दशपर्णी हे सर्वात प्रभावी, परिणाम कारक असे किड नियंत्रण आहे. आपल्या बागेत कीड वाढल्यास, शक्यतो पावसाच्या दिवसात किडीचा प्रार्दुभाव हा वाढतो. अशा वेळेस दशपर्णीची फवारणी करणे फार गरजेचे असते. एक गोष्ट फार महत्वाची असते ति म्हणजे नैसर्गिक, सेंद्रीय शेतीत कीड ही नियंत्रीत केली जाते. उग्र गंधामुळे ते पुढील पिढीला जन्म देत नाही. गंधामधे प्रजनन व श्वसन संस्था प्रभावीत होतात. त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रीत होते किंवा त्या दुरवर पळून तरी जातात. तर रासायनिक शेतीत सरसकट सारेच मित्र किटक, शत्रू किटक हे मारून टाकली जातात. तसेच नाका तोंडाव्दारे शरिरात गेल्यास त्याने अपाय होण्याची शक्यता असते. त्यामुळे रासायनिक फवारणी करू नये. तर नैसर्गिक कीड नियंत्रक फवारल्यामुळे ( त्यातील गोमुत्राचा वापरामुळे) मानवी श्वसन संस्था ही भक्कम होते. थोडक्यात आपल्या श्वसनाची डेप्ट वाढते. आपण जाणीव पूर्वक श्वास घेवू लागतो.
दशपर्णी हे असे दहा वनस्पतींच्या पानापासून बनवले जाते ज्याची पाने गाय, बकरी कोणीही खात नाही. उदाः निंब, बकाम, सिताफळ, कंरज, पपई, घानेरी, बेशरम, रूई, कन्हेर, एरंड. इत्यादी पाने देशी गायीच्या शेणात व गोमुत्रात सडवली जातात. व त्यापासून वस्त्रगाळ करून अर्क तयार केला जातो. अर्क विक्रीसाठी उपलब्ध आहे.
वापरावयाचे प्रमाणः एक लिटर दशपर्णी अर्कात आपण दहा लिटर पाणी मिश्त्रण करून तीन सायंकाळी सलग फवारावे. म्हणजे कीड नियंत्रीत होते. कीड नियंत्रणाचा लेख वाचा…
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.