Garden owner Do’s & doesn’t
तुमच्या घराभोवती किंवा छतावर बाग फुलवली आहे. त्यासाठी Gardner, माळी काम करणारी व्यक्ती येत असेल येत तर हा लेख तुम्ही वेळात वेळ काढून वाचलाच पाहिजे. कारण हा लेख तुमचे डोळे उघडू शकतो किंवा आत्मविश्वास वाढवू शकतो. Do’s & doesn’t सांगणारा लेख…
खर तर हा लेख लिहण्याची वेळ यावी याचेच फारच वैशम्य वाटते. पण या लेखाविषयी बर्याच अंगानी व बरेच दिवसापासून विचार करत होतो. त्याचा सर्व्हे करत होतो. लेख लिहावां की नाही… आणि तो का लिहावा… पण एकदाचा लेख लिहावा म्हणजे तो समस्त माळी काम करणार्या व्यक्तिना, व बाग मालकांना नक्कीच उपयोगी होईल. गेल्या सात वर्षात आम्ही अनेक बागप्रेमींना भेटतो आहोत. तसेच माळी काम करणार्या लोकांनाही. प्रत्येक वेळेस बाग मालक येवून भेटतात. एकच तक्रार असते. आम्हाला चांगला माळीकाम करणारा व्यक्ती द्या… माळी काम करणारी व्यक्ती टिकतच नाही… या दोन कारणामुळे मेहनतीने फुलवलेली आर्थिक, व भावनाची गुंतवणूक केलेली बाग ही उजाड होते. नंतर वय सरल्याप्रमाणे तीलाही वृध्दत्वाच्या खाणाखुणा दिसू लागतात. पण ही वेळ का यावी… याचा अभ्यास केला असतो. चूकांचा तराजू हा बागमालकाकडेच झूकलेला दिसून आला आहे. कारण बाग मालक तेवढ्या संवेदनशीलतेने, व्यावहारिकतेने, हिशोबीवृत्तीने बागेकडे पहातो तेवढे बागकाम करणार्याकडे नाही… त्यामुळे या दोघांत हळू हळू अंतर तयार होत जाते. नि त्याचे पर्यावसन हे माळीकाम करणार्या व्यक्तिच्या कंटाळ्याला, टाळाटाळ करणार्यात, काम संथगतीने होण्यात होते. किंवा काम सोडून देण्यात होते. कारण वेळ पैसा व त्याबद्दल काम इतकाच पुरक व्यवहार नसून माळी काम करणारी व्यक्तीची त्या त्या वेळची मानसिकता, स्वसंवाद सुध्दा बागेवर दूरगामी परिणाम करतो हे लक्षात येते.
तर ही कारण सामाजिक, आर्थिक, संवाद कौशल्याची आहेत. पण ती नेमकी काय कारणे आहेत ते पाहूया…
- ठराविक दिवसांचा बागकामाचा करार करा…तो पाळा… आठवण करून द्या… आपल्या बागेचे काम करणार्या व्यक्तिला आपण बागेचे maintains द्यावयाचे असल्यास ठराविक कालावधीचा करार करा. तो लेखीच असला पाहिजे असे नाही. उदाः दर पंधरा दिवस, दर महिना किंवा दोन महिण्यातून… एकदा.. पण हा कालावधी ठरला तर तो केवळ माळीकाम करणार्याचे पाळावा असे बंधन नाही. त्याची आठवण तुम्हीही देवू शकता. किंबहूना द्यायलाच हवी.. ही जबाबदारी त्याची असेल तर त्यासाठी आपण तिमाही, सहामाही आगावू रक्कम देवून करार करून घ्या… म्हणजे ती व्यक्ती काम करून पैसे परत करण्याचे कर्तव्य वेळेवर बजावेल.
- अर्धावाटेवरून परत पाठवू नका… बरेचदा आगावू पैसे देवून माळी काम करणार्या व्यक्तिंना तिन महिने व वर्षभरासाठी बांधून घेतात. आदल्या दिवशी उद्या येण्याची वेळ पण ठरते. आणि अगदी माळी काम करणारी व्यक्ती घरी आली किंवा रस्त्यावरून त्याला परतून लावतात की आज काम नाही… शक्य झाल्यास असे करू नका. नेमका माळी काम करणारी व्यक्ती किती लांबून येते, काही नियोजन असते. हे सारे कोलमडते. व त्याचे आर्थिक नुकसान होण्यात होते. कारण वास्तवच असले तर ति समजून घेण्याची संवदेनशीलता ही प्रत्येकात असतेच.
