All in One गार्डन वेस्ट कंपोस्टरःहा एक २०० लिटर ड्रमचा सेटअप असतो. आपल्या टेरेस, अपार्टमेंटमधील उपलब्ध जागा , निर्माण होणारा पालापोचोळा याची गरज तपासून प्रत्यक्ष पाहणीत सुचविण्यात येतो. त्यासाठी काय काय काळजी घ्यायची, काय करणे गरजेचे आहे हे सांगितले जाते. यास डेव्हिल-डायजेस्टरम्हटले जाते. अगदी मोठ्या प्रमाणात व गतीने ओल्या सुक्या पालापाचोळ्याचे खतात रूपांतर केले जाते. या तून दररोज व्हर्मीवाँश, ह्यूमिक अँसिड, इंजाईम हे द्रवस्वरूपात मिळते. या सेटअपमुळे आपली colony स्मोक फ्री राखता येते. .नाशिकमध्ये या कंपोस्टर घरपोहोच दिले जातात. यासाठी एकदाच आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज असते. तयार होणारे खत आपण संग्रहीत करू शकता. या प्रकारच्या सेटअप मध्ये तयार केलेल्या खतात उत्तम प्रकारच्या भाज्या घेता येतात. तसेच नैसर्गीक कचर्याचीही व्यवस्था लावता येते.
अशा सेटअपमधे तयार केलेले खत हे ७५० ते १००० किलो खत एका वेळेस निघते. त्यास वर्षभर रिकामा करण्याची गरज नसते.