गोगलगाय एक उपद्रवी किडा…

snail /Slug / Rowdy worm Control

गोगलगाय उपाय व काळजी

#Snail ‘‘गोगल गाय नि पोटात पाय’’ अशी आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे. दिसायला गरीब असली तरी तिच्या बागेतीलअस्तित्वामुळे आपल्याला काही विषारी बाधा वगैरे होत नसली तरी ती बागेसाठी बरीच उपद्रवी आहे. त्यामुळेच वरील म्हण सार्थक ठरते.

आपण मोठ्या कष्टाने बाग फुलवतो. गच्चीवर भाजीपाला लावतो आणि ह्या गोगलगायी येऊन त्यावर डल्ला मारतात. जर संख्या जास्त झाली तर फ्लावर, कॅबेज यामध्ये छोट्या छोट्या गोगलगाई जाऊन निवास करतात व अशा वेळेस हा भाजीपाला निवडणं हा मोठा वैताग होतो.

ही सुरवातीला एक असली तर तिची प्रजोत्पादनाची क्षमता बरीच असल्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाते. बरेचदा गोगलगायीचा प्रादुर्भाव हा नर्सरीतून आणलेल्या रोपांना, प्लास्टिक बॅगच्या आत मध्ये बाहेरच्या कडेला त्यांचं अस्तित्व आढळून येते. या गोगलगायी पान खाऊन, झाडांची खोडे कुरतडून त्यांचा नाश करतात. गोगलगाय या उभयलिंगी असतात म्हणजे प्रजोत्पादनासाठी नर किंवा मादी अशी गरज नसते. त्यामुळे यांना बागेत त्यांचे अस्तित्व सहन करू नका. वेळीच त्यांचा बंदोबस्त केलेला बरा. बरं ह्या किड्याला फक्त भारद्वाज व कोंबड्या खातात इतर कोणताही पक्षी त्यांना चोच लावत नाही. त्यामुळे त्यांची संख्या वाढतच जाते. तसेच यांचा बागेत फिरण्याचा काळ हा सायंकाळी किंवा रात्री पहाटेपर्यंत असतो. त्या पाण्यात राहत नाहीत. त्या ओलावा असेल तेथे राहतात. (पुढे वाचा)

उन्हाळ्यात किंवा कोरड्या वातावरणात या गोगलगायी काळ्या रंगाच्या होतात तर पावसाळ्यात ह्या पांढऱ्या, उजळ रंगाच्या दिसतात.खरंतर आपल्या बागेत गोगलगाय होणं म्हणजे बागेतलं कॅल्शियम कमी होण्याचं दर्शक आहे. अशा वेळेस बागेत चुना पाण्याची फवारणी करावी म्हणजे गोगलगाई ही नष्ट होतात. तसेच यांचा बंदोबस्त करण्यासाठी यांना वेचून फेकून देणे , त्यांना वेचून तंबाखूच्या पाण्यात किंवा तंबाखू पावडरच्या डब्यात टाकणं हा एक उपाय आहे पण हे बरेच जण किळसवाणी वेळखाऊ काम आहे. त्यापेक्षा दिसली गोगलगाय की त्यावर तंबाखू पावडर टाकणं हा एक उत्तम पर्याय आहे.

गोगलगायीला स्थानिक भाषेत शेम्बडी असे म्हणतात ती जिथून जाते तिथे चिकट स्राव सोडतात त्यामुळे ती किळसवाणी वाटते परंतु जपान मध्ये चेहऱ्यावर फिरवून फिरवणे ब्युटी थेरपी म्हणून वापरात आणली जाते.

तंबाखू पावडर झाडांच्या मुळ्या जवळ जरी पडली तरी त्याचा अपायकारक परिणाम होत नाही उलट तंबाखू पावडर मुळे झाडांना मूळकूज होणारा रोग नष्ट होतो. एकार्थाने तंबाखू पावडर ही झाडांसाठी बूस्टर म्हणून काम करते. आपल्याला हवी असल्यास ही पावडर आमच्याकडे उपलब्ध आहे 52/- किलो प्रमाणे मिळेल. कीड नियंत्रणासाठी वाचा…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कन्सल्टंट एवंम कोच