5 Ways School Garden

90 / 100 SEO Score

Why Are Children Missing School Garden ?

Unlocking Children’s Potential Through School Gardens

शाळेतील बागेमुळे मुलांचे संपूर्ण विकास कसे साध्य होते?

शाळेतील बागांची संकल्पना शैक्षणिक यशासाठी कशी महत्त्वाची आहे?

शाळेतल्या बागा मुलांच्या भावनिक आणि शैक्षणिक विकासासाठी School Garden मोठी भूमिका बजावतात. या बागांमुळे मुलांचे नैसर्गिक कौशल्य वर्धन होते. शाळेतील बागांचे महत्त्व आजच्या शिक्षण प्रणालीत अधिक वाढले आहे. या बागांमध्ये मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते, तसेच त्यांच्यामध्ये नैसर्गिक प्रेम जागृत होते. शिक्षकांनी आपल्या अनुभवातून बागांच्या या महत्त्वपूर्ण परिणामांवर लिहिणे आवश्यक आहे.- संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कंन्सलटंट व कोच

 1. शाळेतील बागांचे महत्त्व

  • शाळेतील बागा मुलांच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात. मुलांचा बौध्दिक, शारिरिक, मानसिक विकास होणं हे प्रत्येक शिक्षक व शिक्षिकेचं स्वप्न असतं. ते त्यासाठी जिवापाड काम करत असतात. जे जे उत्तम आहे ते देण्याचां त्यांचा प्रयत्न असतो. मग तो स्वतःच्या आयुष्यातील अनुभव असो किंवा उपक्रम असो. मुलांना त्याची माहिती देणं, त्यात सहभागी करणं. प्रत्येक शिक्षक हा कठीण परिस्थितीतून तयार झालेला असतो. त्यामुळे त्याला निसर्ग, गावकडचे गावपण, झाडांचे, निसर्गाचे महत्व माहितीच असते. पण त्याचा अनुभव मुलांना देतांना अभ्यासक्रम कुठेतरी कमी पडतोय. त्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त देण्यांचा त्यांचा प्रयत्न असतो. तो जो निसर्गासोबतचा अनुभव, त्यातील व त्यासोबत शिकलेले बारकावे हे मुलांना सांगायचे असतील तर शाळेत परसबागा School Garden अर्थात पोषणबाग ही तयार झालीच पाहिजे. त्यासाठी शाळेतला एकतरी शिक्षक हे स्वप्न उराशी बाळगून असतो.

2. मुलांचे शारीरिक आणि मानसिक विकास

  • बागकामामुळे School Garden मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम व प्रभाव पडत असतो. हे प्रभाव व परिणाम पि हळद व गोरी या सारखे नक्कीच नसते. त्यांचे परिणाम दिसायला वेळ जातो. पण बागकामाचा मुल्यांच्या व पर्यायाने त्या शिक्षकाच्या व्यक्तिमत्वात आमुलाग्र बदल झालेला असतो. मुलं ही एका जागेवर बसून मनाने थकून जातात. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असते. पण बागाकामामुळे ही ऊर्जा सकारात्मक पध्दतीने वापरता येते. तसेच बागकाम हे प्रोडक्टीव्ह अर्थातच उत्पादक असा उपक्रम आहे. घरी शेती असणं व शाळेत समवयस्कांसोबत बागकाम करणं यात खूप अंतर आहे. अर्थातच हे शारिरक व मानसिक विकास हा निसर्गाच्या सानिध्यात होतो.

