बागेत फवारणी, केव्हां, कधी..कशी.…
निसर्गाला जपण्यासाठी आपण घरा, दारात फळा, फुलांची व भाजीपाल्याची बाग फुलवतो. रासायनिक खते व रासायनिक फवारणी सोडून देणे हे तर सर्वात्तम अशी निसर्गाची सेवा म्हटली पाहिजे. त्याएवजी आपण नैसर्गिक किडनियंकं फवारणे सर्वात्तम आहे. रासायनिक खतं ही कीडनाशक आहेत तर नैसर्गिक औषधे फवारणे हे कीडनियंत्रक म्हणून वापरता येतात.
कीड नियंत्रक व कीड नाशक यात दोन टोकांचे अंतर आहे. कीडनियंत्रण म्हणजे कीडीला पळवून लावणे, तिच्या प्रजनन चक्राच्या गतीत बाधा आणणे किंवा गती कमी करणे होय. तर कीड नाशक म्हणजे कीड संपवून टाकणे, मारून टाकणे, तिचा नाश करणे. कीडीचा नाश करणे एका अर्थाने जैवविवधतेत केवळ बाधाच नाही तर ती साखळीच तोडून टाकण्यासारखे आहे. जीव जीवस्य जीवनम् ही आपली संस्कृती आहे. ती रासायनिक फवारण्याने नष्ट होते. त्याने मातीतील सुक्ष्म जीवांणूचाही नाश होतो. व माती नापिक बनते.
तर कीड नियंत्रणात त्यांना ठराविक पिकावरून हाकलून लावले जाते. त्यांची घरे ही मोठ्या झाडांवर, जंगली झुडुपांवर आहे. त्यांना आमच्या बागेत लुडबुड करू नये म्हणून मारलेले उग्र वासाचे, गंधाचे द्रव म्हणजे कीड नियंत्रक होय. कीड ही उग्र गंधाला धोका समजते. उग्र गंधामुळे त्याच्या प्रजनन चक्रात बिघाड होतो. तर अशी उग्रवासाची कीड नियंत्रकं हो घरच्या घरी तयार करता येतात.
तर आपण कीड नियंत्रकांची माहिती घेवू या..
गोमुत्र हे उग्र, तिव्र गंधाचे नैसर्गिक द्रव्य आहे. जीवामृत हे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले उच्च जीवाणू युक्त द्रावण आहे. दशपर्णी सुध्दा हे उग्र व विविध गंधाचे कडवट द्रावण आहे. या सार्यामुळे कोणत्याही सजीव प्राण्याला धोका पोहचत नाही. जेवढा रासायनिक फवारणीमुळे पोहचतो.
आज रासायनिक कीडनाशकांची तिव्रता वाढत चाललीय पण कीड मरत नाही. उलट ती वाढत जाते. याचे कारण म्हणजे कीडींचे आयुष्य हे अल्पकाळ असते. पहिल्या पिढीने पचवलेले थोडेफार विष हे पुढील पिढी जास्त प्रमाणात पचवू लागते. म्हणूनच एन्डोसंल्फान, राऊंडअप सारखी इतर कीड व तण नाशकांची तिव्रता वाढवूनही कीड जात नाही. माणसं नुसती गंधाने मरतात पण कीड नाही. हे सत्य समोर आले आहे.
याच तंत्रात कीड नियंत्रक हे प्रभावी ठरतात. पण त्यातही विविधता असणं गरजेचं आहे. आपण फक्त बागेला एकच प्रकारचे कीड नियंत्रक वापरत असाल तर ते चूकीचे आहे. कारण काही काळ कीड त्याला प्रतिसाद देईलही पण पुन्हा ती वाढू लागेल. कारण आधीच्या पिढीने ते पचवायची क्षमता मिळवलेली असते. अशा वेळेस आपणास दर पंधरा दिवसांनी वेगवेगळी फवारणी केली पाहिजे.
- गोमुत्र पाणी २) जीवामृत पाणी ३) चुना पाणी ४) हिंग पाणी ५) साधे पाणी ६) निमार्क फवारणी ७) निमतेल-साबणाचे मिश्त्रण किंवा फक्त साबण पाणी फवारणी (पालेभाजीवर करू नये) ८) लिंबू पाणी इत्यादी.
अशारितीने फवारणीत विविधता ठेवल्यास कीड ही नियंत्रणात, आटोक्यात राहते. ठराविक कालावधीनंतर ओळखू न येणारा गंध आल्याने त्या आपले मुक्कामाचे ठिकाण इतरत्र हलवतात.
