
वय वर्ष साठी पार केलेले अश्विन नगर, पाथर्डी फाटा, नाशिक येथील जोडेपे. कुलकर्णी आजीनीं आज सकाळी सकाळी फोन केला. विचारपूस केली. काय कसे चाललें. खरं तर फोनला रेंज नव्हती तरी त्यांच तुटकं मुटक ऐकू येणांर्या शब्दांना हो हो करत होतो. त्यांनी आवर्जून सांगीतले की खर तर आम्ही तुम्हाला थॅंक्सं गिव्हींगसाठी फोन केला. म्हटलं. कशासाठी… तुम्ही भाज्यांचा सेटअप लावून गेलात. लॉकडाऊन झाल्यापासून आम्ही रोज घरचीच भाजी खात आहोत. भले आठवड्याला एकादी भाजी पुन्हा करावी लागते. पण बाहेरंचच भितीदायक वातावरण पाहता.. रोज घरची भाजी येणं हे खूप महत्वाचं झालयं.
हे ऐकूण खूप बरं वाटलं. माझ्याही घरी रोज भाज्या उगताहेत. काहीना काही हाती भाजी येत असते. अगदीच भाजीवाचून अडून राहिलयं. असं कधी झालं नाही. लॉकडाऊन अजून किती वाढेल याची खात्री नाही. हा आजार दिसतो तेव्हढा सोप्पा नाही… आता तरी घरीच भाज्या उगवायचं मनावर घ्या… रासायनिक भाज्या खाऊ नका म्हणून सांगत होतो आता संसर्गीत भाज्या खाऊ नका… हेही सांगावे लागेल. आम्ही ज्यांच्याकडे भाज्यांचे सेटअप लावून दिले किंवा आमचे या विषयावरील माहितीपुस्तक वाचून सराव करत आहेत. व रोज भाज्या मिळवत आहेत.
तर अशा कठीण प्रसंगी कमी साधनात भाज्या कशा उगवायच्या हे सांगत आहेच… पण अधिक माहितीसाठी www.gacchivarchibaug.in www.organic-vegetable-terrace-garden.com चा अभ्यास करा…
लॉकडाऊनच्या काळात बाजारात रासायनिक भाज्या असल्यातरी चालतील. पण त्या संसर्गीत असतील तर घरात स्वतःला कोंडूंन घेण्यात काय अर्थ… त्यामुळे घरीच भाज्या उगवणे हा एक पर्याय आहे.. पण अशा कठीण स्थितीत काय करायचं.
आता माती नाही, खत नाही, बिया पण नाहीत. करायचं कसं. हातावर हात ठेवून बसू नका. जे काही साधनं उपलब्ध आहेत (लेडीज पर्स पासून दूधाच्या पिशव्यापर्यंत..) अशी साधने ज्यात काही सामावू शकेन.. तर अशा साधनात वाळवललें तळाशी नारळाच्या शेंड्या त्यावर किचनवेस्ट/ पालापाचोळा दाबून भरा, थोडी माती टाका… झाली कुंडी तयार… एकादी कुंडीत झाडं नसेन तर तिच माती वापरा.. वरील पध्दतीने कुंडी भरल्यास एका कुंडीतील मातीत ४-५ कुंड्या तयार होऊ शकेन… घरीच कंपोस्टींग करा… कंपोस्टींग एंजन्ट शिवाय काहीही अडून राहत नाही. त्यांच विज्ञान शिका.. घरीच खत तयार करता येईल. हा वेळ अधिकाधिक निसर्गासाठी द्या. बागेत सराव करा. घाम गाळा, बाहेरून कुठूनही पैसा येणार नाही. फक्त शेती, किचन गार्डन, टेरेस गार्डन,विंडो गार्डन साठी वेळ द्या.. त्याची माहिती मिळवा, अभ्यास करा. अंमलात आणा.. किमान भाजी तरी उगवता आली पाहिजे…
महिनाभरात भाज्या येतील अशा घरच्या बियाणांचा वापर करा…
- मेथी, धने , मोहरी पेरा…
- गहू पेरा… शरीराला पोषक रसाची गरज आहे… संसर्गीत भाज्या फळांपेक्षा घरीच उगवलेल्या तृण रसाचे ज्यूस प्या.. तंदुरूस्त राहाल.
