Betel-Leaf-Oil-Piper-betle-Essential-Oil-ProductPic

Betel Leafs खायचे पान…

खायचे पान, नागलीचे पान, Betel Leaf असे वेगवेगळे नावे आहेत. हे एक आयुर्वेदीय महत्व असलेली वनस्पती आहे. तंबाखूरहीत पान खाणे हे आरोग्यदायी असते. तसेच पान म्हणून, चुना, गुंजाची पाने, खोबरे, असे मसाला पान म्हणून खाल्ले तर जातेच पण ते विविध आजारावर त्याच्या पानांचा उपयोग केला जातो. खायचे पान हे अन्न पचनास मदत करत असते. त्यामुळे आपल्या अन्न संस्कृतीत त्याला जेवणानंतर खाण्याची पंरपरा आहे. खायच्या पानांची सध्या बाजारात व्यापारी पध्दतीने उपलब्धता असते. अर्थात ते रासायनिक खतावर वाढवले जातात. रासायनिक खत व औषधामुळे त्याच्या सेवनाचे काहीच महत्व राहत नाही. आरोग्यदायी पान खावयाचे असेल तर ते घरीच विषमुक्त पध्दतीने उगवलेले फायदेशीर असते.

खायचे पान हे गडद, गर्द हिरवे, पोपटी अशा हिरव्या रंगाच्या विविध प्रकारात उपलब्ध असते. भारतात वेगवेगळ्या राज्यात त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. तसेच त्याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. तुरट, तिखट  अशी त्यांची चव असते.

ही पाने सहसा पूर्व दिशेला उत्तम प्रकारे बहरतात. त्यांना सकाळचे उन गरजेचे असते. ते भरभरून बहरतात. तसे त्यांना अर्धेवळे उन्हाची गरज असते. त्यामुळे त्यांना नारळाच्या सावलीत लावले तरी चालते. त्यांना पाणी हे भरपूर प्रमाणात गरजेचे असते. उन्हासाठी पुर्व दिशा उपलब्ध नसेल तरी ही कोणत्याही दिशेला लागवड करता येते पण त्याची वाढ ही मर्यादीत असते.

या पांनाची पुर्नलागवड करणे सोपे असते. ही वेलवर्गीय असल्यामुळे प्रत्येक देठा देठाला मुळ्या फूटतात त्यातून ते आधार किंवा अन्न शोधत असतात. असे मुळ असलेली फांदी कापून आपण सुरवातीला छोट्या कुंडीत सावलीत लागवड करा. मोठे झाले की त्याचे जागा बदलवू शकता.

ऊन , तापमान जास्त व पाणी कमी असल्यास या वेलाची पाने छोटी व तिष्ण, तुटरट, तिखट चवीची, होतात.  तर अर्धवेळ सावली, योग्य दिशा, कमी तापमान व पाणी भरपूर असल्यास याच वेलाची पाने ही  आकाराने मोठी, चवीला छान लागतात.

या वेलाला वेल केला तर उत्तमच नाही तर ते स्वतःहून आधार शोधात. ही वेल कुंडीत, ग्रो बॅग, वाफा, भितींची आतील कडा, विंडो ग्रील मधेही लागवड करता येते.