गच्चीवरची बागेला आठ वर्ष पूर्ण होत आहेत. आम्ही लोकांना विविध माध्यमांतून निसर्ग साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहोत. या साक्षरतेसोबतच इच्छुकांनी पर्यावरण पुरक व्यवसायात यावे यासाठी प्रेरीत व मार्गदर्शन करत आहोत. उदाः काही मंडळी नव्याने या व्यवसायात येवू पहात आहेत. काहीनी सुरवात केली आहे. काहीनी आपले उत्पादन सुरू केले पण त्याला योग्य तो ग्राहक मिळत नाही आहे. कारण योग्य त्या व्यासपिठावर त्यांना पोहचता येत नाही. किंवा पोहचू शकत नाही. तर आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहचावयाचा असेल तर आपला एक लेख, माहितीची पाने तरी संकेतस्थळावर असणे गरजेचे आहे. आपली माहिती लोकांपर्यंत पोहचवणे हे फार गरजेचे झाले तर आहेच. व्हाट्सअप, फेसबूक या सारख्या ठिकाणी आपल्याला काही मर्यादा येतात. कारण प्रत्येक माध्यमांची ताकद ही वेगवेगळी असते. याचा किमान पर्यावरण व कृषी पुरक व्यवसायाला पाठबळ मिळावे ही आमची इच्छा आहे. आमचे संकेतस्थळाला जाने – डिसें २०१९ या काळात १२ हजार 34 देश विदेशातील मराठी व हिंदी भाषिक बाधंवानी भेट दिली असून २० हजार दर्शक लाभले आहेत. आम्ही ही दर्शक व भेट देणार्यांची संख्या माहे ऑगस्ट २०२० मधेच साध्य केले आहे. या वर्षी ३६ देश विदेशातील मराठी व हिंदी भाषिकांनी भेट दिली आहे.माहे डिसेंबर २०२० पर्यंत हे ध्यैय दुप्पट करण्याचे उदिष्ट आहे. तर आमच्या संकेतस्थळाची मदत घेवून आपण आपली जाहिरात करू शकता.
नियम
- ही सुविधा निशुल्क असणार आहे. या साठी आपल्याला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
- आपल्या कृषी, पर्यावरण, बाग बगीचा, या पुरक व्यवसाया सोबत इतर व्यवसायांचा म्हणजे गृहउद्योग, हस्तउद्योग व काही नाविण्यपूर्ण व्यवसायांचाही विचार केला जाईल. आपल्याला २५० शब्दांचा लेख स्वरूपातील जाहीरात प्रकाशीत करता येईल.
- त्यासोबत आपले नाव, संपर्क क्रं. पत्ता ही असेन.
- उत्पादनाचे ३ फोटो टाकता येतील (सोबत प्रत्येकी १५० शब्दांची माहिती देता येईल.
- आपल्या व्यवसायाच्या माहितीची लिंक तयार करून दिली जाईल.
- आपली माहिती महिण्यातून एकदाच अपडेट करता येईल.
- आपली माहिती आपणच युनिकोड फॉन्ट मधे टाईप करून पाठवावी
अटी.
- कोणता लेख वजा जाहिरात घ्यावयाची, कोणती नाही. या विषयी आमची टीम ठरवेन. त्यासाठी कोणताही वाद प्रतिवाद केला जाणार नाही. तक्रार ऐकूण घेतली जाणार नाही.
- कोणता लेख किती काळ आमच्या संकेतस्थळावर ठेवावा याविषयी संपूर्ण निर्णय टीमचा असेन.
- आपल्या व्यवसायाच्या माहितीची लिंक आपणच इच्छुकांना पाठवावयाची आहे.
आपण आपली माहिती Sandeepkchavan79@gmail.com वर पाठवू शकता.
टीपः आपल्याला आमच्या सोबत Agro Business Advertise करावयाची असल्यास त्यासाठी सिवस्तर वाचा..
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक