दोबोमपग जोला
ओव्याची पाने…

बरेचा बागेची हौस असणार्या मंडळींना ओवा व ओव्याचा गंध असलेली ओव्याची पाने एकच मानतात. पण हे वेगवेगळे आहेत. आपण जो फोडणीत ओवा टाकतो ते ओव्याचे बिज असते. ते पेरून पाहिले तर त्याची रोपे गाजर, शेफू सारखी लांब, पातळ पाने असतात. त्याला जो ओवा येतो तो म्हणजे फोडणीचा ओवा होय.

ओव्याची पाने ही गोलाकार, मासंल, जाड असतात. दाटीवाटीने फांद्या येवून त्यास योग्य वातावरण लाभल्यास असंख्य पाने येतात. यालापण बारिक, नाजुक निळी फुले येतात. पण त्यात बिज हे हाती लागत नाही इतके बारिक असते. ओव्याची पानांची भजी चवीला छान लागते. त्याची चटनी चविला छान लागते. त्याची पावडर करून ठेवल्यास त्याचा वरचेवर भाजीला फोडणी देतांना, पराठे करतांना त्याचा वापर करू शकता.

पावडर कशी बनवावीः आपल्याकडे ओव्याचे पानांचे झुडुप असल्यास त्यास वर्षा, सहामहिण्यातून कंटीग करणे गरजेचे असते. त्याची पानांवर रेषा असतात. त्यात धुळ बसण्याची शक्यता असते. अशी पाने खुडून, त्यास स्वच्छ धुवून घ्यावीत. त्याचे बारिक काप करून घ्यावेत. त्यास चाळणीत भरून कापड झाकून त्याचे निर्जलीकरण करून घ्यावे.  त्यानंतर मिक्सर मधे बारिक करून घ्यावेत.

भजी कशी करावीः भजीसाठी बेसनपिठाते जे जे वापरतो ते टाकून घ्यावे. त्यांनतर अखंड पान, किंवा अर्धे पान बेसनपिठात बुडवून भजी तळावी. अगदीच पातळ पिठात भिजवून केल्यास त्याचे पकोडे ही कुरकुरीत होतात. व चविला छान लागतात.

ओव्याची पाने कफ नाशक आहेत. तसेच पुदीना सारखी चटणी करून चाटण केल्यास तापही नियंत्रीत होतो. सर्दी झाल्यास त्याची वाफ घ्यावी. आराम पडतो. तुळशी सारखे रोज दोन पाने खाल्ले तरी आरोग्यदायी ठरते.  हे झुडुप कमी पाण्यावर तग धरणारे आहे. त्यास लख्य ऊन मिळत असल्यास चविला तिष्ण, तेज, तिखट होतात. तर सावलीत असल्यास, पाणी जास्त असल्यास ते पानचंट लागतात. ओव्याची पाने रोज वापरत नसलो तरी चिभेला वेगळी चव म्हणून त्याचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. ते फ्लॅट संस्कृतीत कुंड्यामधील जागेतही छान बहरतात. त्यास तशी खताची गरज नसते. पण पाणी जास्त झाल्यास मुळकुज होण्याची शक्यता असते. हे रूजायला सहज रूजते. त्याची फांदी आणून छाट पध्दतीने लागवड करावी. फांदी काही दिवस माती व पाण्याविनाही तग धरू शकते. त्यांची नंतरही लागवड केल्यास त्यास मुळे फुटतात. फांदी ही कडक असते. शक्यतो हाताने तोडण्यापेक्षा कैचीने कापून घ्यावीत.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.