाग हे महत्वाचे काम करत आहे. कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा हा निकाली काढण्यासाठी लोकसहभागानेच काम करत आहे. वरील तीनही मुद्यांचे येथे एक चांगले व्यावहरिक गणित व सहभागाचे मेतकूट जमून येते ते कसे पाहूया…
राव (प्रशासन) न करी ते गाव करी… ही म्हण प्रख्यात आहेच. याच्या मुळाशी लोकसहभाग हे तत्व आहेत. एकाद्या मुद्यावर लोकांचा सहभाग कधी वाढतो असा विचार करूया… तर लोक सहभाग जेव्हांच वाढतो जेव्हा लोकांचा त्यातून फायदा होवू शकतो. कचरा व्यवस्थापनातून गच्चीवरची बाग फूलवून इच्छुक विषमुक्त भाजीपाला, फळे आहे त्याजागेत फुलवू शकतात. गच्चीवरची बागेने खूप उपयोगशील तंत्र विकसीत केले आहे. 20 टक्के माती व 80 टक्के कचरा वापरून छान पणे घरच्याघरी भाजीपाला पिकवू शकतो.
लोकांना रासायिनक भाज्या, फळे यांचे तोटे लक्षात येवू लागले आहे. बाजारात सेंद्रीयभाजीपाला मिळतो खरा पण त्याची खात्री पाहता लोकांना घरीच भाजीपाला पिकवणे हे महत्वाचे वाटू लागले आहे. तसेच घरीच बाग फुलवून बाग बगीचा फुलवण्याचा आनंदही घेता येईल..जो आजच्या धावपळीच्या जीवनात निसर्गाच्या जवळ जाणे खूप महत्वाचे आहे. ते त्यातून साध्य होते. त्यामुळे गच्चीवरची बाग फुलवणे हे गरजेचे वाटू लागले आहे. गच्चीवरच्या बागेने हे तंत्र खूपच सोप्प तंत्र विकसीत केले आहे. उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तूत, उपलब्ध नैसर्गिक संसाधनात ही बाग फूलवता येते.
कचरा व्यवस्थापनात गच्चीवरची बाग सल्ला, प्रशिक्षण, जन जागृती, सोशल मीडियावर मोफत मार्गदर्शन करत आहे. घरघूती पातळीवर लोकांनी कमीत कमी खर्चात कचरा व्यवस्थापन करावे यासाठी विविध उपाय सुचिवले जातात. ज्यांना जो उपाय पटेल, रोजच्या कामातून करणे सोपे वाटेल तो त्यांनी अवलंबावा यासाठी मार्गदशर्न केले जाते. जेष्ठ नागरिक, तरूण, महिलामंडळे यांना गटानुसार किंवा कार्यशाळा घेतल्या जातात.
असे ही साधी सोप्या तंत्राची गच्चीवरची बाग आपण ही फूलवू शकता.
संदीप क. चव्हाण, नाशिक. www.gacchivarchibaug.in contact & wts app: 9850569644
This is the need of the day.
Can u please share this message in ENGLISH?
SCHOOLS & COLLEGES SHOULD START TEACHING THIS IN A PRACTICAL MANNER.
Thank you your valuable comments…. Bayou can share this article … My English language is not fine.. if you possible .. translate …it will great for me. .. I will repost with your name
Sandeep