- कामाच्या दिवसांचा करार पाळा… दर पंधरा दिवसांनी , महिण्यांनी बाग काम करावयाचे ठरले असेल तर करार बाळगा… कारण ठराविक दिवस ओलांडून अधिक दिवासांनी बोलावले तर बागेचे काम वाढलेली असतात. तुमच्या बागेचे काम ३ तासात नेहमी करून जात असतील तर तेवढाच वेळ नेहमी लागला पाहिजे. कारण अधिक कामे संग्रहीत झाली तर ते करण्यास नकार मिळणार नाही. पण पुढील वेळेस माळी तुमचे काम सोडून देईल हे मात्र नक्की. कारण वेळ जास्त व पैसे तेवढेच हे गाणित बिघडते.
- योग्य, अधिकचा मोबदला द्या… आधुनिकतेने व यंत्र सुलभतेमुळे श्रमाची कामे करणारी व्यक्ती कमी होत चालली आहेत. तसेच असे काम करणारी व्यक्तीमधे श्रमाची कामे का करावी? याचा न्यूनगंड आधुनिक जीवनशैली दररोज पोसतच असते. त्यामुळे श्रमाची काम करणारी व्यक्ती मिळत नाही. मिळाले तर त्याचा योग्य मोबदला नसेल तर काम स्विकारली जातात. माळी काम करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे याचा अभ्यास करा… त्याला यायला जायला वेळ किती लागतो. कामाला नेमका किती वेळ लागणार आहे. त्यापेक्षा अधिकचा वेळ गृहीत पकडा,,, ताशी किती रूपये त्यांना पे केले तर आवडेल किंवा स्विकारेल याचे गणीत करा… व व्यवहार, करार करा..
- बार्गेनिंग करू नका... कोणताही माळी काम करणारी व्यक्ती जास्तीचे पैसे आकारत नाही. त्याच्याकडील कौशल्य, देत असलेली सेवा व वापरत असलेली भाडंवली साहित्य, येण्याजाण्याचा प्रवास खर्च व आपली काम करून घेण्याची पध्दत ही पहिल्य भेटीत पैशाने ठरत असते. त्यामुळे त्याने सांगतिलेल्या पैसा जास्त वाटत असले तर नकार द्या पण पैसे कमी करू नका. त्यावरून बागमालकाची वृत्ती, अनुभव दिसून येते. व त्यावरून काम किती करायचे हे ठरते. त्यामुळे बार्गेनिंग करू नका.
- पहिल्या कामाचे पैसे जास्त द्या... बरेच दिवसातून बागेतील साफसफाई व आवरासावर करावयाची असल्यास पहिल्यांदा जास्त पैसे मोजा कारण काम जास्त असते. त्यानंतर महिण्याचे रखरखाव करण्याचा करार ही करून घ्या…
- नेमकी भूमिका काय याचा अभ्यास करा…
बरेचदा माळी काम करणारी व्यक्ती ही Gardner cum Cleaner किंवा सांगकाम्या, हरकाम्या असावा अशी अपेक्षा असते. Gardnerचे काम हे झाडांची काळजी घेणे, त्याला खत पाणी पहाणे त्याचे कंटीग करणे फवारणी करणे इ.असते. पण त्याच्याकडून या कामासोबत अपार्टमेंटमधी कचरा व्यवस्थापन, प्लास्टीक कचरा गोळा करणे, घरची नारळ फोडून घेणे, झाड तोडून घेणे, फांद्या झाटून घेणे ही अधिकची काम करून घेतात. यामुळे माळी काम करणारी व्यक्ती नाराज होवू शकतो. त्यासाठी त्याचे वेगळे पैसे मोजा… किंवा त्यांच्या सोबत नात इतक संवादक असावे की फुकट काम करून घेतल्याची भावना यायला नको…
- ठराविक काळानंतर पैसे वाढवा… आपल्याकडे वर्षापासून एकच माळी येत असेल. त्याचा पगारही तोच असेल. पण बाहेरच्या जगात महागाई वाढलेली असतेच. माळ्याचा पगार वाढवा… भले ५ टक्के असेन. काम ही वाढतीच असतात. त्यामुळे पगार हा फुलाची पाकळी एवढा तरी वाढवला पाहिजे. त्याने माळी काम करणारी व्यक्ती उत्साहाने काळजी काम करेन व आपल्यापेक्षा अधिक बागेची काळजी घेईन.
- ज्ञानाचा आदर करा…बाग काम करणारी व्यक्ती ही विविध अनुभवातून गेलेली असते. प्रत्येकाकडेच काहीना काही ज्ञान हे असतेच. त्यामुळे दोन माळी मधील ज्ञानात, समजेत फरक असू शकतो तो तुमच्या अनुभवाच्या कसोटीवर मान्यही केला पाहजे. व त्याचा आदर केला पाहिजे. माळी काम करणार्या व्यक्तींच्या ज्ञानालाच challenge केले तर तो काम सोडून जावू शकतो.
