Yellow Sticks Pad
बाग फुलवतांना अनेक प्रकारची कीड येत असते. अगदी डोळे बारिक करून पाहिले तर दिसू शकेन अशा फळमाशा सुध्दा येतात. त्या तर लहान असतांनाच फळामधे शिरतात. व आत जावून फळ पोखरतात. अशा सुक्ष्म कीडीचा वावर हा दूरवर असतो. आपण मारलेल्या औषधांचाही प्रभाव संपून जातो. त्यावेळात ते त्यांचा कार्यभाग उरकतात. अशा वेळेस त्यांना नियंत्रीत करण्यासाठी Yellow Sticks Pad ( पिवळ्या रंगाचे चिकट सापळे) वापरले जातात. यांना फळमाशी, चिटले. माशा सुध्दा चिकटतात व कीडीचे वेळीच नियंत्रीत होते. या प्रकारचे चिकट सापळे म्हणजे प्लास्टिकच्या कोरोगेटेड शिटला दोनही बाजूने चिकट द्राव्य लावलेले असतात. त्यांनी एका टोकाला छिद्र पाडून दोरीने बांधावी म्हणजे हवे बरोबर ते हलत असतात. पिवळा रंग कीडीना आकर्षीत करतो त्यामुळे त्यावर चिटकून बसतात.
- 👉 तुम्ही अजूनही केमिकल भाज्या खात आहात का?
- 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
- 👉 तुमचं स्वतःचं garden असावं असं वाटतंय का?
- 👉 7 दिवसांत सुरुवात झाली तर तयार आहात का?
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.