Farm House Developing

डॉक्टर, बांधकाम विकासक या सम मोठी मंडळी ही शहराबाहेर Farm House साठी जागा विकत घेतात. भरमसाठी गुंतवणूक करतात. शेतगडीची नेमणूक होते. कोणीही गुंतवणूकदार एवढी गुंतवणूक जेव्हा करतो तेव्हा त्यातून काही तरी परतावा अपेक्षीत असतो. त्या प्रमाणे ते तेथे गिर, देशी गायीचे संगोपन करतात. तेथे बाग फुलवतात. वृक्ष शेती करतात. पण योग्य दिशे अभावी यातील परतावा मिळत नाही. फार्म हाऊस डेव्हलप करतांना नेमकी काय दृष्टी असावी. नियोजन कसावे. काम करणार्या लोकांची मने कसे हाताळावीत यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो. आपल्या अपेक्षा समजून त्यातून हायब्रिड मॉडेल कसे तयार करता येईल या विषयी मार्गदर्शन केले जाते. जेणे करून त्यातील गुंतवणूकीचा परतावा हमखास मिळू शकेन.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.