0 (45)

If any article uses till End Use that the best method for waste management…

कचरा व्यवस्थापनाची सोपी पध्दत म्हणजे एकदया वस्तूचा शेवटपर्यंत वापर करणे हे होय.

आजच्या आधुनिक जीवनशैलीत वापरा व फेका हे तंत्र वापरले जातेय. पण आपल्या रोजच्या जगण्यातून कचरा किती निर्माण होतो. याचा आपण कधी विचार केलाय… बरं एकादी नवीन वस्तू बाजारात येणं म्हणजे तिचा प्राथमिक वापर संपला की ती फेकून दिली जाते. एकतर त्या पूर्नवापरासाठी भंगारात जातात किंवा फेकून किंवा सडवत तरी ठेवल्या जातात. हा एक प्रकारे पर्यावरण दूषीत करण्याचा प्रयत्न आहे. पण आपण थोडा विचार केला त्याबरहुकुम कृती केली तर नक्कीच फेकले जाणार्या वस्तूचा पूर्नवापर करणे शक्य आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात की ज्याचा सृजनशीलतेने वापर केला तर नक्कीच पर्यावरण संरक्षणात हातभार लागू शकतो.

एकदा गौतम बुध्दानी आपल्या शिष्याला काही प्रश्न विचारले. की शेतात उत्पादीत होणार्या कापसापासून काय करशील… तर त्यांनी कापसापासून- कापड- कापड वापरून झालं ती त्याची रजई(गोधडी) बनवणार. गोधडी जिर्ण झाली की त्यापासून पाय पुसणं बनवणार, तेही जिर्ण झाले की त्यापासून दिव्याची वात बनवणार.. किती मोठा विचार आपल्या पूर्वजांनी पेरून ठेवला आहे… पण आपलं लक्ष त्याकडे नाहीच आहे….

आपल्या दोन पिढ्या आधी आजोबाची धोतरं, व आजीची नववारी साड्या या गोधड्या बनवण्यासाठी वापरल्या जात असे. त्यांच्या आठवणी गोधडीच्या रूपात जपल्या जात होत्या व त्यांचा आर्शिवाद रूपी पांघरून सदैव आपल्या अंगावर असावं याची किती सुरेख पणे गुफंन केलली होती.. आज आपण हे सारं विसरत चाललोय. अर्थात आता धोतरं व नववारी वापरल्या जात नाही. हे खरं असलं तरी जे आहे त्याचा तरी आपण सृजनशिलतेने वापर विनीयोग करतो का…

सकाळी उठल्यापासून दात कशांन घासावेत अथपासून ते रात्री झोप कोणत्या गादीवर घ्यावी इथपर्यंत सांगणारी माध्यमं व त्याला जगवणारी औद्योगीकता ही आपलंच जीवन कसं जगावं हे ठरवत असतील तर प्रदुर्षण हे होणारचं. या प्रदुर्षणावर आता नवी इंडस्ट्री तयार होतेय हे आपल्या पैकी बरेच जणांना माहीत नसेन. जागतिक व्यापाराची दिशा कोणती असावी ही प्रगत राष्ट्रातील उदयोजक ठरवत असतात. आधी आरोग्याचे, खाण पानांचे आता पर्यावरणसंबधी प्रश्न तयार करायचे व त्यावर खर्चिक उपाय शोधायचे व विसनशील देशाकडून पैसा वळवायचा हे सारं त्यांच्याकडून शिकावं. असो..

प्रोडक्ट डिझाईनचे शिक्षण देणारी अनेक संस्था तयार झाल्या आहेत. यातून बाहेर पडणारी इंजिनिअर्स हे लोकांची गरज पाहून त्यानुसार वस्तूची निर्मिती करतात. व गरज संपली किंवा ते वापरात थोडीही अडचण आली के पडून राहते किंवा भंगारात जाते. खरं तर आपली वस्तू ही बहुपयोगी असली पाहिजे. तर त्या प्रोडक्ट डिझाईनेचे यश समजले पाहिज. आपली वस्तू ही शेवटच्या वापरापर्यंत लोकांच्या डोळ्यासमोर राहिली तर आपली जाहीरात होत राहणार पण हे कितीजण लक्षात घेता हे माहित नाही.

