How to grow Lemon Tree in Garden

Lemon Tree परसबागेत लिबूंचे झाड कसे वाढवावे….

लिंबू हा भारतीय जेवणातील महत्वाचे फळ, डॉक्टर रोज आपल्याला फळ व फळाचा रस पिण्यास सांगतात. त्यावेळेस सर्वात स्वस्त म्हणून लिंबूचा आपण वापर करू शकतो. रोज सकाळी गरम पाण्याबरोबर लिंबूंचे सेवन हे आरोग्याला ऊर्जा प्रदान करणारे असतेच. पण वरण भात, पोहे यावरही पिळून खाल्यास चव व त्या जेवणाची उपयुक्तता वाढते. कफ प्रवृत्ती असलेल्या मंडळीनी कधीही गार पाण्याबरोबर लिंबू सरबत अथवा लिंबू पाणी पिवू नये. तर असे हे लिंबू फळाचे झाड आपल्या परसबागेत, गच्चीवर थोडक्यात शहरी परसबागेत अथवा बागेत, शेतीत असणे गरजेचे असते. आपण ते हौसेने लावतोही, पण लिंबू येत नाही.. खर तर यात बर्याच गोष्टी मूळापासून समजून घेतल्या तर लिंबू हे भरपूर फळ देणारे झाड आहे… (पुढे वाचा)

बियांपासून लिंबू लागवडः बरेचदा एकादा लिंबू छान लागतो आपण त्याचे बिज रूजवतो. रोप छान तयार होते. बरीच वर्ष खर्ची होतात पण लिंबू लागत नाही…बियापासून लिंबूचे रोप तयार केले असेल तर जमीनतच लागवड करावे लागते. तसेच त्यास सात ते बारा वर्ष लिंबू येण्याची वाट पहावी लागते.

कलम लिंबूः नर्सरीत लिंबू आलेले रोप तयार मिळतात. अर्थातच ते कलमापासून तयार केल्यामुळे ते आपण आपल्या घरच्या बागेत, कुंडीत, ड्रम, विटांच्या हौदात लागवड करता येते. योग्य ती काळजी, खत, पाणी पुरवठा केला नाही तर त्यासही कालांतराने लिंबू लागत नाहीत.

लिंबू या झाडाला पूर्ण वेळ उन्हाची गरज असते. पूर्ण वेळ ऊन असेल तर त्याच अन्न तयार होते व त्यास फुले-फळे लगडतात.

gardening Couse

लिंबूला पाणी देण्याची पध्दतः लिबूंचे रोप जमीनीवर लागवड केलेले असल्यास त्यास तीन वर्ष पालन पोषण करणे गरजेचे आहे. झाड बर्यापैकी बाळसे धरले असल्यास त्यास हाताने पाणी भरू नये. कारण या तीन वर्षात त्याच्या मुळ्या बर्यापैकी पसरलेल्या असतात. त्यामुळे त्यास उठसूठ पाणी देवू नये. छान रूजलेले झाड असल्यास त्यास पावसाच्या पाण्यावर फेब्रुवारी पर्यंत पोसू द्यावे. फेब्रुवारी शेवटाला त्यास फूले आलेली दिसतील. फूलांनी फळ पकडली की फळ पोसण्यासाठी पाणी सुरू करावे ते थेट पाऊस सुरू होई पर्यंत.. लिंबूला पावसाळ्यातच लेंडी खत, द्यावे. त्यानतंर महिण्याला झाडांच्या उंची, आकार मानानुसार ५०० ग्रॅम ते १ किलो निमपेंड द्यावी. सोबत जिवामृत द्यावे. (पुढे वाचा) 

लिंबू कुंडीत लावलेले लिंबू असल्यास लिंबू हा छोट्या कुंडी पेक्षा मोठी कुंडी अथवा ड्रम घ्यावा. पाण्याचा निचरा होण्यासाठी बर्यापैकी तळाशी छिद्र असावेत. नारळाच्या शेंड्या टाकून त्यावर पालापाचोळा, गांडूळ खत टाकून झाड लावावे. संपूर्ण झाड खत मातीत लावल्यास कालांतराने पाण्याचा निचरा होत नाही. शिवाय वर खतं टाकता येत नाही. वरील सांगीतल्या प्रमाणे कुंडी, ड्रम भरल्यास पालापाचोळा कंपोस्टींग झाल्यामुळे वर खत देण्यास जागा मिळते.