- कौतुक करा… झाडांना सदा सर्वकाळ फुलेच असली पाहिजे. ते नसतील तर ती चूक माळ्याचीच आहे असा आरोप करू नका. घड्याळ बंद असले तरी ते दिवसातून दोन वेळस तरी योग्य वेळ दाखवते. त्यामुळे चूक अशी नसते. झाडांच सारे खाण्यापिण्याचे कौतुक करूनही झाड वाढत , बहरत नाही. पण जे काही, जेवढे काही ज्या झाडांना फळ फुलं येतील त्या झाडांच व माळ्याचं कौतुक करा… बाग बहरते… सकारत्मकाचे तंरग तयार होतात. बाग फुलणं हे निसर्गाचे काम आहे. आपण फक्त तोडक्या ज्ञानावर त्याची जोपासना करतो. तसेच निसर्ग हा सुक्ष्मतेने काम करत असतो. त्याची अभियांत्रिंकी ही उच्च टोकांची व गुंतागुतींची असते. त्यामुळे एकदा डऑक्टर शर्थीचे प्रयत्न करूनही रूग्ण वाचत नाही. त्याप्रमामे झाड ही रूसून, बसते. त्याला वेळ द्या…
- सुंवादक व्हा… माळ्याचे कौतुक करा… एक तरी गुण त्याच्यात चांगला असेल. तो स्वच्छता चांगली करतो. हळू हळू पण मन लावून काम करतो. त्याचा हात लागली की बाग सुंदर दिसते. त्याच्या हाताने झाडं लावलं की झाड जगतचं. त्याच्या जवळ मोठा अनुभव आहे. कदाचित सेलेब्रेटीसुध्दा असू शकतो. पण तुमच्या अज्ञानामुळे तुम्हाला माहित नसेल. तुमचे म्हणणे अपेक्षा ऐकून घेतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रामाणिक आहे… यातला एकादा गुण तर असेलच ना. त्याचं कौतुक करा… संवादक व्हा… कारण तुमचा संवाद हा नकारत्मक, तक्रारीचा असेल तर ती नकारत्मका बागेतील झाडांपर्यंत पोहचते व बाग निस्तेज होवू लागते.
- काही जबाबदारी तुम्ही पण घ्या… कितीही माळी काम करणारी व्यक्ती तज्ञ असेल तरी त्यास एक मर्यादा आहे. कारण प्रत्येक माळी हा फक्त पितृत्वाची भूमिका पार पाडू शकतो. बागेचे मातृत्व हे ते ते कुटुंबच पार पाडू शकतो. कारण सदा सर्व काळ तुम्ही त्याच्या सहवासात राहतात. घरघूती काही खत, फवारणी करता येते ते अधनं मधनं द्यायला शिका… म्हणजे बाग चांगली होईल.
- नेमकी काम ठरवा….माळी काम करणारी व्यक्ती आली की त्यांना नेमकी कामाची काय अपेक्षा आहे याची जागेवर जावून, बागेत फेरफटका मारून पूर्वकल्पना द्या… म्हणजे कामाची सुंसगता येईल कमी वेळेत काम होईल. आपल्याला हालचाल करणे शक्य नसल्यास जागेवर बसून त्या सुचना करा.. किंवा करवून घ्या… पण काम झाल्यावर तक्रार करू नका. पुन्हा बोलावू नका.. उदाः एका बांबूच्या झाडांची भिंत होती. त्याची ठराविक ऊंचीवर नेहमी कट करावयाचे ठरलेले होते. सांगतील्या प्रमाणे उंची कमी झाली. कचरा गोळा करून झाला. जागा स्वच्छ झाली. मग बाग मालकाच्या मनात आले की नाही पुन्हा उंची दोन फुटांनी कमी करावयाची. अशाने माळ्याची काम वाढतात. त्रास वाढतो. व मनोमन …. देतो. (आपल्याला त्याच्या मनातले कुठे वाचता येते.) त्यामुळे अशा गोष्टी टाळाव्यातच.
- काम झालं की पैसे लगेच द्या… बरेचदा काम झाले की पैसे देण्यात टाळाटाळ करतात. नंतर देवू, पुढील कामाच्या वेळेस देवून असे करू नका… त्यालाही इतर व्यवहार हिशोब द्यावयाचे असतात. काम झाले पैसे मिळाले म्हणजे लक्षात ठेवण्याचा त्रास नसतो. तशाही आजकाल खूप सार्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्यात याची भर टाकू नका..
