How to care Jasmine?
मोगर्याची काळजी कशी घ्याल ?
या वर्षी वाढलेल्या तापमानाचा पारा व लांबलेला उन्हाळा यामुळे प्रत्येकाच्याच दारी मोगरा छानपैकी फुलला. त्यामुळे त्याला पुढील वर्षीपण तशाच कळ्याचा साज यावा असे वाटत असेल तर काय काळजी घ्याला. पण पावसाळयाच्या तोंडावर मोगर्याला कळ्या येत आहेतच. पण या कळ्या आकाराने लहान झाल्या आहेत.
थोडक्यात त्याचा मोसम आता संपला… मोगर्याला फूल येऊन गेली तर आपण त्याला आहे तसा पुढील वर्षासाठी सोडून देतो. पण त्याची टप्प्या- टप्प्यावर काळजी घेणे गरजेचे असते.
- मोगर्याला फूल येऊन गेलीत की कळ्याचा आकार लहान झाला असेल किंवा या वर्षी फूलंच आली नसतील तर आता त्याची हार्ड कंटीग करणे गरजेचे आहे. हार्ड कंटींग म्हणजे त्यास बुंध्यापासून १ ते दीड फूट उंचीवर झाटणी करून घ्या… म्हणजे पावसाळ्यात त्यास फूटवा फूटून त्यास छान पर्णसंभार तयार होईल.
- पाऊसात थोडाफार ताण पडला तरी मोगर्याला पाणी देवू नका… साधारण नोव्हेंबर च्या सुमारास त्यास हलकी कंटीग करा… हलकी कंटीग म्हणजे वाढलेला मोगर्याची शेंड्याकडून सहा ते नऊ इंच कापणी करावी.
- मोगर्याला पावसाळ्यात लेंडीखत, शेणखत पूरवा…
- शक्य झाल्यास त्यात मिरचीचे रोपे लावा… मोगरा व मिरची ही चांगले वाढतात. म्हणजे मोगर्याला फूल येण्यास अवकाश असल्यामुळे मिरचीली मिरच्या भरपूर लागतात. तर मोगर्याला उन्हाळ्यात भरपूर फूले येतात.
- मोगर्याचे कंटीग करतांना काळजी घ्या.. पाऊस तास दोन तास थांबेल याचा अंदाज घेवून मोगर्याची कंटीग करा. कंटीग म्हणजे फांदीला तिरपा छाट द्यावा. म्हणजे पावसाचे पाणी त्यावर संग्रह होणार नाही.
- कुंडी रिपॅटीग करावयाची असल्यास त्यास फेब्रुवारीपर्यंत अनुकुल कालावधी असतो.
- जुन्या मोगर्यावर पांढरी डाग असलेली, जूनाट झालेली, रट झालेली पाने, काढून टाकावीत. म्हणजे त्यांची जागा नवी पालवी घेते.
- एखादा वठलेला, वाढ होत नसलेला मोगरा असेन त्यास फेब्रुवारी मधे निपर्ण करावा. निपर्ण म्हणजे त्याची सगळी पाने काढून टाकावी. फक्त काड्या ठेवाव्यात.
- बाकी पावसाळ्यात वेगवेगळी फवारणी करत राहवी.
- मोगर्यात मोगरा, बट मोगरा, मदनबाण, वेली मोगरा असे प्रकार असतात.
- सध्या नर्सरीमधे बारमाही मोगरा येतो. या सर्वांना वर सांगितल्या प्रमाणे काळजी घेता येते.
गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक. 9850569644 / 8087475242
http://www.gacchivarchibaug.in
पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…टीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… ९८५०५६९६४४
*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644