Important of wheat-grass
दूर्वाकूंर हे गणेश देवाला पुजा करतांना वाहिले जाते. गणेशदेवानां दुर्वांकूर वाहत असावे याचे काय कारण असावे?. खर तर ते त्यांचे आवडते गवत. दुर्वांकुराचा रस हा थंड असतो.. तसेच मेंदुच्या सुक्ष्म पेशीचे आयुष्य वाढतो. त्यामुळे बुध्दीला चालना मिळते. दुर्वांकूर हे देवाचा प्रसाद म्हणून आपणच त्याचा रस सेवन केला पाहिजे. कारण दुर्वांकूराचा तृणरस भूक वाढवते. या दिवसामधे भूक वाढली तरी पचन संस्थेचे कार्य मंदावलेले असते. दुर्वांकुरांच्या सेवनाने पंचन कार्य सुधारते. … हे झाले दुर्वांकुरांबद्दल…
दुर्वांकुरांच्या खालोखाल जर कोणती वनस्पती येत असेल तर ती म्हणजे गव्हांकूर…गव्हांकुरात तर कर्करोगात नुकसान पावलेल्या पेशी ही पूर्ववत होतात. गव्हांकूराला ग्रीन ब्लड, Green Blood म्हणतात. रक्ताभिसरणाची गती वाढवते. अनेक छोटया मोठ्या व असाध्य अशा तिनेशे हून अधिक आजारावर मात केल्याचे संसोधनाने सिध्द झाले आहे. गव्हाकुराला नैसर्गिक पूर्नांन्न असे म्हटले जाते.
गव्हांकूर रस बाजारातही मिळतो. पण संसर्ग, त्यात वापरली जाणारी रसायने याचा काही शाश्वती नसते. तसेच पॅकींग स्वरूपातील गव्हांकूर रस टाळावा. कारण ताज्या रसातच औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे गव्हांकूर हा घरीच उगवावा. रासायनिक खते वापरू नये. सेंद्रीय खताचा वापर करावा. घरीच उगवलेला गव्हांकराचा ताजा ताजा रस पिता येतो.
तर असे गव्हांकुर कसे, कुठे लागवड करावेत… कशा रितीने त्याचा रस तयार करावा… हे आपण या लेखात पाहणार आहोत.
आपल्या प्रत्येकाच्या घरी चार कुंड्या असतातच. त्यातीतच माती भुसभुशीत करून तुम्ही त्यात चिमुट चिमुट भर दाणे पेरावेत. सात दिवसांनी त्याचे पाती कापून मिकसर मधे त्याचा ज्यूस तयार करू शकतो. लक्षात ठेवा. सुरवातीला बचकभर गव्हाची पाती घेवून घट्ट असा रस तयार करू नका. तो आपल्या घशाखाली उतरणार नाही. त्यापेक्षा कमीत कमी रस पिण्याच्या पाण्यात जितके पातळ करून पिता येईल तेवढे प्यावे. गव्हाकूंराने चेहरा उजळतो. कार्यक्षमता वाढते. गव्हांकूरा मधे जीवनसत्वे, पाचक रस, क्षार व खनिजे असतात. Food Supplement म्हणूनही त्याचा वापर करता येतो. बरेचदा कॅल्शीयमच्या गोळ्या घेतो. गव्हांकूर घेत असल्यास त्याची कमतरता भरून निघते. आर्यन, मॅगेन्शीयम मिळते. गव्हांकुरात क्लोरोफिल जास्त प्रमाणात असते. ते नैसर्गिकरित्या जंतनाशकाचे काम करते.
आपण गच्चीवर बाग तयार केली असेन, रोज जाणे कंटाळवाणे वाटत असेन तर गव्हांकूराच्या रसाची सेवन करावे. त्या निमित्ताने रोज गहू लावणे, रोज पाती घेवून येणे हे होत जाईल. आपण रोज बागेत येता. झाडांशी बोलता याने झाडांनाही छान वाटेल. ते आपआपल्याला भरभरून परतावा देतील. एकदा चिमूटभर गहू लावले की त्याचे दोनवेळा काप घ्याव्यात तिसर्या कापामधे एवढे सत्व नसते. आपणाकडे वेळ, जागा असल्यास एकदाच काप घेतला तर उत्तम. तर एक – दोन कापानंतर गहू उपटून तेथेच खत म्हणून टाकून देवू शकता. गव्हाकूर लागवडीला कमीत कमी चार इंच खोलीची कोणतेही साधन चालते. उदा श्रीखंडाचे डब्बे, पसरट ट्रे असे काहीही चालते. एवढेच काय नवरात्रात मातीच्या गडू भोवती गहू लावले जातात. गव्हांकुराच्या महत्वामुळेच ते नवरात्र महोत्सवात त्याचे महत्व प्राप्त झाले आहे. पण आपण त्याचा फक्त पुजापाठसाठीच उपयोग करतो. त्यामुळे ती पण पध्दत चालू शकते. गव्हांकूराचा रस हा सकाळी उपाशी पोटी घ्यावा. तरच ते परिणामकारक ठरते. कफ प्रवृत्तीच्या लोकांनी हे टाळावे. कारण सर्दी, कफ वाढण्याची शकयता असते.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.