
Aerio Composter म्हणजे विटांचा कोणतेही बांधकाम न करता तयार केलेला हौद होय. याचे वैशिष्टय म्हणजे हे जमीनीच्या वर तयार करता येतो. यातील पाचही बाजूने आतील उष्णता जाण्यास, हवा खेळती राहण्यास मदत होते. त्यामुळे त्याचे उत्तम प्रकारे खत तयार होते. खड्यात उतरून मजूरांची, मानवी श्रमांची जी गरज लागते ती या ठिकाणी लागत नाही. एकटा माणूस टॅक्टरभर खत दुसरी कडे सहज टाकू शकतो. तसेच हा एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणीही स्थानांतर करता येते. विटांसाठी होणारी आर्थिक गुतंवणूक ही वाया जात नाही.
पालापाचोळा, किचन वेस्ट (फरमेंनटेड), खरकटे पाणी, गार्डेन वेस्ट, गायी, म्हशीचे शेण असा सारा कचरा कंपोस्ट करण्याचा सोपा मार्ग म्हणजे Bricks Composter होय. याची उंची कमीत कमी २ फूट ते जास्तीत जास्त ६ फूट घेता येते. तसेच त्याची लांबी रूंदी ही ३ बाय ३ ते ६ बाय ६ फूट इतकी घेता येते. हे भिंतीलगत सी व एल आकारात व खुल्या जागेत चौरस आकारात तयार करता येतात. कंपोस्टिंग होण्यास सोपेअसते. तसेच त्याचा कोणताही दुर्गंधी येत नाही. वास येत नाही.
आपल्या मागणीनुसार जागेची पडताळणी करून असे हौद नाशिक मधे तयार करून देतो.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.