बरेचदा काही इच्छुकांकडे गच्चीवर किंवा जमीनीवर भाजी पाल्याची बाग फुलवण्यास जागा नसते. अपार्टमेंट मधे राहत असल्यास गच्चीवर बाग फुलवण्यास मनाई असते. तसेच गुंतवणूकही असते. अशा वेळेस इच्छुकांना भाजीपाल्याच्या क्रेट्स मधे भाजीपाला लागवड करता येतो. तसेच सिमेंट, माती, प्लास्टिकच्या विविध आकारात कुंड्याही मिळतात. कुंड्या पेक्षा क्रेट्स हे भाजीपाला वाढीसाठी उत्तम असतात. कारण त्यास पाचही बाजूने प्राणवायू मिळत असतो. या प्रकारात फक्त आपल्याला कंदमुळे, पालेभाजी व फळभाज्या घेता येतात. वेलवर्गीयांना जागा कमी मिळते. त्यामुळे त्यात वेलवर्गीय खूपच कमी उत्पादन देतात. आम्ही भाज्यापाल्याचे क्रेट्स आमच्या पध्दतीने घरी येवूनही भरून देतो. त्यात भाजीपाला लागवड करून देतो.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.