एक गोष्ट सांगतो. त्या गोष्टीचा व मांडणी केलेल्या Grow Kit प्रकल्पाची संकल्पना अवलंबून आहे.
एक तरूण असतो. तो एकटाच असतो. त्याला कोणतेही कुटुंब नसते. त्यामुळे तो या गावातून त्या गावात भटकत असे. एकदा त्याची भेट तळ्याशेजारी राहणार्या मासे पकडणार्या कोळ्याशी होते. तो तरूण कोळ्याकडे भुकेने व्याकुळ होत जेवणाची मागणी करतो. कोळी त्याला जेवण देतो व विचारपूस करतो. चौकशीतून त्याला असे कळते की तो तरूण समज आल्यापासून असाच गावोगावी फिरत आहे व आपली पोटाची भूक भागवत आहे. कोळी त्याला तेथेच राहण्यास सांगतो. त्याला दुसर्या दिवसापासून मासे पकडण्यास घेवून जातो. त्याला मासेमारी करायची कशी, जाळ फेकायंच कसे, मासे विकायचे कसे हे सारे शिकवतो व एक दिवस त्याच्या पायावर उभा करतो. आता तो तरूण जीवन कौशल्य शिकल्यामुळे कुणाकडेही भाकरीसाठी हात पुढे करत नाही. तो त्याची भाकरी मिळवू लागतो.
वरील गोष्टी प्रमाणेच Lockdown मधे लोकांना भाज्या पुरवण्यापेक्षा, भाजी मंडईत बोलावून त्यांना संसर्गीत करण्यापेक्षा घरीच भाज्या पिकवायचे काही मंडळीना शिकवले, प्रेरीत केले तरी बर्याच अंशी या विषाणूच्या प्रसारावर लगाम लावता येईल.
लॉकडाऊन हे आज नाही तर उद्या संपेलच. पण ते पूर्णतः कधी संपेल काही सांगता येत नाही. भले त्याची धम कमी होईल पण तिव्रता ही जाणवणारच आहे. काल देश व्यापी Lockdown होते ते संपूण ते फक्त राज्यव्यापी राहिले, ते ही संपूण ते तालुका, शहर, गाव व्यापी राहिले असे करत करत ते त्या त्या कॉलनी पुरता राहील. आणि पुन्हा कदाचित उद्रेक वाढला तर व्याप्तीही वाढवली जाऊ शकते. कारण सध्या तरी प्राप्त परिस्थितीत हाच रामबाण उपाय आहे. असो तर Lockdown हे राहणारच आहे. Hunger Free Community हे Millennium Developmentचे उद्दीष्ट आहे.
लोकांना Lockdown मधे सहजतेने राहता येईल असे सोयी करणे गरजेचे आहे. त्यांना औषधे, खाणपान पुरवणे हे आलेच. पण एवढेच पुरेसे आहे. तर नाही. त्यांच्याकडे असलेला वेळेचा सद्पयोग करत त्यांना व्यस्त ठेवणे हे सुध्दा मानसिक पातळीवर मोठे आव्हान आहे. केवळ इंटरनेट फ्री करून चालणार नाही.. तर त्यांच्या मन, मेंदू व हातांना काम दिले पाहिजे. तर यासाठी स्थानिक प्रशासनाने भाजीपाला उत्पादनासाठी Growing kit दिले पाहिजे. त्यांना भाजीपाला बाग तयार करण्यासाठी प्रेरीत केले पाहिजे. कारण भाजी मंडईत होणारी गर्दी व तिचा प्रादुर्भाव पाहता घऱीच भाज्या उगवणे हे गरजेचे आहे.
आज अनेकांचे फोन येताहेत सर आपल्याकडून सेटअप उभा करून घेतला असता तर आज बाहेर जाण्याची वेळ आली नसती. घरीच भाज्या उगवल्या असत्या. अशी अनेकांनी इच्छा असेन पण माहिती अभावी ती पोहचू शकत नाही. ती पोहचवली पाहिजे.
Growing Kit म्हणजे काय… या मधे अपार्टमेंट राहणारी व्यक्ती ही केंद्र मानली तर तिच्या कडे विंडो गार्डेनिंग साठी, खिडकी किंवा बाल्कनी मिळून थोढीफार जागा असते. बरेचदा इच्छा असूनही त्यांनी घरी भाज्या उगवणे शक्य नाही. त्यासाठी त्यांना विशिष्ट आकाराच्या ग्रो बॅग्ज, बियाणे, Potting Mix , सोबत एक हे सारं करण्याविषयीची माहितीपुस्तिका तसेच या विषयावर मार्गदर्शन करणारी व्यक्तिची नावे ( त्यांची संमती घेवून) देण्यात यावी.
हे काम स्थानिक प्रशासनाने करावे, किंवा या विषयावर गच्चीवरची बाग सारखा काम करणार्या संस्था वा उद्योगाव्दारे व्दारे अशा किटचे वितरण करण्यात यावे.
अशा Growing Kit साठी गच्चीवरची बाग प्रयत्न करणार आहे. ही तयार Ready to Sow ( पेरण्यास तयार) बॅग असेन. इच्छुकांची व यासाठी लागणार्या साहित्य दान करणार्याची यादी तयार करून हे किट Indian Post ने पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे.
त्यासाठी दानशुरांनी खालील प्रमाणे साहित्याची, खर्चाची मदत करावी ही विनंती.
- १२ बाय १२ इंच आकाराच्या ग्रो बॅग्ज
- भाजी पाल्याच्या बिया. नव्या, जून्या कोणत्याही चालतील. (जुन्या असतील तर त्याची निवड करून त्यावर बिजसंस्कार करून ते वाटले जातील)
- Potting Mix चा खर्च (यामुळे बजन हलके होईल. व Ready to Sow बॅग बाय पोस्ट ने पाठवायला सोपे जाईल.
- टपाल खर्च साधारण (60 ते 80 Kg असतो. ) एक बॅग ही एक किलोची किंवा त्येपेक्षा कमी वजनाची बनवण्याचा प्रयत्न केला जाईल.
- ई-माहिती पुस्तिका पुरवण्यात येईल. ( घरच्या कचर्यापासून खत कसे तयार करावे, बिज कसे लागवड करावे, कीड नियंत्रण कशी करावी या संदर्भात माहिती देण्यात येईल.)
- यासाठी कोणतीही मजूरी आकारण्यात येणार नाही.
वाचा… Lockdown Inspiratuin activity -1
दानशुरांनी यासाठी साहित्य वा लागणारा खर्च करण्यासाठी पैसे रूपात मदत केली तरी चालेल.
ही सारी प्रक्रिया गुगल फॉर्म व्दारे तयार करण्यात येईल.
Lockdown 0.1 काय आहे वाचले का..
आपल्याला ही संकल्पना आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर व कॉमेंट्स करा.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
[…] Lokcdown 0.2 वाचले का… […]