barbecue-area-1194857__340

How to Use Cow dunk Ash…

र र राखेचा….  आजच्या आ

धुनिक जगतात जी काही सुविधा, सोयी तयार झाल्या आहेत. त्याखूप वरवरच्या, तकलादू व अल्पजिवी आहेत. म्हणून कचरा निर्मीती, आजारपण, शेतीतील घटते उत्पादन व पर्यावरण नाश अटळ झाला आहे. हजारो वर्षापासून माणूस समूहाने राहू लागला. तेव्हापासून त्याने निसर्गाला धक्का न लावला त्याची जीवनशैली ठरवली व त्याची परस्पर पुरक अशी सांगड सुध्दा घातली.  त्यातील चूल ही महत्वाची पध्दत. चुल्हीला आपल्या संस्कतीत महत्व आहेच. पण त्यापासून तयार होणार्या राखेला सुध्दा कृषी उत्पादनात अनन्यसाधारण महत्व आहे.

शुध्द गोवर्याची वस्त्रगाळ केलेली राख ही दात घासण्यासाठी करत असत तर गर्भारपणात स्त्रिया कॅल्सशियमची पूर्तता व्हावी यासाठी राख खात असत.

राखेचे गुणधर्मः राख ही पाणी धरून ठेवण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे तिचे प्रमाण हे पंधरा दिवसाला किंवा महिण्याला एका चौरस फूटाला तळ हाताच्या चार बोटावर मावेल एवढेच असावे. अधिक प्रमाणात टाकल्यास पाणी धरून ठेवण्याच्या गुणामुळे कुंडीत किंवा झाडा भोवती गाळ होण्याची शक्यता असते. कारण राख बराच काळ पाणी संग्रहीत करून ठेवते.

खत म्हणून उपयोगः राखेत सुक्ष्म अन्नद्रव्य असतात. जी कीड नियंत्रणाचेही कार्य करत असते. त्या नत्र, स्फूरद व पालाश याचे प्रमाण बर्यापैकी असते. उत्पादक मातीतील अन्नद्रव्य संतूलन करण्यासाठी राख हा महत्वाचा घटक आहे. रोपांना राख दिल्याने पानांचा रंग हिरवागार होतो. फळ फूलांची गळती होत असल्यास त्यास सुक्ष्म द्रव्य मिळाल्याने फळ फूल धरू लागते. शिवाय फळ वाढीस राख ही महत्वपूर्ण भूमिका बजावते. राखेमुळे जमीन भूसभूशीत व्हायला मदत होते.

कीडनियंत्रणः राख व भस्म यात सुक्ष्मसा फरक आहे. राख ही भुरभरीत असते. तर भस्म हे तळहातावर राख घेतल्यानंतर ती हलकीशी झटकल्यास तळरेषांच्या मधे साचून बसते ते भस्म. तर राखेत सुध्दा भस्माचे प्रमाण ( म्हणजे अति बारिक कण) असल्यामुळे तिचा उपयोग हा कीड नियंत्रणासाठी होतो.

काळा मावा, सफेद मावा विशेषतः वालावर येणारा काळा मावावर हाताने फोकल्यास (डस्टींग, धुरळणी केल्यास) राखेतील भस्म हे सुक्ष्म किडीच्या डोळ्यात अथवा पोटात जाते. व त्यांचे कुपोषण होवू लागते. व त्यांचे प्रजोत्पदानास अडथळे येतात. साहजिकच नियत्रंण होवू लागते.

राख ही रान गोवर्या (शेण्या) देशी गायीच्या शेणाच्या गोवर्या असाव्यात. त्या खालोखाल लाकडांची राख चालेल. पण शक्यतो प्लास्टिक कचरा, कागद जाळलेली राख नसावी. राखेत कोळश्याची भूकटी असली तरी चालेल. जी राखेत असतेच. ( अर्धवट जळालेले गोवरी अथवा लाकडामुळे ती तयार होते.)

त्यामुळे होळीची राख अथवा चुल्हीची, तंदुरी भट्टीची, बेकरीतील राख चालेल. तसेच अग्नीहोत्र व देवापुढील अगरबत्तीची राख ही बागेसाठी चालेल.

आम्ही चुल्हीतील राख ही संग्रहीत करून त्यास चाळणी करून एक किलो पॅकींगमधे विक्रीस उपलब्ध आहे.

गच्चीवरची बाग. नाशिक

८०८७४७५२४२.