कोव्हीड -१९ पासून काय शिकलात?
कोरोना व्हायरस जगभरात थैमान घातल्यानंतर योग्य काळजी मुळे, सोशल डिन्संटींग व आयसोलेशन मुळे तो आटोक्यात आला आहेच. पण हा आजार आटोक्त्यायात येण्चीयाची मूळ कारणे पण लक्षात घेतली पाहिजे.
याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत.
- स्वच्छ व प्राणवायू युक्त हवा
- प्रतिकार शक्ती (आहार)
कोव्हीड १९ चा प्रवास ( नोव्हेंबर १९-चीन ते आजतागत ) लक्षात घेतला तर अशा ठिकाणी जास्त वाढलेला दिसतो ज्याठिकाणी अधिक व दाट लोकवस्ती (वर्दळ) आहे. सोबत असा ठिकाणं किंवा शहरं आहेत ज्या ठिकाणी वाहनामुळे, उद्योगामुळे कार्बन उर्त्सजन व धुळीचे (बांधकाम) प्रमाण अधिक आहे.
आयसोलेशन व सोशल डिटन्स्टींग ही मानवी उपाय योजना असली तरी स्वच्छ व प्राणवायू युक्त हवा व प्रतिकार शक्ती (आहार) नैसर्गिक कारणामुळे तो आटोक्यात आला आहे. खर तर हा अपघात असण्याची शक्यता असली तरी जैविक युध्दाचे चाचपणी (मॉकड्रील) म्हणण्यासही बराच वाव आहे. याचा अर्थ असा होतो कि भविष्यात असे अपघात होणारच नाही असेही म्हणता येणार नाही व युध्द असल्यास ते येथेच थांबले असेही म्हणता येणार नाही. त्यामुळे भविष्यात लॉकडाऊनला वारंवार व अनिश्चित काळासाठीही सामोरे जावे लागू शकते याची विचार आजच करून ठेवला पाहिजे.. त्या दृष्टीने आजच काही दिर्घकालीन उपाय योजना केल्या पाहिजेत.
त्यातील आम्ही करत असलेल्या गच्चीवरची भाजीपाल्याची बाग या चष्म्यातून पाहिल्यास काही गोष्टी स्पष्ट दिसतात. ज्या लेखाच्या वरील गोष्टीशी पुरक आहेत.
- आपल्या घर परिसरात, बाल्कनीत, गच्चीवर भाजीपाल्याची बाग फुलवणे होय. यातून दोन गोष्टी साध्य होतात. एकतर ही प्राणवायू तयार करणारी Privet Oxygen Hub आहेत. ज्याचा आम्ही कोणत्याही वेळेस त्याचा उपयोग करू शकतो. दुसर असे की आपल्याला संसर्गमुक्त भाज्या व त्यासुध्दा रसायनमुक्त मिळू शकतात. आजच्या कठीण परिस्थीतीने हे स्पष्ट केले की आपल्या हाती पैसा असला तरी वेळेवर भाजीसुध्दा विकत घेता येत नाही. त्यामुळे घरी भाज्या पिकवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
- कोव्हीड-१९ या आजारापासून, वाचण्याचे प्रमाण अशाच लोकांमधे अधिक आहेत. ज्यांच्यामधे प्रतिकार शक्ती अधिक आहे. अर्थात वयोवृध्दांनासुध्दा योग्य आहार म्हणजे पोषक घटक असलेला, रसायनमुक्त आहार मिळाल्यास ते सुध्दा या विषाणूशी लढा देवू शकतात. आजच्या रासायनिक कृषी पध्दतीत आपल्याला कमी कालावधीत तयार झालेला पोषक घटकांचा अभाव असलेले अन्न सेवन करत आहोत. त्यामुळे त्यातून प्रतिकार शक्ती वाढत नाही. त्यामुळे आपण घरीच पिकवलेल्या भाज्या खाल्या तर नक्कीच त्याचा फायदा होईल.
तर भविष्यात आजच या विषयात तन, मन, धनाने गुंतवणूक करा.. त्यातून ज्ञान , माहिती मिळवू शकता तसेच भाजीपाला बागेचा सेटअप इंन्स्टॉल करून शिकू शकता.
भाजीपाला सेटविषयीअधिक माहितीसाठी वाचा..
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक., 9850569644
You must be logged in to post a comment.