भारतीय संस्कृतीत सणावारांना फार महत्व आहे. कारण भारत हा देश कृषीप्रधान देश असल्यामुळे त्यांच्या पेरणी, लागवड, कुळपणी या शेती संबधीत कामांसोबत या सणावारांचा त्याचा परस्पर संबध आहे. त्यातीलच एक सण म्हणजे मकर संक्रात. मकर संक्रांत या दिवशी सुर्य हा दक्षिणायनातून उत्तरायणात प्रदार्पण करतो. यामुळे वातावरणातील गारवा संपून हळू हळू तापमान वाढायला सुरवात होते. या काळात आपण काही बि बियाणे पेरावे अशी प्रथा आहे. आता पेरेलेल्या बिया या छान पणे रूजतात, वाढतात व मार्च एप्रिल पर्यंत छान उत्पादन देतात. उदाः भेंडी, गवार, पालेभाज्या. तसेच वारा वाहण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे किड नियंत्रणात येते. या सणाच्या पुढील पाच सहा दिवसात हळद कुंकूचा कार्यक्रम महिलांकडून साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी महिलाकडूंन आपआपसात वाणाची देवाण घेवाण केली जाते. सध्या महिला प्लास्टिकच्या वस्तूंची, चमचा, वाटी, ताटली अशा किमतीने कमी पण वस्तू रूपात वस्तूंची देवाण घेवाण करतात. यालाच वाण असे म्हटले जाते. हे चूकीचे आहे. वाण म्हणजे बिज होय.

वाण म्हणजे बि बियाणं असा शुध्द अर्थ मराठीत आहे. आणि या आठवड्यात साजरा झालेला सणांच्या दिवशी वाणांचे केलेले आदल बदल म्हणजे प्रत्येक कुटुंबांने आपआपल्या घरी बि बियाणं रूजवणं असा होतो. आपली परसबाग ही घरच्या पोषण आहारासाठी फार महत्वाची, मोलाची जबाबदारी निभावत असते. महिलांनी आपले व आपल्या सोबत कुटुंबियांचे आरोग्य परसबागेतून सुदृढ रहावे म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.

आजही आपण शहरात राहत असलो तरी या सणाचे फार महत्व आहे. उंच उंच इमारतीत राहतांना आपल्या वाटेला आलेली जागा ही बाग फुलवण्यात फार महत्वाची भूमिका बजावते. कारण काही कुटुंबातील बागांना उत्तरायण मधेच पुरसे उन मिळण्याची संधी असते.

तसेच हळद कुंकू उरकायचे म्हणून वाणासाठी वाटी चमचा. ताटलीची प्रथा पडली तेही साहजिकच आहे. पण त्यात आता बदल केलाच पाहिजे. कारण आता प्रत्येकजण आपआपल्याघरी भाज्या उगवण्याचा प्रयत्न करत आहे. व ते गरजेचेही आहे. त्यासाठी वस्तूंच्या ऐवजी वाणांची अर्थात बियांणाची देवाण घेवाण करावी. कारण बियाणं हे फार महत्वाचे आहे. जग बुडवं असावं पण बिज बूडवं नसावं. अशी एक म्हण आहे. तिचा खोलात जावून विचार चिंतन करणं तर गरजेचं आहेच. शिवाय घरोघरी ते कृतीतही आणणं गरजेचं आहे. तसेच सर्वंच महिलांनी एकच प्रकारचं बियाणं आणलं तरी त्यात विविधता असणार आहे. उदा. धणे आणले तर ते वेगवेगळ्या कंपनीचे असणार. किंवा घरचे असणार तरी त्यात उगवण्याचे, उगवूण येण्याचे प्रमाण हे कमी अधिक असणारचं.

तर या हळद कुंकवाला आपण आपआपसात बि बियाणं, खते, कंपोस्टींग कल्चर, सिडलींग कप,  द्राव्य खते. भाजीपाला पिकवण्या संदर्भातले साहित्य देवाण घेवाण करावे. जेणे करून बाग फुलवण्यात त्या त्या कुटुंबाला प्रेरणा मिळेल. प्लास्टिकचा वापर टाळा, अशा वस्तू या कमी किमतीच्या असल्यातरी त्या कचराच तयार करतात. शिवाय अशा वस्तू वारंवार तेच तेच प्लास्टिक रिसायकल केल्यामुळे त्यात विषारी पदार्थ हे असतातच. त्यामुळे ते टाळलेलेच बरे.

चला तर मग आपण वेगळ्या पध्दतीने मकर संक्रात साजरा कराच पण खर्या अर्थाने तिळ व गुळ द्या. भले ते लाडू नसतील तरी चालतील. पण तिळ व गुळाच्या सेवनामुळे खर्या अर्थाने शरिराला पोषण मिळेल. हलव्याची साखरेची चार देणे देवून तिळगुळ दिल्या व घेतल्यासारखे करू नका. त्यातून खोटेपणाच समोरच्या पर्यंत पोहचतो. विशेषतः मुलांसाठी. चलता है अस म्हणत हलव्याची दाने मुलांच्या हातावर देवू नका. त्यांना विचाराला प्रवृत्त करता येईल असे काही प्रश्न विचारा. जेणेकरून ते चिकित्सक होतील.

आपल्याला वाणासाठी बि बियाणे, भाजीपाल्याची रोपे, सिंडलींग कप, खत, द्राव्य खते, ग्रो बॅग्ज, पॉटींग मिक्स हे छोट्या पॅकेटेस मधे, कमी किमतीत गच्चीवरची बाग व्दारे उपलब्ध करून दिले जातात.

उपलब्ध बियाणांची यादी 

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.