Copy of DSCN9553 copy copy

Kitchen Garden 

किचन गार्डन म्हणजे बंगला, घर, शाळा, कंपनी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जमीनीवर भाजीपाल्याची बाग फुलवली जाते. यात टेरेस गार्डन येथे जसा विटा वाफा तयार केला जातो त्या प्रमाणेच जमीनीवर विटांचा वाफा तयार केला जातो. कोणतेही बांधकाम, सिमेंटचा वापर नसतो. या वाफ्याखाली कोणताही प्लास्टिक कागद वापरला जात नाही. टेरेस वरील विटांच्या वाफ्यापेक्षा जमीनीवरील वाफा हा जमीनीत लवकर जिरतो. थोडक्यात त्याचे रिपॉटींग हे वर्षभरानंतर केले जाते. कारण जमीनीतील सुक्ष्म जिवाणू त्याचे मातीत लवकर रूपांतर करतात. विटांचा वाफा केल्याने पाचही बाजूने त्यास प्राणवायू मिळतो. वाफसा तयार होतो. जमीनीवर ओळंबा पध्दतीने बाग तयार करता येतात. पण अशा ओळंब्या पध्दतीने केलेल्या मातीवर पाणी टाकल्याने त्याचा आकार जमीनीला संमातर होतो. व वाफशाचे फायदे कमी होत जातात. टेरेस वरील वाफ्यापेक्षा जमीनीवरील विटांच्या वाफ्याचा परिणाम हा खूप चांगला येतो तसेच त्याचे उत्पादन ही वाढते.

वाफा पध्दतीची अधिक माहितीसाठी वाचा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक