1809755

गच्चीवरची बाग गेल्या सात वर्षापासून लोकांचा सृजनशील पध्दतीने पर्यावरण संवर्धान सहभाग घेण्यासाठी पूर्णवेळ काम करत आहे. निसर्गाला पुरक असे काही उपक्रम, विक्री व सेवा पुरवत आहोत.

आम्ही उपक्रम (Programme) विक्री (sale) व सेवा…(Services) या तीन प्रकारात काम करत आहोत.

A) उपक्रम (Programme)

  1. गच्चीवरची बागेला भेट द्या… माहे जून ते फेब्रु. अशा महिण्यात आपण गच्चीवरची बाग या प्रकल्पाला व्यक्तिगत किंवा कौटुबिक भेट देवू शकता. आमच्या गच्चीवर साकारलेली बाग आपल्याला बघता येईल. आपण आमच्या सारखे भाजीपाला उत्पादीत करण्याची इच्छा असल्यास आपण विचारलेल्या प्रश्नांची सारी उत्तरे दिली जातात. यात आपण कचरा व्यवस्थापनाचे मॅडेल्स, बाग फुलवण्यासाठी साधन ( नर्सरी बॅग्ज, वाफा) पध्दती पाहू शकता. कंपोस्टर कम ग्रोअर ड्रम, डेव्हील डायजेस्टर ( आल इन वन कंपोस्टर) इ. प्रकल्प खरकटे पाण्याचा उपयोग पाहू शकता. तसेच या विषयावर चर्चा करू शकता. ( शुल्क हे ऐच्छिक आहे) (फोन वर संपर्क साधून भेटीची वेळ ठरवावी.)
  2. गच्चीवरची बाग एक्सटेशनः गच्चीवरच्या बागेचे हे विस्तारीत स्वरूप आहे. या ठिकाणी आम्ही गोमुत्र व गोमयसाठी देशी वाणाची गाय पालन केले आहे. शेणाचे( उकीरडा नव्हे) वैज्ञानिक पध्दतीने केलेले व्यवस्थापन (विटांच्या हौदात केलेले) पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला बागेसाठी उपयुक्त नैसर्गिक स्वरूपातील खतं, वर्मीवॅश सेटअप, पालापाचोळा, लाल माती कीडनियंत्रके संजीवक म्हणून जीवामृत, गोमुत्र संकलन, भाजीपाल्याची रोपे, पुस्तके व काही शोप्लॅन्टस पाहू शकता व विकत घेवू शकता. (फोन वर संपर्क साधून भेटीची वेळ ठरवावी.)
  3. निशुल्क मार्गदर्शनः दुरध्वनी किंवा सोशल मीडियावर आपण बागे संदर्भात, कचरा व्यवस्थापना संदर्भात शंका, प्रश्न विचारू शकता. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ही आमची सामाजिक दायित्व म्हणून सेवा देतो. आपणास व्हाट्सअप व्दारे जोडले गेल्यास अद्यावत माहिती वेळोवेळी पाठवली जाते.
  4. सामाजिक उपक्रम दिनः सामाजिक उपक्रमाच्या दिवशी आम्ही आयोजकाच्या आमंत्रणानुसार गच्चीवरची बाग ही गाडी उपस्थित असते. या ठिकाणी आम्ही निशुल्क मार्गदर्शन व साहित्य विक्री करत असतो.
  5. Sale @ Spot: नाशिककरांच्या आग्रहास्तव आम्ही नाशिकमधील निवडक ठिकाणी बागेसंदर्भात उपयुक्त साहित्य विक्रीसाठी वेळ, स्थळानुसार उपलब्ध करून देतो. त्याठिकाणी आपण बाहेसंदर्भात प्रश्न, शंका विचारू शकता. तसेच उपयुक्त साहित्य खरेदी करू शकता.
  6. Content BLog: या ठिकाणी आम्ही वेळोवेळी उपयुक्त टीप्सचे विस्तृत विवरण प्रकाशीत करत असतो. ते आपण निशुल्क वाचू शकता. www.organic-vegetable-terrace-garden.com माहितीपूर्ण असे संकेतस्थळः www.gacchivarchibaug.in You Tube Channel
  7. सीड बॅंकः भाजीपाला व इतर झाडांची बियाणं येथे पारंपरिक पध्दतीने जतन केले आहे. ते आपण पाहू शकता तसेच त्याची खरेदी करू शकता.
  8. ८ वी ९ वीच्यां विद्यार्थांसाठी विकएंड सेशनः नाशिक स्थित आनंद निकेतन शाळेत ८ वी व ९वीच्या विद्यार्थांसाठी गच्चीवरची बाग हा विषय प्रात्यक्षिंकासहीत दर आठवड्याच्या शनिवारी शिकवला जातो.

