गौमुत्र
भारतीय आयुर्वेदात गौमुत्राचे महत्व सांगीतलेले आहेच. गौमुत्र व गौमुत्र अर्क वापरून आजही वैद्यकिय उपचार केले जातात. गौमुत्राचे मानवी रोगांवर उपचार आहे. तसेच शेतीतही त्याचे महत्व आहेच. मध व गौमुत्र हे कधीही शिळे, खराब होत नाही. ते जितके जूने होईल तितके त्याचे गुण वाढत जातात. मी स्वतः गौमुत्र व गौमुत्र आधारीत औषधांचा किड नियंत्रण व पिक वाढीसाठी प्रयोग करत आहे. नियमीत केलेल्या फवारणीने बागेत कीड फिरकत नाही. बरेचदा लोक किड आली की मग पळापळ करतात. पण माझा अनुभव असा आहे की बागेत कीड असो की नसो… गौमुत्र व पाणी फवारणी गेली पाहिजे. म्हणजे कीड येत नाही. पावसाळा तर कीड निर्मीतीचा हंगाम असतो. अशा वेळेस गौमुत्र पाणी फवारणी ही वाढवावी लागते. गौमुत्र हे देशी गायीचे असावे. त्यात स्थानिक प्रजाती व गिर गाय सुध्दा चालेल. जस्टीन, होस्टीन, हायब्रिड गायी, म्हशी, बकरी याचे मुत्र चालणार नाही.
एक लिटर गौमुत्रात दहा लिटर पाणी टाकून सायंकाळच्या वेळेस फवारणी करावी. कीडीचा प्रार्दुभाव असल्यास सलग तीन सायंकाळी फवारणी करावी. आम्ही स्वतः स्थानिक प्रजातीची गाय पाळली असून तिचे गौमुत्र बागेसाठी संग्रहीत करतो. नाशिककरांना हवे असल्यास विकत मिळेल. कीड नियंत्रणासाठी अधिक वाचा…
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक