0 (7)
गणेश देवतेचे अनेक रूपं. त्यांच्या चित्र प्रतिमांचा संग्रह करायचा म्हटला की आयुष्य कमी पडेल. एवढे त्या विविधांगी चित्र, प्रतिमा. सर्व कार्यांची आरंभ देवता म्हणून गणेश देवाचे पुजन केले जाते. वर्षातून एकदा त्याची प्राण प्रतिष्ठा केली जाते. या निमित्त गच्चीवरची बाग, नाशिक. आपणासाठी अनोखी स्पर्धा आयोजन करत आहे.

प्लास्टर ऑफ पॅरीस चे बनवलेले गणेश मूर्ती पाण्यात विसर्जन केल्याने पाणी प्रदुर्षण होते. त्याच्या खालोखाल कमी प्रदुर्षण करणारी माती म्हणजे शाडू माती. पण ही फार चिकट असते. ती घरच्या कुंड्यामधेही त्याचे विसर्जन केले तरी ही माती लवकर बागेच्या मातीत मिसळत नाही. ओली राहीली तर चिकट गोळा म्हणून तसाच राहतो तर कोरडी राहिली तर दगड होतो. त्यानंतर जागृत नागरिकांनी पर्यावरण प्रेमीनीं शेतातील काळी माती, गोमयचे (शेण) गणपती बनवले .

पण काही जागरूक नागरिक गणेश उत्सवात या धरणीमातेचे, पाण्याचे प्रदुर्षन होऊ नये म्हणून  वेगवेगळे प्रयत्न करत असतात. त्याचाच विचार करून गच्चीवरची बाग व्दारे या स्पर्धेचे आयोजन करत आहे. आपल्याला फळभाज्यांपासून, तसेच नैसर्गिक वस्तूपासून उदाः (नारळ कंरवट्या, नारळाच्या फांद्या सारखे इतर वस्तू पासून) गणेशमूर्ती तयार करायची आहे. तसेच गणेश उत्सावात गणपती समोर काढली जाणारी रोजची  रांगोळी किंवा गणेश प्रतिमा ही पानांची, फुलांची असावी.

या स्पर्धेत भाग घेणार्या प्रत्येक व्यक्तिला आकर्षक सहभाग भेट दिली जाणार आहेच. पण प्रथम व उत्तेजनार्थ येणार्या विजेत्यांनांही भेट दिली जाणार आहे. शिवाय आपले व्हिडीओ, फोटो प्रझेंटेशनही आमच्या संकेतस्थळावर झळकणार आहे.

आपणास सोबतचा गुगुल फार्म भरून पाठवावा तसेच. आपण बनवलेली फळभाज्यांची, इतर नैसर्गिक संसाधनांनी बनवलेल्या गणेश मूर्तीचा फोटो. व आपण जितक्या दिवस गणपती बसवणार आहेत तेवढे दिवस पांनाची, फुलांची रांगोळीचे फोटो पाठवयाचे आहे. लक्षात घ्या.. रोज नवीन रांगोळी असल्यास उत्तम. कारण त्यातील संख्या, त्यातील सुंदरता, त्यात वापरलेले रंगसंगतीसाठी वापरलेले साहित्य हे पान, फुलंच असावी. इंटरनेट वरील प्रतिमा चालणार नाही.  शंका आल्यास आपणास स्पर्धेतून बाद केले जाईल. या स्पर्धेला स्थळांचे बंधन नाही. तुम्ही कुठूनही पाठवू शकता. तसेच एका वेळी एकाच कुटंबाला ( एका स्पर्धेकाला सहभाग घेता येईल) वयाचे बंधन नाही. 

स्पर्धेसाठी नाव नोंदणी १ संप्टेबर २०२१ रोजी सुरवात होईल. तर अंतीम दिनांक गणेश विसर्जनापर्यंत असेन.

तर चला तर सुरवात करूया…

Google Form साठी येथे क्लिक करा.. 

Email. sandeepkchavan79@gmail.com

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.