New Home Garden Setup

नवीन घर व बंगल्याभोवती बाग फुलवण्याआधी….

घरा भोवती, बंगल्या भोवती बाग कशी फुलवावी यासाठी मार्गदर्शनासाठी इच्छुक नेहमी बोलावत असतात. मला बरेचदा असा अनुभव आला की बंगला, घराच्या व्हराड्यात ( जेथे लॉन्स असते.) व संरक्षक भितींच्या आतमधे जी काही साईड पट्टी असते. तेथे कालातरांने झाडे येईनासे होतात. कारण तेथील माती घट्ट झालेली असते. बरेचदा विकसकाकडून इमारत बांधकामाचे डेब्रिज टाकून वरून दीड दोन फूटाच्या जाडीचे लाल माती टाकली जाते. त्यामुळे तेथील माती घट्ट झाल्याचे लक्षात आले आहे. अशा घट्ट मातीत छोटी फुलांची झाडे येईनासे होतात.

अशा ठिकाणी कालांतराने कितीही खत टाकली तरी बागेला हवा तसा बहार, ताजा टवटवीत पणा राहत नाही.

हे असे का होते याचे पहिल्यांदा कारण शोधले असता असे लक्षात आले की विकसक हा केवळ लालमातीचा थर देतो. पण प्रत्यक्ष त्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे केल्यास तुमच्या बागेला निरंतर खताचा प्रवाह सुरू राहील तसेच माती घट्ट होणार नाही. कारण या तंत्रात पालापाचोळा, काड्या या हळू हळू कुजतात. त्यातून वेळोवेळी खत मिळत राहतेच पण मातीत सच्छिद्रता तयार होईल लालमाती ही हलकी व उत्पादनशील बनते.

त्यासाठी पहिल्यादां एक फूट मुरूम टाकावा. त्यावर पालापाचोळा, लाकडे, काड्या, ओंडके, टाकावेत त्यावर माती टाकावी. या तंत्रामुळे मातीसुध्दा कमी लागते व लागवड केलेल्या झाडांना खताचा निरंतर पुरवठा होत असतो.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

 

भाजीपाला बागेला सुरूवात करण्यापूर्वी ही ई पुस्तके वाचावीत..
घराभोवती पेव्हर ब्लॉक मधील बगीचा कसा फुलवावा?