B) विक्री (sale)….

गच्चीवरची बागेव्दारे भाजीपाला व फुलाच्या बागेच्या संवर्धनासाठी खालील प्रकारे साहित्य विक्री करतो.

  1. पुस्तके….a) गच्चीवरची बाग….आपणास भाजीपाल्याची बाग फुलवण्याची सुरवात करत असाल तर गच्चीवरची बाग हे पुस्तक नक्कीच वाचावे. त्यात अथपासून इथपर्यंत माहिती दिलेली आहे. b) तुम्हाला माहित आहे का ... या पुस्तकात आम्ही गच्चीवरची बाग कार्यशाळेत जी जी उपयुक्त माहिती मुद्यानुरूप देतो. अशा ६३६ मुद्यांचे पुस्तक प्रकाशीत केली आहे. जे आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, बाग, बगीचा संदर्भात आहेत. जे मुद्दे वाचून आपण नक्कीच प्रेरीत होऊ शकता.
  2. संजीवकः संजीवकं म्हणजे बाग फुलवण्यासाठी उपयुक्त अशी द्राव्य खते होय. यात गोमुत्र, वर्मीवॅश, जिवामृतांचा समावेश होतो.
  3. कीड नियंत्रकः यात गोमुत्र, जीवामृत, दशपर्णी, वर्मीवॅश, तंबाखू पावडर चा समावेश होतो.
  4. खतः गांडूळखत, वर्मीकंपोस्ट, कंपोस्ट, शेणखत, निमंपेंड, राख, इ. वेगवेगळे पॅकींगमधे मिळतात. तर यांचा सर्वांचा समावेश असलेले भूसुधारक खत ही उपलब्ध आहे.
  5. इतर साहित्यः बाराही महिने आपणास कोरडी लाल माती, पालापोचोळा, नारळशेंड्या, तांदुळाचे तुस, विटा, नर्सरी बॅग्ज विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
  6. रोपेः भाजीपाल्याची ऋतूमानानुसार वांगी, टोमॅटो, मिरची, कॅबेज, फ्लावर इ.रोपांसोबत आम्ही रसायनमुक्त पध्दतीने वाढवलेली शोपॅन्टस आपण खरेदी करू शकता. तसेच कंपोस्टर कम ग्रोअर ड्रम, डेव्हील डायजेस्टर(आल इन वन कंपोस्टर) खरेदी करू शकता.
  7. वरील साहित्य आम्ही डिलेव्हरी चार्जेस आकारून घरपोहोच पोहचवतो. पण आपण आमच्या नेहमीच्या येण्याजाणाच्या रस्त्यावर ठिकाण असल्यास निशुल्क घरपोहोच पोहचवतो.

C) सेवा…(Services)

गच्चीवरची बाग व्दारे आपणास काही घरपोहोच सेवा सुविधा पुरविल्या जातात. ज्याचे सेवाशुल्क आकारले जाते.

