निमपेंड हे नैसर्गिक खत आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी प्रसाद म्हणून खडी साखरेबरोबर खाल्ला जाणारा कडूनिंबाचे झाड म्हणजे निम होय. या झाडाला येणारी फळे वाळली की त्याचे तेल काढले जाते. व त्याचा उरलेला चोथा म्हणजे पेंड होय. निमतेलाचा वापर नैसर्गिक पध्दतीने कीड नियंत्रणासाठी शेतीत केला जातो. तसेच निमपेंडीचा (निमखली) उपयोग केला जातो. बाजारात वेगवेगळ्या प्रतीच्या निमपेंडी मिळतात. काही बिस्कीट स्वरूपात तर काही पावडर स्वरूपात. पावडर स्वरूपात वापरलेली उत्तम म्हणजे तिचा चुरा करण्यात श्रम वाया जात नाही. शिवाय ती माती व पाण्याबरोबर सहज मिसळते. निमपें काही काळ वातावरणाशी संयोग झाल्यास तिला सफेद रंगाचा (बुरा) फंगस लागते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. उलट तिचा लवकर परिणाम होतो. मातीत कमी वेळात एकरूप होते. तर निमपेंड ही तपकीरी तेलकट रंगाची असते. जेवढी तेलकट तेवढी ती लवकर सफेद होते. त्यास कडवट गंध असतो.
निमपेंड ही भूरभूरल्यासारखी भाजीपालावर टाकावी. एका चौरस फुटाच्या कुंडीला हाताच्य चार बोटावर घेता येईल एवढीच टाकावी. मोठ्या फळ झाडांना जिवामृत वापरत असल्यास निमपेंड आवश्यक टाकावी.
निमपेंडीचे फायदे…. निमपेंड कडवट असल्यामुळे इतर शत्रू किटकांना ती मारक ठरते. कडवट गंधामुळे कीड पळून जाते. तर गांडूळांना ते पुरक ठरते. निमपेंड मातीत टाकल्यामुळे मातीचा पोत सुधारतो. तसेच फळांचा आकार वाढतो. फळे चविष्ठ होतात. नारळ व आंब्याच्या झाडांसाठी नेहमी वापरावी. निमपेंडीमधे जे काही दहा बारा प्रकारेचे नैसर्गिक रसायने असतात. त्यांचा उपयोग झाड निरोगी राहण्यासाठी उपयोगी होतो. तसेच हुमणी अळी होऊ नये म्हणून तिच्या प्रतिबंधासाठी निमपेंडीचा हमखास वापर करावा.
बाजारात निमखत व निमपेंड हे दोन वेगवेगळे प्रकार मिळतात. निमखत हे खूपच स्वस्त असते. तेच निमपेंड म्हणून विक्री केले जाते. त्यात माती, रासायनिक खते मिक्स केलेली असतात. पण दर्जेदार निमपेंड ही तेलकट दिसते. तिचे प्रमाण हे कमी वापरले तरी झाडांना त्याचा चांगला परिणाम मिळतो. चांगली निमपेंड ही ६० रू. किलो मिळते तर ऑनलाईन मागवल्यास ती १५० ते १८० रू. किलो मिळते.
निमपेंडमधे खालील घटक असतात.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक
[…] वापर करावा.जिवामृत वापरल्या नंतर निमपेंडीचा वापर जरूर […]