3. नैसर्गिक कौशल्य वर्ध

मुलांचे नैसर्गिक जगाशी सख्य वाढते. निसर्ग व निसर्गातील इतर घटकांचे काम, त्यांचे अमुल्य योगदान हे मुलांना बागकामातून लक्षात येत असते. तसेच शेती हा विषय पाठ्यपुस्तकाप्रमाणे रटण्याचा विषय नाही. तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. निसर्गातील सु्क्ष्म जिव हे किती परस्परांलबीत असतात. त्यांची रचना, त्यांना सोपवलेली जबाबदारी हे जेव्हां मुलांच्या लक्षात येऊ लागते. तेव्हां मुलं निसर्गाला समजून घेण्याचा प्रयत्न करतातच. शिवाय ते त्याला सर्वोतोपरी जपण्याचा मनोमनी शप्पथ घेतात. निसर्गासोबत काम करतांना ते त्यातील निरिक्षण, बारकावे, त्यांचे कार्यप्रणाली, कार्यकारण भाव, त्याचे विश्लेषण असे अनेक कौशल्यांचे आपसुकच संवर्धन होऊ लागते. आणि हे सर्वकाही एका बागेमुळे School Garden घडते हे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे.

Free Gardening Course

4. शाळेतील शिक्षकांचा अनुभव

  • शिक्षकांनी शाळेतील बागांचे अनुभव हे ऐकण्यासारखे आहेत. मुळातच शिक्षक हा संवेदनशिल व्यक्तिमत्व असते. नाही म्हटलं तरी एक अप्रत्यक्ष जबाबदारी असते. ते म्हणजे मुलांचे व्यक्तिमत्व तयार करणं, त्यांना या जगात व्यवहाराच्या काबिल बनवणं. त्यामुळे जे जे उत्तम आहे व ज्या ज्या मार्गाने देता येईल हा त्यांचा प्रयत्न असतोच. तसेच स्वतः संवेदनशिल असल्यामुळे निसर्गाप्रती त्याची संवदेनशिलता ही जगजाहीर आहे. परसबाग ही फक्त कार्यानुभवाचा तास नसून तो कर्तृत्वानुभवााचा , भानाची तासिका असते. मुलांमधे होणारे सुक्ष्म बदल सुक्ष्मपणे नोंदवण्याची क्षमता शिक्षकांकडे असते. त्यामुळे शाळा व पर्यायाने कृतीशिल शिक्षक परसबागेकडे आवडीने लक्ष पुरवतात.

5. शाळा आणि बागांचा शैक्षणिक लाभ

मुलांच्या शिक्षणात बागांचा वापर करावा. कारण यात मुलांचा सर्वांगीन विकास होतांना दिसतो. याचे विविध स्तरावंर व विविध वयोगटातील समाजासाठी अनंतक फायदे आहेत. म्हणूनच महाराष्ट्र शासन त्यासाठी शालेय पोषण परसबाग या स्पर्धेचे आयोजन करते. त्यात त्यांना तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर बक्षिसं दिली जातात. त्याना गौरव चिन्ह व सन्मान प्रदान केला जातो. ही प्रत्येक शाळेसाठी, शिक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

6. ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच संदीप चव्हाण

7. बागकाम विषयावरील लेखः

9. बागकाम विषयावर गार्डेनिंग कोर्सेस उपलब्ध :

टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स ,  फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स 

Vegetables Seeds

10. व्हेजेटेबल सिड्स उपलब्ध

1एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक: बियाणं म्हणजे छोटं पण अतिशय शक्तिशाली गुंतवणूक आहे. योग्य पद्धतीने केली तर, या गुंतवणुकीतून आपल्याला अनेक पटींनी अधिक उत्पादन मिळू शकतं. तुमच्याकडे जर बागकामाची इच्छा असेल तर, उपलब्ध साधनं, संसाधनं, आणि जागा यांचा योग्य वापर करता येईल. त्यातून तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा अंगणात चांगल्या प्रकारे भाज्या उगवू शकता. फक्त थोडासा प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. बियाण्यांबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि आपल्या गार्डनिंग प्रवासात भरघोस यश मिळवा.

शाळेतील बाग, School Garden, Children Development, Educational Growth, शिक्षकांचे अनुभव, #SchoolGarden, #ChildrenGrowth, #OrganicGardening, #TeachersExperience, #GardeningEducation


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Importance of Gardening (English) Importance of Home grown (Hindi) Earth is like (English) VIMP for Green Salad
10 OxyGen Plants