पावसाळ्यात बागेची काळजी कशी घ्यावी.

vertical garden 1 1 (18)

How to care terrace garden in rainy season by गच्चीवरची बाग, नाशिक.

पावसाळ्यात गच्चीवरची बागेची विशेष तर्हेने घ्यावयाची काळजी…

टेरेसवर आपण बाग फुलवली असल्यास पावसाळ्यात विशेष तर्हेने काळजी घेणे गरजेचे असते.

टेरेस नेहमी स्वच्छ ठेवा, शक्यतो खराट्याने झाडून घ्या. टेरेसवर पडलेल्या पालापाचोळा हा एक गोळा करून पोत्यात अथवा बादलीत किंवा झाडाच्या मुळांशी टाका.

टेरेसवर काही ठिकाणी पाणी थोडेफार साचत असल्यास जमेल तसे पाणी खराट्याने काढून टाका.

जेथून पाणी वाहून जाते तो पाईप, अथवा ति जागा स्वच्छ, विना अडथळाअसावी याची काळजी घ्यावी. तेथील आजू बाजूला असलेल्या रोपांच्या पिशव्या, कुंड्या बाजूला करून घ्या.

बरेचदा जेथे कुंड्या, वाफे नसतात तेथे उन्हाळात टेरेसवरील सिमेंटला पापडी येण्याची शक्यता असते. अशा वेळेस त्या ठिकाणीची वाळी, सिमेंटची पापडी काढून टाका. त्यात कोरडे व्हाईट सिमेंट टाका. त्यावर टोपली ठेवून द्या म्हणजे पाऊस आला तरी त्यास नुकसान न पोहचता वाळून कडक होऊ शकते.

सात आठ दिवस सलग रिमझिम पाऊस येत असल्यास टेरेस वर शेवाळ येण्याची सुरवात असते. यावरून पाय घसरून पडण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी जाड मिठ टाकावे. नंतर खराट्याने झाडून घ्यावे.

गच्चीवरील झाडांवर, रोपांवर या काळात पाने खाणार्या अळीचे प्रमाण वाढते. अशा वेळेस पावसाची उगडीप झाल्यानंतर उग्रवासाचे पदार्थाचे पाणी टाकून फवारणी करावी. उदाः जिवामृत पाणी, गोमुत्र पाणी, मिठ पाणी, तंबाखू पाणी, ताक पाणी, चूना पाणी यांची फवारणी करावी.

निरक्षण शक्ती वाढवावी. निरिक्षणात आलेल्या अळ्या या वेचून फेकून द्याव्यात. गोगलगायीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते अशा वेळेस त्या वेचून फेकून द्या किंवा त्यावर तंबाखू पावडर टाकावी.

उन्हाळ्यात उन्हापासून बचावासाठी हिरवे कापड लावले असल्यास ते काढून टाका. बागेत हवा खेळती राहू द्या. कारण बागेत हवा खेळती नसेल तर कीड वाढण्याची शक्यता असते.

कुंड्यामधे पाणी साचत असल्यास कुंड्याचे खालील छिद्र ही मोठी करावीत अथवा लोखंडी सळई टाकून कुंडीत तळाशी साचलेला गाळ काढून टाकावा म्हणजे अधिकच्या पाण्याचा निचरा होईल.

कुठे पाणी साठत असल्यास ते उपडे करून ठेवावेत म्हणजे डासांची निर्मीती होणार नाही.

वेलवर्गीय बियांची लागवड केली असल्यास वेळेतच त्यास मंडप तयार करा त्यास दिशा द्या. म्हणजे वेलाचा गुंता व पसारा हा आटोपशीर असेन.

किचन वेस्ट कंपोस्टींग करत असाल तर त्यात पावसाचे पाणी जाणार नाही याची काळजी घ्या.

कुंड्यामधून माती ओव्हरफ्लो होत असेन तर मूठ-मूठ भर माती काढून ति दुसरीकडे संग्रहीत करा.

नव्या बियाणं लागवड करा. १० ते १५ दिवसात उगवल्या नाहीत तर नवीन लागवड करा.

वाफा किंवा कुंडीच्या बाहेर आलेली गांडूळे ही पुन्हा वेचून तेथेच टाका.

पावसाळ्यात कुंड्यामधील जास्तीचे पाणी वाहून जाते त्यासोबत पाण्यात खत व इतर द्रव्येही वाहून जातात. अशा वेळेस शक्य असल्यास हे पाणी संग्रहीत करा. पाऊस लांबणीवर पडला तर हे पाणी पुन्हा झाडांना देता येते.

गच्चीवरची बाग, नाशिक. संदीप चव्हाण,

9850569644 / 8087475242

http://www.gacchivarchibaug.in

IMG_20190301_155819_761

जाहिरात: उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर करून घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला पिकवा. गच्चीवरची बाग पुस्तक (व्दितीय आवृत्ती)
घरपोहोच by post 240/-
WTS app 9850569644 / 8087475242

संदीप चव्हाण नाशिक.

Advertisements
Advertisements