झाडावरील पपई कशी काढाल…

बरेचदा आपण आपल्या घर परिसरात पपई लागवड करत असतो. रसायनमुक्त पपई ही उंच वाढते किंवा ती कालातंराने वाढत वाढत उंच होत जाते. पपईचा आकार छोटा असला तरी तिचा जिवनक्रम पूर्ण होईपर्यत पपई देत असते. आपण लावलेले झाड व केवळ पपया छोटया येतात म्हणून काढून टाकणे जिवावर येते. अशा उंच झाडांची फळे विशेषतः पपईची फळे कशी काढायाची याची चिंता नेहमी असते. बरेचदा मंडळी हात पुरतो तो पर्यंत पपई काढतात. नंतर काढणे सोडून देतात. केवळ हात पूरत नाही म्हणून त्या झाडावरच पिकून खराब होतात. तर  काही मंडळी झाडं हलवून पपई खाली झेलण्याचा प्रयत्न करतात. पण या प्रयत्नात पपई जमीनीवर पडून फूटण्याची शक्यता असते. तसेच कमी अधिक धक्का लागल्यास कच्च्या पपया पण खाली पडतात. या अडचणीशी मी पण बराच काळ झडगत होतो. पण एक कल्पना सुचली. त्यात बदल करत गेलो.

काय करावे. पाच लिटरची कॅन घ्यावी. तिचा तळभाघ पूर्ण काढून घ्यावा. आपल्याकडे लांब काठी, बांबू असल्यास कॅनचे तोंड (झाकड काढून घ्यावे) ते त्यात काठीत रूतवावे. ( पी.व्ही.सी. पाईप घेवू नये. तो वजनाने वाकून जातो)  काठी निघू नये म्हणून कॅनचे तोंड व काठी ही खिळ्याने, तारेने बांधून घ्यावी. सोबत फोटो दिला आहे. या साधनामुळए अपेक्षीत पपईच्या खाली कॅन न्यावी. व काठीने खालून हळूच धक्का दिल्यास कॅनमधे पपई अलगद येते. काठी छोटी असल्यास खूर्चीचा वापर करता येतो.

संदीप चव्हाण,गच्चीवरची बाग, नाशिक.