Free Plant Diagnosis & Consultation
वनस्पती मोफत निदान व सल्ला…
बरेचदा आपल्या बागेतील, कुंड्यामधील झाडांबद्दल काहीना काही प्रश्न असतात. बरीच मंडळी आम्हाला त्या बद्दल विचारणा करत असतात, त्यांना पडलेल्या प्रश्नांनाही आम्ही उत्तरे देत असतो. झाडां बद्दल फक्त लक्षणं ऐकून त्यावर उपाय सांगणे अवघड जाते. त्या संद्र्भात वनस्पतीची इतिहास plant History समजून घेणे गरजेचे असते. आता तुम्ही म्हणाल झाडंच तर आहे.. त्या साठी एवढी चौकशी कशाला.. वर वर लक्षणे ऐकून ( प्रत्यक्ष पाहणं वेगळे) निदान सुध्दा वर वर होते आणि त्यावरचा उपाय सुध्दा वर वर किंवा तात्पुरता ठरतो.
उदाः आपल्याला सर्दी झाली तर डॉ.कडे जातो. ते आपल्याला त्या संदर्भात सारी चौकशी करतात. सर्दी कोणत्या प्रकारची आहे. कधी पासून झाली. नेहमी होते का.. घरात कुणाला झाली आहे का.. सर्दी आता कोणत्या स्तराला आहे ( पिकली, कफ झाला आहे का ) याचा ते तपास करतात. शिवाय तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटीला गेल्यामुळे तुमचे वय, तुमचे राहणीमान, झोप घेण्याचा अंदाज, चेहर्यावरचा ताण, शरिरयष्टी हा सारा कयास लावतात. मग कुठे जावून त्याचे निदान करतात. व एक औषध सुचवतात. आणि आवर्जून सांगतात की फरक पडो किंवा ना पडो एकदा पुन्हा दाखवयला या.. ( अर्थात बरं वाटल्यावर परत कुणी जात नाही.) तर असे हे निदान केले जाते.
आम्ही सुध्दा आपण लागवड केलेल्या वनस्पतीचे निदान करण्याची एक प्रश्नावली तयार केली आहे. आपल्याला पडलेल्या प्रश्नाविषयी गुगल फॉर्म भरून पाठवला तर नक्कीच आपल्याला झाडं जगवण्याविषयी मदत करू…
कारण बर्याच झाडांचा बळी हा फळे येत नाही, वाढत नाही. फुलच येत नाही. म्हणून ती काढून फेकून दिली जातात. पण योग्य निदान व योग्य उपचार झाले तर झाडे जगतील. व त्याचा परतावा ही आपल्याला मिळू शकेन…
Free Diagnosis & Consultation form
आपल्याला झाडांविषयी काही प्रश्न असल्यास नक्की विचारा, आपल्याला आमचे संकेतस्थळ व लेख आवडला, तर इतरांना Forward करा. Like, Share करा.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
More Information on http://www.sandeep-chavan.in
[…] गुगल फॉर्म तयार केला आहे. ज्याव्दारे Plant Diagnosis & consultation केले […]