Hallo Nashikkar, Are u ready for environmental contribute to Ganesha_Visarjan?नाशिककर आपण गणेश विसर्जनाच्या दिवसासाठी पर्यावरणीय सहभाग देण्यासाठी तयार आहात का…गणपती उत्सव म्हटला की जाम धमाल येते. सजावटीची आरास, गणेश मूर्त्यांची भव्यता, दिव्यता आणि विविधरूपे. १० दिवस कसे आनंदात निघून जातात ते कळतच नाही. मग कातरमनाचा विसर्जनाचा दिवसही उगावतो नि त्यानंतर उगावते तीच पहाट जिचं हिडीस चित्रण विविध माध्यमांव्दारे आपल्यापर्यंत पोहचतय.. होय.. तेच मला म्हणायचय… विसर्जनाच्या दिवशी झालेला कचर्याचा ढिग, मूर्त्यांची आपल्या हातून कळत न कळत झालेली विटबंना… का आपण हा उत्सव शिस्तबध्द सुऱेख, स्वच्छ नाही करू शकत… नक्कीच करू शकतो. पण घरातील प्रत्येकाने, प्रत्येक घरातील व्यक्तिने काही पर्यावरणीय सहभाग घेतला तर ना… चला तर मग एक शपथ घेवूया… या वर्षाचा गणपती विसर्जन हे स्वच्छ, शिस्तबध्द पणे पध्दतीने करूया या…हो मला तेच म्हणायचे… आपण काही गोष्टी पाळल्यातर आपला गणेश विसर्जन कार्यक्रम हा स्वच्छ व सुंदर होवू शकतो..
- बाप्पासाठी प्रसाद म्हणून रोज ताजी फळे ठेवेन… आदल्या दिवसाची फळे प्रसाद म्हणून वाटून खावू.. (कारण पहिल्याच दिवशी प्लास्टिक पिशवीत ठेवलेली फळे ही दहा दिवसानंतर सडून त्याचा दूर्गंध येवू लागतो. ते सफाई कामगारांना त्याचा त्रास होतोच. शिवाय कुणाच्या पोटात पडले तर त्याचा आर्शिवाद मिळेलच की…)
- कोरडा कचरा,, ओला कचरा वेगळा करेन… बाप्पाच्या विसर्जनासाठी येतांना आपल्या प्रशासनाने कचरा संकलनाची व्यवस्था केलेलीच असते. पण यातील ओलाकचरा ( नैसर्गिक कचरा) सुका कचरा ( कागद, काच, पत्रा, लोखंड ) हे वर्गीकरणच करून देईन. म्हणजे त्याचे व्यवस्थापन करण्यास सोपे जाईल.
आपण एवढ्या दोन गोष्टी प्रत्येकाने आपआपल्या पातळीवर केल्यातरी कचरा व्यवस्थापनासाठी खूप मोठी मदत होते. पण यात आणखी एक गोष्टीची माहिती देणे गरजेचे वाटते.मागील वर्षी गच्चीवरची बाग तर्फे बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी केवळ आणि केवळ नारळाच्या शेंड्या गोळ्या करण्याचे आम्ही काम केले होते. जवळपास तीन लोकांनी २ ट्रॅक्टर नारळाच्या शेंड्या गोळा केल्या होत्या.. खर्च फक्त २००० रू. नि शासनाचे ५००० नक्कीच वाचले. असो…तर गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक भाविकाजवळ जावून आम्ही नारळाच्या शेंड्या गोळ्या केल्या. आपण जर ठरवले तर य़ा वर्षी आम्ही भाविकाजवळ जावून शेंडी गोळा करून घेण्यापेक्षा विसर्जनाच्या ठिकाणी आमच्याकडे भाविकांनी फक्त नाशेंड्या आणून दिल्यातर नक्कीच उपयोग होईल. आपल्याला फक्त खालील दोन गोष्टी करावयाच्या आहेत.आपल्या घरी, सोसायटी येथे जे काही नारळाच्या शेंड्या निघतील त्या एका गोणीत गोळा करून ठेवा.. व विसर्जनाच्या दिवशी विसर्जनाची आरती झाल्यावर नारळ फोडला जातो त्याच्याही शेंड्या आमच्या कडे सपूर्त करा. नारळाचा प्रसाद असेल तर तो गायीला गोग्रास म्हणून दिला जाईल.आम्ही या वेळेस १) गंगापूर गाव (अमरधाम) २) बालाजी धबधबा, ३) सोमेश्वर,४) नवश्या गणपती. व ५) पपया नर्सरीजवळील नंदीनी पूल. अशा पाच ठिकाणी शेंड्या संकलन होणार आहेत. तेथे माहितीचा बॅनर व आमचे प्रतिनिधी असतीलच ( १२ संप्टेबर २०१९ रोजी दुपारी १२ ते ६ वाजेपर्यंत)दुसर्या दिवशीपण आपण १३ संप्टेबर रोजी आमच्या मदतीसाठी येवू शकता… चला तर मग आपलं ठरलं असेल तर नक्की या…आपण फक्त एवढच करायचं… ही पोस्ट अधिकाधिक नाशिककरांपर्यंत पोहचवा… हॅश टॅग वापरा… चला होऊन जावू द्या .. एका छोटेसे शेअर बटन हळूच दाबून, खर तर दणक्यात नाशिकची वेगळी ओळख निर्माण करूया…सविस्तर माहितीसाठी क्लीक करा…संकल्पना.. गच्चीवरची बाग, नाशिक.संदीप चव्हाण. 8087475242
