घरच्या घरी पालक भाजी कशी पिकवाल?

पालक ही भाजी तशी सर्वांची आवडती असो वा नसो पण पालकाचे कुरकुरीत भजे तर चविला अप्रतिम. त्यात बाहेर पावसाच्या सरी व गार वातावरण असेल तर विचारायलाच नको.. आणि त्याचे पराठे तर तोंडाला पाणी येईल, तसेच त्याचे सुप, ज्यूस सुध्दा तयार करते येते. शिवाय सलाड म्हणूनही कच्ची पाने खाता येतात अशी चवदार भाजी खायला कोण नाही म्हणणार….पण थोडं थांबा.. हे सारं तेव्हांच शक्य आहे, जेव्हा ही पालक भाजी जर घरी उगवलेली असेन तरच ही चव चाखता येईल. कारण बाजारातील पालक भाजी रसायनांवर उगवलेली असते. तिला अजिबात चव नसते. पाणचट भाजी म्हणजे काय त्याचा अस्सल नमुणा म्हणजे बाजारातील पालक भाजी..

पालक भाजीत लोहाचे प्रमाण अधिक असते. तसेच नैसर्गिक रित्या उगवलेल्या भाजीत जास्त मिठ टाकण्याची गरज नसते.

तर अशी पालक भाजी सहजतेने घरच्या घरी उगवता येते. पालक ही भाजी पालेभाजी या वर्गात मोडते.  पालकाचे शाश्त्रीय नाव स्पिनिसिया ओलेरोसिया असे आहे तर इंग्रजीत तिला Spinach असे म्हणतात. त्यामुळे पालक या भाजी वाढण्यास तास दोन तास उनाची गरज असते. पावसाच्या वातावरणात तर जाम फोफावते.

पालक या भाजीत अनेक प्रकार आहे. प्रदेशाच्या वातावरणानुसार त्याच्या आकारात, चवीत अशंता हा बदल झालेला असतो. तर पालक ही भाजी पालेभाजी या वर्गात येत असल्यामुळे त्यास चार इंच खोलीची कोणतीही कुंडी चालते. एवढेच काय तर घरी उपलब्ध असलेल्या कोल्ड्रींकच्या बाटल्यामधे सुध्दा पालक भाजी उगवता येते.

पालक भाजी ही बियाणांपासून उगवता येते. तसेच बाजारातून आणलेल्या पालक भाजीच्या देठांची आपण पूर्नलागवड केली तर त्यापासूनही पालकभाजी पिकवता येते.

आपण चौकोनी कुंडीत, वाफ्यात पालेभाजीच्या बिया लागवड करणार असाल तर दोन बोटांच्या चिमटीत बसतील एवढी दोन-तीन दाणे पेरभर ( एक इंच) खोलीत रूजवावे. या  बिया रूंजवतांना चार बोटांचे अंतर ठेवले तरी चालते. यात जर आपण शेफूच्या बिया लावल्या तर त्यांची वाढही जोमाने होते. पण आपण शितपेयाच्या बाटलीत लागवड करत असल्यास एकाच ठिकाणी दोन-तीन बियाणं लागवड करावी.

बरेचदा इच्छुक हे एका चौरस फुटात मुठ भर बियाणे पेरतात. त्यांची योग्य ती वाढ होत नाही. अशा रितीने लागवड केलेल्या पालक ही बेबी स्पिनच म्हणून ओळखली जाते.

बिया रूजवून येण्यास सात ते दहा दिवस लागतात. त्यानंतर त्यांची वाढ ही अगदीच संथ असते. पण एकदा का त्याने मूळ धरले की त्याची वाढ वेगाने होते. घरी आलेला पालक हा मुळासहित कधीही काढू नये. त्याची केवळे पाने कापावीत. अशा रितीने आपण पाच-सहा वेळेस खुडे करू शकतो. त्यांनंतर त्यास बियाणांसाठी जाड दांडी येते. आपणास बियाणं हवे असल्यास त्यास पोसू द्यावे. पण त्यापासून आलेले बियाणांपासून पुन्हा पालक येईलच याची खात्री नसते. त्यामुळे असा जाड दांडा अल्यास त्यास वेळीच काढून टाकावे. म्हणजे पुन्हा त्यास पाने येत राहतात. पालकाला आलेले बियाणं हे खूप नाजूक असते. उदाः  पुठ्ठया सारखे मऊ असते. त्यास पाणी अथवा दमट हवामानात ते मलूल होऊन जातात. अधिक पाण्याने अथवा दमट हवामानाने यांची अंकुरण क्षमता नष्ट पावते.

अशा पालकांच्या रोपांवर आपण जर गोलाकर प्लास्टिक बरणीचे आवरण दिल्यास यांची वाढ जलद होते खरी पण त्याची नैसर्गिक चव ही गमावून बसतो.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.