- हरबरे पेरा… आता या दिवसात हरबरे पिक येणार नाही पण पाल्यांची भाजी नक्की होईल.
- पालकः थोडेफार पालकांचे बिज असेल तर पेरा. किंवा बाजारातून पालक जूडी मिळाल्यास पाने काढून त्याची खोडासहित लागवड करा. महिणाभरात पालक तयार होईल.
- कांदा, लसून लागवड करा… महिनाभरात कांद्यांची पात मिळेल.
- पुई शाक, भजीचं पान.. याचे एक बियाणं लावलं तरी महिनाभरात त्याचा वेल तयार होतो. त्याची आठवड्याला एक भाजी तयार होईल. याने एच. बी. वाढतो. यास बंगाल मधे पुईशाक, महाराष्ट्रात मायाळू असेही म्हणतात.
- अळूची पाने… दोन प्रकारची अळू असतात. त्यांची वाढ ही या दिवसात छान होते. त्यांच्या वाढीवर व संख्यावाढीवर लक्ष द्या.. वड्या करून ठेवल्या तरी त्या बराच काळ टिकतात.
- तांदुळका, माठला, लाल माठ ही सहज येणारी वनस्पती आहे. थोडं बियाणं मिळालं, किंवा एकादे रोपे मिळाले तर ते वाढवा. वाढत्या तपमानात ही भाजी छान बहरते.
- गाजर, मुळा, बिट याचें खोड पुन्हा मातीत लावा. त्याच्या पानांपासून पराठे तयार करता येतात.
- रान भाज्या कोणत्या आहेत. याचा अभ्यास करा… आपल्या बागेत येणारें तन ही रानभाजी असू शकते. ते नक्की आहे का याची खात्री करा.. त्याचा आहारात समावेश करा..
- काही लोकांकडे घरच्या भाज्या जास्तीच्या येत असल्यास त्याचे निर्जलीकरण Drying (dehydrating) करून ठेवा. पावसाळ्यात त्याच कामास येतील.
- बाहेरूण येणार्या भाज्यांचे निर्जलीकरण करून ठेवा… त्याचा उपयोग पावसाळ्यात होणार आहे. या वर्षीसुध्दा सलग पाऊस राहणार आहे.
- पुढील तीन महिन्यात भाज्या येतील याचे नियोजन करा..मिरची, टोमॅटो, वांगी, बटाटे, वेलवर्गीय ( वाल, भोपळा, गिलके, दोडके, तोंडलीचा वेल ) यांची लागवड करा.. बियाणं पेरा…
काही अडचण असल्यास 9850569644 वर व्हॉट्सअप करा…
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
टीपः १) काही महाशय (फेसबूक व व्हॉट्सअप वरील एडमीन) लेख आवडला तर स्वतःच्या नावाने कट पेस्ट करून पुढे पाठवतात. तर कधी लेखा खालील नावं, व संकेतस्थळ गायब करतात. कृपया लेख आहे तसा पाठवा. आम्ही आमच्या संकेतस्थळाव्दारे महत्वाची माहिती लोकांना देण्याचा प्रयत्न करत असतो. जी त्यांना पुढील आयुष्यभरासाठी उपयोगी ठरणार आहे.
२) सध्या सकाळ या वृत्तपत्रात हिरवे स्वप्न नावाने लेख माला प्रकाशीत होत आहे. ( दर मंगळवारी) आवश्यक वाचा. व कळवा…

आनेवाले शनिवार और रविवार के दिन हिंदी और मराठी भाषा में gardening के बारे मे QnA session रात 8 बजे शुरू होगा … Wts app group पर लिंक भेजी जाएगी.
*Grow organic wts app group join करे..*
https://chat.whatsapp.com/JCB3bIFYzAYGAyFI4Rmcn5
*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
Course details 👆
Comments are closed.