- काम झाल्यावर बार्गेनिंग टाळा… कामाचे पैसे ठरले असेल तर ते पूर्ण द्या… काम पूर्ण झाल्यावर त्यात घासाघिस नका करून.. एवढेच देवू, तेवढेच घ्या.. याने माळीकाम करणारी व्यक्ती दुखावू शकते.
- गैरसमज टाळा… बरेचदा एक सूर ऐकायला मिळतो. त्यांना बरीच काम मिळतात. हो… गडगंज कमावतात.. हा गैरसमज टाळा.. त्या त्या एरियात तुम्ही त्याला अधिकची काम मिळवून दिलेली नसतात. तसेच एकाद्या कामाला जास्त वेळही लागू शकतो. कोणतेही काम म्हटले तरी त्यात जाण्या येण्याचा वेळ पकडून अर्धा दिवस खर्ची झालेला असतोच. हे लक्षात घ्या.. माळी रोज किती कमवतात याच्याशी आपल्याला म्हणजे बागमालकांना विचार करण्याची, व्यक्त करण्याची गरज नाही. तुम्हाला नाही परवडले तर सरळ नाही म्हणा… इतर टिका टिप्प्णी, सल्ले टाळा..
- शिकते व्हा… तुम्हाला बागेचे मातृत्व स्विकारेच लागते. त्यामुळे माळ्या अनुपस्थितीत काय काय करायचे याची माहिती त्याच्याकडून घ्या… म्हणजे नव्याने शिकता येईल. किंवा त्याबद्दलचे ज्ञान वाढवा.. ते करून घ्या.. म्हणजे माळ्याच्याही ज्ञानात भर पडेल.
- Call Basis वर कामाला बोलावू नका.. आता बाग जरा जास्तच अस्ताव्यस्त झाली मग बोलवा माळ्याला असे करू नका… तो Call Basis नसावा तर Agreement basis वर काम सोपवा. म्हणजे बागेतल्या स्वच्छतेवर वेळ खर्च होण्यापेक्षा झाडांच्या वाढीकडे लक्ष देता येईल.
- social presence तपासून पहा… एकादा माळी कसे काम करतो. काय करतो , किंवा नर्सरी असेल तर त्याचां social presence सोशल मिडीयावर जावून तपासून पहा.. माळी काम करणारी व्यक्ती व्यक्तीगत काम करते की फर्म म्हणून हे तपासून पहा म्हणजे त्यांच्याशी वागण्या बोलण्याीची पूर्वकल्पना येईल व सुसंवादक होण्यास मदत होईल.
अशा बर्याच गोष्टी आहेत. पण या ठळक स्वरूपात व अधिक प्रमाणात दिसून येतात. आता हे सारं वाचल्यावर तुम्ही म्हणाल की माळी नेमायची काय गरज…. आम्ही करतो की.. सारं… अशी चूक करू नका… नव्याचे नऊ दिवस असतात. नंतर कामाचा कंटाळा येतो. बाग निस्तेज होवू लागली तर त्याकडे दूर्लक्ष होवू लागते. व बाग फुललेली असली तर घरा दारात,मनात आनंदच असतो. कारण “मन करारे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण…” हे संतवाक्य बागेच्या फुलण्यातून लक्षात येते.
आता तुम्ही म्हणाल हा लेख माळी काम करणार्यांचीच बाजू घेणारी आहे. हो कारण, बाग आपली आहे. व श्रमाची काम करणारी व्यक्तीची मागणी जास्त आहे. त्यांना तुम्ही नाही तर दुसरा कुठलेतरी काम मिळेल पण तुम्हाला लगेचच माळी भेटणार नाही. नुकसान बाग मालकाचेच म्हणजेचे आपले आहे. हे लक्षात घ्या… तुम्ही भांडेधुणारी, पोळ्या लाटणारी, कपडे धुणारी यांना सर्वेतोपरी सांभाळतताच ना.. मग माळी काम करणार्या व्यक्तीनाही सांभाळा आणि शिवाय बाग काम ही नैसर्गिक संवदेनशीलतेने हातळण्याची गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. माणूस व बागेतील झाडे परस्पर पुरक सुक्ष्मपणे संवाद साधत असतात. व त्याचा एकमेंकावर परिणाम होतच असतो. त्यामुळे माळी काम करणार्या व्यक्तिची मानसिकता उत्साही कशी राहिल याची दक्षता घ्या… असो… यातील काही गोष्टी तुम्ही करतही असाल तर तुमची बाग सुंदर टवटवीत दिसलेच. पण मनासारखी बाग फुललेली नसेल तर वरील मुद्यानुरूप स्वतःला तपासून पहा… लेख मदतगार ठरल्यास शेअर, लाईक करा…
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
You must be logged in to post a comment.