जीवामृत फवारणी ही सुर्योद्य ते सुर्यास्त दरम्यान करावी कारण ते संजीवक म्हणून काम करत असते. त्यातील जीवाणूंची संख्या ही केवळ उन्हातच वाढते. तर फवारणी ही सायंकाळी ५-६ वाजेनंतर करावी. कारण त्याचा तिव्र गंध हा उन्हाच्या प्रखरतेत सुकून जात नाही किंवा त्याचे बाष्फीभवन होत नाही. तसेच बरीचसी कीड ही निशाचर असते म्हणजे रात्रीच्या वेळेस त्या अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतात.
महत्वाचे म्हणजे फवारणी हेच केवळ बागेतील कीड नियंत्रणाचे तंत्र नाही हे आवर्जून लक्षात घ्या.. आपण अर्जिणावर किंवा असीडिटी वर औषध घेताहेत नि खाणं चालूच ठेवलं तर औषधाचा परिणाम होत नाही तसेच झाडाला पाणी जास्त होणं, पाण्याची योग्य वाफसा न होणारी घट्ट माती मुळाशी असणं, पाणी योग्य रित्या निचरा न होणं हे लक्षणेही लक्षात घेवून त्यावर उपाय करणं गरजेचं आहे.
तसेच कीड नियंत्रण हे करतांना कीड कोणती आहे हे लक्षात घेणं गरजेचे आहे. रसशोषक कीड, पानं खाणारी कीड (अळी) की विषाणूजन्य कीड आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांचा ठराविक असा काळ नसतो. त्यामुळे वरील कीडनियंत्रक ही आलटून पालटून फवारल्यास कीडीच्या त्रासापासून मुक्तता होते. तसेच मित्र कीटक ओळखता आली पाहिजेत. मुंग्या, मधमाशा, गांडूळ, कंपोस्ट खतातील कीडे ही आपली मित्र आहे. काही मंडळी कीडमुक्त मातीत झाडे जगवतात. अशी माती ही कालातरांने निर्जीव व नापिक बनते. सुपिक माती बनवण्यासाठी निसर्गाला हजारो वर्ष लागलीत. ही माती सुंगधी व सुपिक बनण्यासाठी हजारो सुक्ष्म जीवांचे, कीडीचे खतात रूपंतार झालेले असते. हे विसरता कामा नये.
सारीच कामे माळ्याने करावीत असे मुळीच नाही. तो फक्त आपल्या बागेचे पालकत्व स्विकारू शकतो. बागेचे मातृत्व हे त्या त्या कुटुंबानेच स्विकारायचे असते. मधल्या काळात बागेची काळजी हे कुटुंबानेच घेतली पाहिजे. तरच आपली बाग छान, टवटवीत व सुंदर होईल.
लेख आवडल्यास नक्कीच शेअर, कंमेट व लाईक करा.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. ९८५०५६९६४४
http://www.gacchivarchibaug.in
[…] तंबाखू पावडर झाडांच्या मुळ्या जवळ जरी पडली तरी त्याचा अपायकारक परिणाम होत नाही उलट तंबाखू पावडर मुळे झाडांना मूळकूज होणारा रोग नष्ट होतो. एकार्थाने तंबाखू पावडर ही झाडांसाठी बूस्टर म्हणून काम करते. आपल्याला हवी असल्यास ही पावडर आमच्याकडे उपलब्ध आहे 52/- किलो प्रमाणे मिळेल. कीड नियंत्रणासाठी वाचा… […]
[…] वापरावयाचे प्रमाणः एक लिटर दशपर्णी अर्कात आपण दहा लिटर पाणी मिश्त्रण करून तीन सायंकाळी सलग फवारावे. म्हणजे कीड नियंत्रीत होते. कीड नियंत्रणाचा लेख वाचा… […]
[…] एक लिटर गौमुत्रात दहा लिटर पाणी टाकून सायंकाळच्या वेळेस फवारणी करावी. कीडीचा प्रार्दुभाव असल्यास सलग तीन सायंकाळी फवारणी करावी. आम्ही स्वतः स्थानिक प्रजातीची गाय पाळली असून तिचे गौमुत्र बागेसाठी संग्रहीत करतो. नाशिककरांना हवे असल्यास विकत मिळेल. कीड नियंत्रणासाठी अधिक वाचा… […]
[…] खत कसे तयार करावे, बिज कसे लागवड करावे, कीड नियंत्रण कशी करावी या संदर्भात माहिती देण्यात […]