unnamedHow to overcome Stress in Lock down

लाॅकडाऊनच्या काळात मानसिक संतूलन कसे साधाल?

लॉकडाऊन वाढलाय. हळू हळू दिवस जसे पुढे जावू लागलेय तसं तसं कंटाळा येणे, चिंडचिड होणे, राग येणे हे आता सुरू झालं आहे. छोटे गोष्टींत वाद होताहेत. यावर उपाय काय.. घरातल्या घऱात स्वतःला कशात तरी व्यस्त करणे हे पर्याय आपण शोधलेय. त्याचाही कंटाळा आला असेल. खर तर आरामच इतका झालाय की आता त्याचा विट आला आहे. बाहेरही जाणं जोखमीचं आहे. तर करायचं काय.. जे मला घरात बसूनच करता येईल. व त्याने मनावरील ताण कमी करता येईल.

आपल्या मनावरील ताण निसर्गच कमी करू शकणार आहे. काऱण आपण स्वतःला सिमेंटच्या खुराड्यात कोंडून घेतलयं. आणि आपली पाळमुळे आहेत ती निसर्गात, जंगलात. जल, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश यां पंच महाभूतीशी. तसेच त्याची अनुभूती स्पर्श, गंध, चव, ऐकणे, पहाणे या पंचेइंद्रीयांशी जोडलेले आहे. त्यामुळे या Lockdown च्या काळात आपल्याला पुन्हा निसर्गाशी जोडून घ्यावेच लागणार आहे.

कारण बागेत आपल्या पंचेद्रीयांना जागृत करून पंचमहाभूतांशी जोडता येते. त्यासाठी काही टिप्स सांगतो.

  • एकादे साधनं घ्या, त्यात थोडी माती भरा, स्वंयपाक घरातील कोणतेही बिज लावून पहा. त्याला रोज पाणी द्या. त्यांच्या अंकुरण्याचा, त्याच्या वाढीचा आनंद घ्या. हा आनंद म्हणजे सृजनाचा, नवनिर्मितीचा असतो. जो जगण्याला उभारी देतो.
  • घरी गच्चीत, बाल्कनीत, खिडकीत कुंड्या लावल्या असतील तर साफसफाई, पाणी देणे, काडीकचरा गोळा करणे. कंटीग्स करणे अशी त्यात काम करा. प्रसन्न वाटेल.
  • बागेत काहीच काम नसेल तर बागेशी गप्पा मारा. रोज ओळीने एकादे झाडं घेवून ते झाडं आपल्याला का आवडतयं. त्याला कुरवाळा, त्याचा स्पर्श अनुभवा. आपल्याला लगेच त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचा अनुभव येईल. एकदे पान तोडून (माहीत असलेल्या झाडांचीच) त्याची थोडीशी चव चाखून बघा. नाकाला गंध देवून बघा. उदाः तुळस, बेझील तसेच बागेत, कुंडीत माती उकरून त्या मातीचा गंध घेवून बघा. गंध हा सुध्दा मनावरील ताण कमी करण्यास मदत करत असतो.
  • बागेत नुसंत सकाळ, सांयकाळ खूर्ची टाकून बसा. चहा कॉफी घोटघोट घेतल्यास उत्तम. कुटुंबाशी गप्पा करा. पण शक्य झाल्यास एकटे, निवांत बसा. झाडांवर पडणारे उन, प्रकाश अनुभवा. कारण हा प्रकाश आपल्यतील अनंत कोटीच्या गुंतागुंतीच्या मेंदुला साध घालतो. त्याला आराम देण्याचं काम प्रकाश करत असतो. थोडक्यात प्रकाश हा मुड (भावना तयार करण्याचे काम करत असतो) बनवत असतो. उदाः एकाद्या उंच टोकावरून हिरव्यागार जंगलाकडे पाहतो. हिरव्याच रंगाच्या हजारो छटा असतात. पण त्या आपल्याला आनंद, विचारांच्या खोलीचा आनंद देतात. रंग एकच मग हजारो छटा कशा तयार होतात. त्याला कारण असतो. प्रकाश. काही पांनामधून सुर्यप्रकाश हा परावर्तीत होतो किवा आरपार जातो तेव्हा त्यातून असंख्य अशा विविध व बर्याच पध्दतीच्या छटा तयार होतात. त्या मनाला, मेंदुला आनंदाचे आरामाचे संदेश देतात. कृत्रीम प्रकाशात(रात्रीचा) याची मजा कमी असते. बागेतील झाडांवर पडलेला प्रकाश हा परावर्तीत, आरपार पध्दतीत कसा दिसतो याचे सुक्ष्म निरिक्षण करा.
  • बागेला पाणी द्या… नुसतं बागेला पाणी देतांना नळी झाड व कुंडीच्या आळ्यात धरू नका. झाडांवर तुषार सिंचन करा. काही आपल्याही अंगावर उडवून घ्या. बागेतील झाडांच्या पानावर असलेली धूळ तर निघून जाईल. पण आपल्या मनावर साचलेली थोडीशी मरगळ रूपी धूळ निघून जाईन.
  • आपल्या बागेत निवंडूग, संकुल्टंस इतर झाडे असल्यास त्याची वेगवेगळ्या नैसर्गिक प्रकाश झोतात. फोटो काढा, ते शेअर करा. संग्रहीत करून ठेवा. कंटाळा अधिकच वाढला तर मोबाईल व संगणकावर ते पुन्हा पहाता येतात.  

थोडक्यात आपल्यातील पंचेद्रीयांना  पंचमहाभूतांशी जोडायचे आहे. आणि त्यासाठी निसर्ग, बाग, झाडं हीच खरी मित्र आहेत.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644