टाकाऊ चहापत्तीचा बागेसाठी खत म्हणून वापर

How to use leftover tea powder in home garden practices

बाग नेहमीच सदाबहार राहण्यासाठी आपण सारेजण सर्वच प्रयत्न करून पहात असतो. झाडांना वेगवेगळी खते देणे, मग काही तयार खते ही बाजारातील असतात. तर काही घरातील कचरा व्यवस्थापनातून त्याचे कंपोस्ट खत तयार करून वापरतो. तर कधी हिरव्या खरकट्या अन्नाचे द्रावण सुध्दा वापरत असतो. असाच एक पदार्थ म्हणजे उकळलेल्या चहाची उललेली चहापत्ती अर्थात चहाचा चोथा..

हा एक नेहमीच उत्पादीत होणारा पण वाया जाणारा खताचा स्त्रोत आहे पण आपण त्यात बागेसाठी बर्याच उपयुक्त पोषक घटक आहेत. त्याचा उपयोग, त्याचे परिणाम आपण पहाणार आहोत.

मुळात बरेच जण चहा गाळून झाला की चहाच्या चोथ्याची गाळणी ही नळाखाली धुतात. त्याने चहातील साखर निघून जाते व परिणामी कुंड्यात ते टाकले की मुंग्या लागत नाही. खर तर असं करू नये. पाणीही वाया घालवतो. नि राहिला मुंग्या या काही फक्त चहाच्या चोथ्यानेच होतात असे नाही. त्या असेही जैविक पधद्तीने बाग फुलवत असल्यास होत असतात. आणि आपल्याला बागेत मुंग्याची शक्यता वाटत असल्यास सरळ त्यात पाणी मिसळून कुंड्याना द्राव्यखत म्हणून द्यावी. मुंग्याचाही प्रश्न मिटतो व पाणीही वाया जात नाही.

तर चहाचा चोथा असाही आपण कुंडीतील मातीत मिसळला तरी चालतो. मात्र कुंड्या चार-पाच तरी असाव्यात म्हणजे टर्न बाय टर्न प्रत्येकाला खत मिळते शिवाय एकाच कुंडीत त्याचा थर तयार होत नाही. तर न धुताही आपण चहापत्ती वापरू शकतो.

शक्य झाल्यास एका सच्छिद्र बॅगेत चहा पत्ती गोळा करावी. ती टांगून द्यावी म्हणजे हवा लागून त्यातील पाणी उडून जाते. अशा बॅगेतील पत्ती आपल्याला आठवडा- पंधरा दिवसातून एकदा प्रत्येकाला खत म्हणून देवू शकतो.

तसेच एकाद्या ताटलीत किंवा डब्यातही चहा पत्ती गोळा करू शकतो. त्याचा आंबट वास किंवा दुर्गंध येत नाही. फक्त त्यात पाणी साठायला नको एवढीच काळजी घ्यावी. म्हणजे ती वापरतांना गाळ हाताला लागणार नाही.

वाळवलेल्या चहा पत्तीचा वापर आपण वरखत म्हणून करू शकतो. तसेच वाळलेल्या चहापत्तीचा तसेच वापरेल्या टी बॅग्जसचा ( दोरे व स्टेपल्स पिन काढून टाकाव्यात) कुंड्या भरण्यासाठी कोको पिठ सारखा वापर करू शकतो.

गुलाबाच्या झाडांला चहापत्तीचे खत उत्तम लागू होते. फुलांची संख्या व आकार वाढतो. अर्थातच फक्त चहापत्ती देवूनच गुलाब फुलतात ही चुकीची धारणा आहे. इतरही काही गोष्टी पुरवावे लागतात. तसेच त्यातील टॅनिक असिड मुळे जमीन सुपिकता वाढण्यास मदत होते. तसेच  होण्यास मदत होते. मातीत हवा खेळती राहते. कंपोस्टीग हे सहज रित्या होत असल्यामुळे वेळोवेळी झाडांना खत मिळतेच पण गांडुळेही त्याला पचवतात.

लेख आवडल्यास नक्कीच like, Share, comment करा.

गच्चीवरची बाग, नाशिक.


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants