A Step-by-Step Guide to Cultivating Your Own Terrace Gardening
सध्या शहरीकरणाने वेग घेतला आहे. शेती जावून आता तेथे सिमेंटच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या ईमारतीवर आता Organic पध्दतीने Terrace Gardening करता येते. या विचाराने व प्रयत्नांनी आता कुठे वेग पकडला आहे. कारण बागकाम हा फक्त छंद नसून आता ति एक आरोग्यादायी, हेल्थी लाईफ साठीची गरज तयार झाली आहे. तर या बिल्डिंग्स व अपार्टमेंटमधे टेरेस, पेन्ट हाऊसेस उपलब्ध असतात. यात वैयक्तिगत व सामूहिक पातळवीवर टेरेस गार्डेन Terrace Gardening करता येते. ते सुध्दा कमीत कमी वजन अर्थात 10 टक्के मातीत तयार करता येते. शिवाय टेरेसला ओल किंवा गळती लागू नये म्हणून विविध प्रकारची काळजी, तंत्र व उपाय आम्ही शोधून काढले आहेत. तर टेरेस गार्डनिंग करणे किती सोपे झाले आहे व ते सुध्दा ऑरगॅनिक पध्दतीने फुलवता येते. ते आपण या लेखातून अभ्यासणार आहोत. – संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
Table of Contents
गच्चीवरची बाग अर्थातच ग्रो ऑरगॅनिक ही फर्म गेल्या 25 वर्षापासून काम करत आहे. विंडो गार्डेनिंग ते फार्महाऊस या क्षेत्रात काम करत आहे. नाशिककरांना व्यावसायिक सेवा सुविधा पुरवल्या नंतर डिसें. 2022 पासून टेरेस गार्डेनिंग Organic Gardening कोर्सेस सुरू केले आहेत. हे कोर्सेस ऑनलाईन Terrace Gardening असून हिंदी व मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
1. टेरेस गार्डनिंगची गरज आणि महत्त्व (Importance and Need for Terrace Gardening)
- शहरातील जागेची कमतरता आणि टेरेसचा वापर: शहरात जागेची कमतरता असते. पण उपलब्ध टेरेसचा Terrace Gardening विविधतेने कसा उपयोग करावा, त्याची मांडणी कशी असावी हे आधी समजून घेतले पाहिजे.
- घरातील ताज्या भाज्या आणि फळांचे फायदेः विषमुक्त भाज्या या आश्वासक, खात्रीशिर असतात. त्या आकार,चव, गंध या नुसार सहजतेने ओळखता येतात. त्याचे Eye Opening आरोग्यदायी फायदे काय आहेत त्यांची यादी बनवली तर ति न संपणारी आहे
- पर्यावरणपूरक आणि शाश्वत जीवनशैलीचे महत्त्व: आजच्या धकाधकीच्या जिवनात पर्यावरण व सस्टेनेबल लाईफ गरजेचं झाले आहे. नाका पेक्षा मोती जड असं बर्याच जणांच्या बाबतीत होतं. थोडक्यात खाण्या पिण्या पेक्षा दवा पाण्याचाच खर्च जास्त होत असतो. त्यामुळे पर्यावरण पुरक जगणं आता गरजेचं झाले आहे.

2. टेरेस गार्डनिंगसाठी आवश्यक तयारी (Preparation for Terrace Gardening)
- जागेची निवड, माती, खते, आणि रोपेः टेरेस गार्डनसाठी टेरेस जरी उपलब्ध असले तरी सर्व जागेवर गार्डेन तयार करून चालत नाही. कुठे काय असावं, पाणी ड्रेन होण्याच्या जागा, फिरण्यासाठी, मांडवासाठीची जागा यासाठी तज्ञ व्यक्तिकडून मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे.
- योग्य भांड्यांची निवड (प्लांट कंटेनर्स): टेरेस गार्डेनसाठी Terrace Gardening कोणत्या प्लॅन्टर, कंटेनर्स, कुंड्याची, बॅगाची निवड करावी तसेच अ.ब.ब. सेटअप कसा तयार करावा, त्यातील बारकावे हे समजून घेणं गरजेचं आहे. आली लहर केला कहर अशा पध्दतीने बागकाम केल्यास उत्साह माळवण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे त्यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचं आहे.
- पाण्याची सोय आणि जलव्यवस्थापनः एकूण टेरेस गार्डेनिंगसाठी पाण्याची काय, किती, कधी कशी व्यवस्था असावी ती कशी असावी. याचाही अंदाज बाधंणे गरजेचं आहे. किंवा माहिती असणे गरजेचे आहे.

3.) टेरेसवर साध्या पद्धतीने बाग फुलवण्याचे तंत्र (Simple Techniques for Terrace Gardening)
- कंपोस्ट खत (Composting) तयार करण्याचे मार्गः घरच्या घरी, सोप्य पध्दतीने विविध खतं तयार करता येतात. होम कंपोस्टींग साठी कमी खर्चाचे सेटअप कसे तयार करता येतात. त्यासाठी कोणती साधने, त्याचा कार्यकारण भाव लक्षात घेतला पाहिजे तर आपल्याला बागकामासाठी होम कंपोस्टिंग करता येते. बरेचदा मंडळी बाजरातील कंपोस्टर विकत आणून काही दिवस वापरतात नंतर धुळ खात पडत असतात.
- मल्चिंगचे फायदेः मल्चिंग म्हणजे काय, ते कसे करावे. का करावे, कधी करावे, त्याचे फायदे काय आहेत या बद्दल सविस्तर माहिती गोळा करणे गरजेचं आहे. शिवाय त्याचा वेळोवेळी वापर कसा करावा हे समजून घेतले तरच टेरेस वर टेरेस गार्डेनिंग करण्यात मजा आहे.
- योग्य पद्धतीने रोपांची लागवडः नर्सरीतून आणलेली रोपे कशी लागवड करावीत? बियाणं कसे लागवड करावे, पॉटींग, रिपॉटींग कसे करावे या बद्दल माहिती समजून घेतली पाहिजे. तरच लावलेल्या रोपाला फळ व फुल धरतांना आनंद होऊ शकेन.

4. संपूर्ण हंगामासाठी पिकांचे नियोजन (Seasonal Crop Planning)
- हंगामानुसार फळे, भाज्या, आणि फुलांचे नियोजनः टेरेस गार्डेन करतानां मोसमानुसार कोणतं बि बियाणं येऊ शकेन. कोणती फुलं, फळं भाज्या कशा व किती प्रमाणात लागवड कराव्यात याची माहिती असणं गरजेचं आहे.
- ठिबक सिंचन प्रणालीचा वापरः टेरेस गार्डेन मध्ये ठिबक सिंचन योग्य की अयोग्य, त्याचा खर्च, त्याचे फायदे तोटे समजून समजून घ्या. बरेचदा ऐकीव बघितलेल्या माहितीवर बागकाम करतांना व ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवतांना अनेक गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
- कीटक नियंत्रण आणि सेंद्रिय पद्धतीः कीड ओळखता आली तर कीड नियंत्रण करता येते. त्यामुळे कीड नियंत्रण म्हणजे काय? , त्याचे व्यवस्थापन कसे करावे या संबधित सर्व घटकांचा सांगोपांग विचार होणं गरजेचं आहे.

5. टेरेस गार्डनिंगचे फायदे आणि आव्हाने (Benefits and Challenges of Terrace Gardening)
- जैवविविधता आणि पर्यावरणाचे रक्षणः टेरेस गार्डेन करतांना बायो डायव्हसिटी कशी फुलवावी त्याने पर्यावरणाचे पर्यायाने आपले आरोग्याला कसे फायदेशिर आहेत. त्यातील संधी, फायदे व आव्हाने या बद्दल चर्चा केली पाहिजे. तरच बागकाम हे उत्तम रित्या जमू शकेन.

6. टेरेस गार्डनची यशस्वी कथा (Success Stories of Terrace Gardens)
- यशस्वी बागकाम करणाऱ्यांची उदाहरणेः आमच्या तंत्रानुसार ज्यांच्या घरी बागा फुलवून दिल्या त्यांची ही यशस्वी उदाहरणे अभ्यासणं गरजेचं आहे. त्यांच्या प्रेरणादायी कथा समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे त्यांचे अनुभव तुम्हाला तुमच्या बागेत उपयोगत करता येतो.
- अडचणींवर मात करण्याचे उपायः टेरेस गार्डेन Terrace Gardening तयार करतांना काय अडी अडचणी येतात. त्याचा संभाव्य विचार, उपाय आधीच मनात योजून ठेवला पाहिजे. किंवा अडी अडचणींच्या वेळेस मदत होईल अशा तज्ञांकडून शिकण्याची तयारी केली पाहिजे.

- 5 Stop Random Gardening Tips
- Organic Terrace Gardening
- Guess this seeds!
- Do you know this Fruit?
- Do You Know This Plant?
English: Terrace Gardening Course 2024, Organic Terrace Gardening India, How to Start a Terrace Garden, Urban Organic Gardening, Terrace Garden Tips, Beginner’s Guide to Terrace Gardening, Sustainable Gardening 2024, Organic Gardening Course , Hashtags: #TerraceGardening2024 #OrganicGarden #IndianGardening #SustainableLiving #UrbanGardening #GardeningTips #OrganicGardeningCourse #BeginnerGardening, Marathi: टेरेस गार्डनिंग कोर्स २०२४, सेंद्रीय टेरेस गार्डनिंग भारत, टेरेस गार्डन कसा सुरु करावा, शहरी सेंद्रीय गार्डनिंग, टेरेस गार्डन टिप्स, टेरेस गार्डनिंगसाठी प्रारंभिक मार्गदर्शक, शाश्वत गार्डनिंग २०२४, सेंद्रीय गार्डनिंग कोर्स, Hashtags: #टेरेसगॉर्डनिंग२०२४ #सेंद्रीयगॉर्डन #भारतीयगॉर्डनिंग #शाश्वतजीवन #शहरीगॉर्डनिंग #गॉर्डनिंगटिप्स #सेंद्रीयगॉर्डनिंगकोर्स #प्रारंभिकगॉर्डनिंग
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.

You must be logged in to post a comment.