  1. फॅमीली कन्स्लटेशनः या सेवत आपणास व आपल्या कुटुंबियास ३ तास दिले जातात. यात आपणास स्लाईड शो व्दारे बागे संदर्भात मार्गदर्शन केले जाते. तसेच आपली बाग, झाडे पाहून त्याविषयी मार्गदर्शन केले जाते. तसेच आपल्या बागे संर्दभात, कचरा व्यवस्थापनाबाबत शंकाचे समाधान केले जाते.
  2. प्रबोधन वर्ग किंवा कार्यशाळा… Vedio

a) गणपती मंडळ, महिला मंडळासाठी कार्यशाळा आयोजन केले जाते. यातही वरील प्रमाणे सेवा प्रदान केली जाते. उपस्थितांना कचरा व्यवस्थापनातून बाग कशी फुलवावी याविषयी प्रेरीत केले जाते. यासाठी उपस्थित सहभागीनुसार शुल्क आकारले जाते.

b) आघाडीच्या वृत्तपत्रासोबत कार्यशाळाः नाशिक स्थित आघाडीच्या वृतपत्रासोबत संयुक्त उद्यमाने कार्यशाळा आयोजीत केली जाते. यात आपण शुल्क भरून सहभागी होवू शकता.

c) नाशिक बाहेरील कार्यशाळा, नाशिक बाहेरील कार्यशाळा कुठे व केव्हां आहेत हे आपणास व्हाट्सअपव्दारे कळवले जाते. त्यात आपण त्या त्या आयोजंकाच्या शुल्कानुसार सहभागी होवू शकतात.

3) Vegetable Setup Insttalation: कार्यशाळा किंवा फॅमिली कन्स्लटेशन नंतर इच्छुकांना भाजीपाल्याची बाग फुलवून घ्यावयाची असल्यास त्या संदर्भात कोटेशन दिले जाते व त्यानुसार बागेचा सुरवातीचा सेटअप लावून दिला जातो.

4) Setup & Garden Maintainanc: इच्छुकांच्या घरी सेटअप लावून दिल्यानंतर त्याभाजीपाल्याची, फुलांची बाग असल्यास त्याबागेचा मेन्टनन्स हा दर पंधरा किंवा ३० दिवसांनी केला जातो.

6) कंपोस्टींग सेटअपः आपल्या घरी उत्पादीत होणारा कचर्याचे स्वरूप, त्याचे आकारमाने यानुसार कंपोस्टर कम ग्रोवर ड्रम, डेव्हील डायजेस्टर (कंपोस्टर) व विटांचा हौद, माठाचा सेटअप लावून दिला जातो.

7) श्रेडींग सर्व्हीसेसः बरेचदा आपल्या बागेतील कचरा, झांडाच्या फांद्या, कंटीग्जस घंटा गाडीत टाकत असतो. कारण त्याचे आकारमान मोठे असते. त्याचे बारीक तुकड्यात रूंपातर केल्यास त्याचे कंपोस्टखत लवकर तयार होते. त्यासाठी डिझेलवर चालणारे श्रेरडर मशीन आपल्या घरी आणून कचरा बारीक करून दिला जातो. व्हीडीओ पहा

8) Repotting: बरेचदा आपल्या बागेतील कुंड्या भरगच्च मातीमुळे जड होतात. कुंड्यात पाणी साचते किंवा पाणी लगेच ड्रेन होते. झाडे निस्तेज असतात. वाढ होत नाही. अशा वेळेस आपणास कुंडया रिपोटींगची गरज असते. ते आम्ही मोठ्या कौशल्याने कोणतेही झाड न दगावता ते आपल्याला करून देतो. आपल्या कुंड्या हलक्या व तजेलदार होतात.

गच्चीवरची बाग, नाशिक. संदीप चव्हाण, संपर्कः 9850569644.

website
http://www.gacchivarchibaug.in

website https://atomic-temporary-145492773.wpcomstaging.com

profile
https://about.me/sandeepchavan

cover story https://udyojak.org/gachchivarchi-baug-success-story/

YouTube https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q

facebook page
https://www.facebook.com/%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-page-163326204300631/

my link http://www.mylinq.in/9850569644

https://organic-vegetable-terrace-garden.business.site/

👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.