एवढे सारे करूनही लिंबू येत नसल्यास त्यास महिण्यास एक कोंबडीचे अंड टिच मारून द्यावे. जमीनीत असल्यास झाडाच्या घेरानुसार जमीनीवर एक फुटावर एक अंड दर महिण्यास द्यावे. मनगटाएवढा खड्डा करावा. त्यात टिच मारलेले अंड ठेवून त्यावर माती ढकलावी. घरी कुत्रे मांजरे असल्यास त्यावर फरशी अथवा विट ठेवावी म्हणजे ते उकरून काढत नाही. झाडांना अंडी उन्हाळ्यात देवू नये. कुंडी किंवा ड्रम मधे मात्र लिंबूच्या खोडापासून एक फूट दूरवर अंड द्यावे. (पुढेवाचा)

अंडी देण्याने नेमके काय होतेः अंडी हे सुक्ष्म जैव अन्न असल्यामुळे ते मुळांना खत स्वरूपात मिळते. त्यात गांडुळेही गर्दी करतात. त्यामुळे त्याची ताजी विष्ठा लिंबूच्या झाडांनाही मिळते.

एका गावाची एका लिंबू बागायतदाराची गोष्ट सांगतो. गावपातळीवरची ही व्यक्तीने लिंबूची बाग लागवड केली होती. तो बागेला फक्त एकच खत द्यायचा. ते म्हणजे गावात मेलेली कुत्री, मांजर हे चार झाडांच्या मधोमध पुरायचे.

जमीनीतील लागवड केलेल्या लिंबूला लिंबू येण्यासाठी झाडांच्या मुळांशी मेलेला उंदीर, घुस, बोकड्याची वदडी ( जठर) पुरण्याची प्रथा आहे. पण हे सारे शहरात हाताळणे शक्य नसते व किळसवाणी होते. अशा वेळेस झाडांना खराब अंडी हाताळणे तसेच त्याची उपलब्धता सहज होते. ड्रम व कुंडी पेक्षा विटां रचून केलेल्या हौदात लिंबू व फळवर्गीय झाडे उत्तम वाढतात.

लेख आवडल्यास नावासहित Share, Like, comment करा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

9850569644

क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुंदर बागवानी बनाना चाहते हैं? हमारा ऑनलाइन बागवानी कोर्स आपके लिए सटीक विकल्प है! हमारे विस्तृत कोर्स की पाठ्यक्रम व्यवसायिक एवंम अनुभवों द्वारा तैयार किया हैं और आपको बागवानी के सभी पहलुओं को समझाने में मदद करेंगे।
हमारा कोर्स सब्जी उत्पादन से लेकर बागवानी की योजना तक, मिट्टी विज्ञान, रोपण तकनीक, संचार, फसल संरक्षण, और बागवानी में उपयोग किए जाने वाले तंत्र और मंत्र तक शामिल होता है। आपको इंटरैक्टिव ऑनलाइन पाठ्यक्रम, वीडियो, प्रश्नोत्तरों के विकेंड सेशनका एक्सेस मिलेगा, जो आपको आपकी बागवानी की रफ़्तार से सीखने और हमारे विशेषज्ञों से व्यक्तिगत प्रतिक्रिया प्राप्त करने में मदद करेंगे।


चाहे आप एक नया बागवान हों या अनुभवी बागवान हों, हमारा कोर्स आपकी जानकारी और कौशलों को बढ़ाने में मदद करेगा। आप सीखेंगे कि कैसे अपनी खुद की सब्जियां, जड़ी-बुंटीया, फुल पौधे, धान उत्पादन के साथ साथ टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, फार्महाऊस, खेती बाडी में भी ईस्तेमाल कर सकते है..
अगर आप गार्डेनिंग को लेकर कुछ व्यवसाय बनाना चाहते है, विस्तार करना चाहते है तो डिजिटल मीडिया के कौशल को आप प्राप्त कर सकते है.

आएं हमारे मराठी और हिंदी भाषा में विस्तृत कोर्स की जानकारी निचे दि गयी लिंक व्दारा पांए.

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644

scientific Gardening