WINDOW GARDENING खिडतील बाग..

अपार्टमेंट मधे राहणारी मंडळीना निसर्गाची जाम आवड असते. पण जागेअभावी ती फुलवता येत नाही.  त्या सुध्दा आपल्या गॅलरी विंडो, बाल्कनी विंडो, विंडो मधे बाग फुलवण्यास आम्ही मदत करत. अगदी शितपेयाच्या बाटलीत सुध्दा आपण पालेभाजी, मिरची, फुलांची वेल लागवड करू शकतो. शक्यतो पालेभाज्या छान फुलतात. अपार्टमेंट मधे राहणार्या व्यक्तिंना बाग फुलवण्यासाठी बर्याच बंधने असतात. पाणी खाली गळू नये ही पहिली अट असते. तर कधी कधी प्रतिकुल निसर्ग म्हणजे दक्षीणायन उत्तरायण या प्रमाणेच उन त्यांच्या पर्यंत पोहचते. या सार्यां अडचणीचा विचार करत आपण बाग फुलवू शकतो. या ठिकाणी मातीच्या, सिमेंटच्या कुंड्या ठेवणे अवघड असते. अशा ठिकाणी ग्रो बॅग्ज मधे बाग फुलवू शकतो. छोट्या माठामधे कंपोस्टींग करू शकतो.  इच्छा असेल तर मार्ग नक्कीच असतो. आणि मार्ग असूनही होत नाही तर दूरपर्यंत चालून जाण्यासाठी एक तरी पाऊल उचलावे लागते. यासाठी आम्ही ग्रो बॅग्स, माहिती साहित्य पुरवतो.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.