spring-276014__340

Tree & Grass are ware of earth

झाडं जमीनीचे बाह्य वस्त्र आहे. तर गवत हे जमीनीचे अतंवस्त्र आहे. आपण महत्वाच्या दृष्टीने वृक्षलागवडीकडे संवेदनशीलतेने पाहू लागलो आहोत. पण गवताचे काय? बागेत कुंडीत ते दिसले की आपण ते काढू टाकतो. त्याचा नेमका परिणाम काय होतो हे अभ्यासून सांगणारा लेखाचा सांराश…
झाडांचे महत्व माणसाला कळू लागलय. म्हणून तो मरणाच्या भितीने का होईना झाडं लावू लागला आहे. त्यांच महत्व आहेच. झाडं असली तर त्याचा काय काय उपयोग होतो. व नसली तर काय काय नुकसान होतं याची यादी कदाचित कधीच न संपणारी अशी लांबलचक होऊ शकते. पण डोळ्यात भरेल असा परिणाम म्हणजे झाडं नसली तर जमीनीचे वाळंवटीकरण वेगाने होते. जेथे झाडं आहे तेथे पाण्याचे बाष्फ आहे. जीवाणू आहेत. सजीवांची तेथे हालचाल होते. प्राणवायू तयार होतो. ही झाली ठळक गोष्टी. पण ही झाडं जमीनीपासून १० फूटांपासून वरच असतात. तर जमीनीच्या पृष्ठभागापासून तर या दहा फूटांपर्यंतही बरचं काही पर्यावरण सामावलेले असते. त्यादरम्यान सुध्दा जमीनीची धूप होत असते. झाडं ही जमीनीची धूप जरी थांबवत असली तरी त्याचा वेग मात्र मंदावलेला असतो. धूप ही चालूच असते. मग धूप होवू नये म्हणून काय केले पाहिजे. अर्थात धूप ही दोन प्रकारे होत असते. एक उन, वारा व दुसरा पाऊसामुळे.
तर ही धूप होवू नये म्हणून जमीनीला गवतरूपी अंतवस्त्र परिधान केले पाहिजे. म्हणजे जमीनीलगत १ इंच ते १२ इंच उंचीची ढाल तयार होते. ही ढाल जमीन सुपिक व्हावयास खूप मदत करते. ही ढाल सुक्ष्म जीवांना अतिउच्च स्वरूपाचा शुध्द प्राणवायू पुरवते. जे अल्पजीवी असूनही पूर्णक्षमतेने आपापले कार्य करत असतात. तसेच हे जीव जंतू चे उन्हापासून, प्रकाशापासून संरक्षण मिळते. त्यामुळे ते दिवसाही सावलीत आच्छादनाखाली काम करत असतात. असंख्य जीव जंतू जे तयार होतात. निवासाला येतात. त्यांची विष्ठा ( यात गांडूळ हे मोठ्या प्रमाणावर असतात) झुडूपवर्गीय झाडांना खत म्हणून उपयोग पडते. गवतावर दवबिंदू पडल्यामुळे त्या विष्ठेचे द्राव्य खत ताज्या स्वरूपात लगेच झाडांच्या मुळांना भेटते. त्यामुळे याचा परिणाम हा उत्पादन वाढीत होतो. तसेच अनेक प्रकारचे कीड वास्तव्यास आल्यामुळे शत्रु किटंकाना आटोक्यात ठेवण्यासाठी मित्र किटकही, कीड येथे रहावयास येते त्यामुळे कीडनियंत्रणही अपसूकच होते. कीटकांचे अवशेष कुजण्यास मदत होते. व त्याचेही खत तयार होते.
मग बागेत तण वाढू द्यावे का…याच उत्तर हो असेच आहे. हे मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध असेल तरच. पण शहरातील परसबागेत ते निंयत्रीत असावे म्हणजे गवत हे मूळापासून उपटून टाकण्यापेक्षा कैचीने त्यांची उंची कमी करत राहावी. कापलेले गवत हे आच्छादन म्हणून झाडांच्या मूळांशी टाकावे. म्हणजे त्याचे खत तयार होवून ते झाडांना उपयोगी होईल. पण परसबागेत अंतवस्त्र म्हणून गवतच वापरले पाहिजे असे नाही. ज्याकाही पालेभाज्या आहेत.त्याचे एकत्रीत बियाणं हे फळवर्गीय झाडांभोवती पेरावेत म्हणजे गवतही उगत नाही. व जमीनाला जिवंत आच्छादनही मिळते.
तर अशा प्रकारे झाड व गवत हे जमीनीला पूरक आहेत. त्याचा सजगतेने, कल्पकतेने वापर करून घेतल्यास आपले बागेतील उत्पादन वाढीस मदत होते.
गच्चीवरची बाग. नाशिक. 8087475242