आज बाजारात अशा अनेक गोष्टी कंपोस्टर म्हणून आल्या आहेत. घरटी एकतरी यंत्र बाजूला पडेलेले दिसते. याची कारण काहीही असले तरी त्याचा दुसरा उपयोग नसल्यास ते भंगारात विकले जाताहेत. येथेच कचरा व्यवस्थापनाची खरीं गंमत येथेच आहे. उदाः तुम्ही अशी तेलाची कॅन बनवा की त्याला अशी छोटी वस्तू जोडली की त्यापासून बागेसाठी झारी तयार करता येईल. आपला ब्रॅंड शेवट पर्यंत लोकांच्या डोळ्यासमोर राहिलही, रिसायकल मुळे पुर्ननिर्मीत होणारे प्रदुषण टळेल किंवा ते लाबवलं जाईल व लोकांना त्याचा पूरेपूर वापर करता येईल. असा जर सर्वांगीन आपण विचार करू लागलो तर आपला नखभर कचराही बाहेर जाणार नाही…

दुसरे उदाहरणं पाहता येईल. जपान देशातील संशोधीत प्रवासी वाहतुकीसाठीची रिक्षा हे वाहन आज कायदेशीर रित्या भंगारात निघाल्या तरी लोकं त्याचा भाजीपाला, थंडपेय, अशा अनेक गोष्टीचा व्यवसाय करतांना दिसतात. लोकांमधे सृजनशीलता असतेच. पण काही अंशी रिक्षा हे वाहन बनवणार्या तंज्ञाचीही आहे. अर्थात अशा प्रकारचा अंतीम व बहुपयोग असे वाहन त्यांच्या हातून तयार झालेय हे त्यांनाही ठावूक नसेल…. असो…

आम्ही घरी तयार होणार नैसर्गिक कचरा हा घरीच जिरवतो. सर्वात आव्हानात्मक वाटणारा खरकटे अन्नाचा प्रश्नही सोडवला.. त्याचीही बागेसाठी पूरेपूर वापर करतो. तसेच वापरलेले बूट, लेडीज पर्स सुध्दा छोटी छोटी रोपं जगवण्यासाठी वापर केला आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत. ज्यांचा आपण सृजनशीलतेने वापर केला तर नक्कीच पर्यावरणाचं संरक्षण करण्यात मोलाचा वाटा ऊचलू शकतो.

स्वयंघोषीत सौंदर्यांचार्य म्हणतात की गाडगे, मडके, बुट, लेडीज पर्स, ट्रव्हल बॅग्ज यात काय बागेचे सौदंर्य फुलते का.. बाबांनो सुंदर दिसणार्या हजारो प्रकारच्या कुंड्या बाजारात आजही आहेत. पण त्यात लावलेलं झाडं हे टवटवीत नसेल, परत परत कोमजून जात असेल तर बाबांनो बागेचे सौदंर्य हे कुंडीवरून नाही त्यातील झाडांच्या तजेदलदार पणावरून, फुलांवरून ठरवायचे असते. पण या सोकाल्ड बाग पंडीताना कसं समजवणार…. बरं अशा वस्तूंचा वापर करण्याने आपल्यातील सृजनशीलता वाढीस लागते व सृनजशीलता बागकाम करण्यातूनही वाढीस लागते. पण हे त्यांच्या “पा” नाही कळणार नाही. असो…

… तुम्हाला लेख आवडला तर नक्कीच शेअर, लाईक व कंमेन्ट करा..

आपणास सदर लेख पूर्नप्रकाशीत तसेच इंग्रजी भाषेत भाषांतरीत करावयाचे असल्यास नक्की करा. फक्त आम्हाला कळवा…

गच्चीवरची बाग, नाशिक. ९८५०५६९६४४,

http://www.gacchivarchibaug.in

website
http://www.gacchivarchibaug.in

website https://atomic-temporary-145492773.wpcomstaging.com

profile
https://about.me/sandeepchavan

cover story https://udyojak.org/gachchivarchi-baug-success-story/

YouTube https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q

facebook page
https://www.facebook.com/%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-page-163326204300631/

my link http://www.mylinq.in/9850569644

https://organic-vegetable-terrace-garden.business.site/

👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.