गच्चीवरची बागः क्रांतीकारक साधन.

0 (94)

संदीप चव्हाण, नाशिक.

शेती हा सर्वांचाच जिव्हाळ्याचा, गरजेचा, उपजिवेकचा, रोजगाराचा महत्वाचा मुद्दा आहे. अर्थातच शेतीत पिकते म्हणूनच मनुष्य व त्या सोबतची पाळीव जनावरे, पशु, पक्षी जगताहेत. बहुतांशी उदयोग धंद्यासाठी कच्चा माल हा शेतीतूनच पुरवला जातो. शेती, जंगल, निसर्ग यांचा नाश करूनच सध्या शहरं उभी राहत आहेत. शहरांचा विकास होतो आहे. किंबहुना शहरे ही सुध्दा शेतीवरच अवलंबून आहेत. शहराचां विकास खूपच झपाट्याने वाढत आहे. शहरात मनुष्य उंच उंच अशा ईमारतीत जावून राहत आहे. उंचावरून जग न्याहाळत आहे खरा पण जमीनीची ओढ त्यालाही सुटत नाही. निसर्गाची नाळ त्याला तोडवत नाही. म्हणूनच तो सातव्या मजल्यावर गेला तरी तिथे एकाद्या झाडांची कुंडी खिडकीत ठेवून निसर्गाची सोबत करतोय. ही त्याची कृती जंगलासोबतचं, मातीसोबतचं, निसर्गासोबतचं आदीम नात्यांची साक्ष देतं. हीच निसर्गाची त्याची ओढ त्याला निरस अशा शहरी जीवनातही शांत बसू देत नाही. त्याला काही तरी खटपट करायला लावतेच. शहरातील जीवन हे गतीमान झालयं. राहण्याच्या जागा संकुचित झाल्यात. मनुष्याला कमीत कमी जागेत अधिकाधिक सुखसोयी, सुविधा असाव्यात असे वाटते. रोजच्या समस्यावर तो मार्ग काढतो. निसर्ग आपल्या पासून दूर जातोय हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने आपण राहतो त्या ठिकाणी निसर्गाला घेवून आला. खिडकी, गॅलरी, गच्ची येथे तो कुंड्या, वाफे, पिशव्या यात विविध फूलझाडे व वनस्पतींची लागवड करू लागला.

या सार्यांनाच आता शहरी शेती असे संबोधन मिळत गेले. लोक जमेल तसे, होईल तसे, एकमेंकाकडून शिकत ही संकल्पना आपआपल्या पातळीवर रूजवू लागले. ही संकल्पना केवळ हिरवाईचा छंद नाही राहिला. तर ती काळाची गरज झाली आहे. तो स्थानिक रोजगाराची संधी तयार झाली. तशीच ही  संकल्पना आता सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया ठरू लागली आहे. तसेच पर्यावरणीय संरक्षणासाठी घेतलेला स्वंयम प्रेरीत पुढाकार ठरत आहे.

शहरं म्हटले की त्याच्याही काही समस्या असतात. त्यातील प्रमुख समस्या म्हणजे कचरा निर्मिती होय. या कचर्याचे करायचे काय या विचारातून तो त्याच्या विल्हेवाटीची, व्यवस्थापनाची विविध प्रयोग करत आहे.

कचर्यातून बाग फूलवणे ही संकल्पना आता जोर पकडू लागली आहे. किचन मधील वेस्ट हे गार्डन मध्ये जावे व गार्डेन मधील भाजीपाला किचन मध्ये यावा अशा परस्परपुरक संकल्पनेतून बाग फूलवता येते. अशा शहरी शेती या विषयात पूर्ण वेळ काम काम करणारा एक सामाजिक उदमशीलता म्हणून गच्चीवरची बाग, नाशिक याकडे बघता येईल. गच्चीवरची बाग या सामाजिक व्यवसायाने गेल्या बारा वर्षापासून या संकल्पनेवर कचर्याचा सृजनशील व उत्पादनशील तत्वावर काम करत, लोकामध्ये विविध माध्यमांव्दारे जागृती घडवत हा विषय पुढे नेत आहे.

शहरी शेती नेमकी लोकल ते ग्लोबल व्यापातील कोणकोणत्या प्रश्नांना व कशी कशी स्पर्श करून त्यावर मात करण्याचे ताकद आहे हे आपल्याला या लेख मालिकेतून सांगण्यात येणार आहे, लोकल ते ग्लोबल या प्रश्नांची यादी केली तर तर तीचं शेपूट हे हनुमानांच्या शेपटा सारखी न संपणारी ठरू शकते. अगदी घरातील नैराश्यापासून ते आंतराष्ट्रीय युध्दखोरी, दहशतवाद इथपर्यंत ही यादी पोहचते. या सर्व प्रश्नांची आपण वर्गवारी केली तर तीचे ढोबळ मानाने पुढील काही प्रकार पडू शकतात.

सध्या जगात ज्याकाही समस्या आहेत. त्याचे वर्गीकरण हे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण राजकीय या गटावारीत विभागता येईल.

जल, जंगल, जमीन, जनता व  जनावरं, या पाच घटकांवरच सारीच जिवसृष्टी अवलंबून आहे व हे पाच घटक म्हणून या पृथ्वी तलावरील पंचमहाभूतांची पाच चाकं आहेत जणू यातील एक चाक जरी खिळखिळ झालं तरी सारा डोलारा कोसळू शकतो नव्हे तो कोसळत आहे याकडे आता शास्त्रज्ञ लक्ष वेधत आहे. व यावर मात करणे शक्य आहे. अनेक उपायापैकी एक म्हणून शहरी शेती त्यासाठी साकारणे गरेजची आहे. कालानुरूप तिचे महत्व ठाशीव स्वरूपात पुढे येवू लागले आहे.

वरील वर्गवारीतील प्रत्येक गटात ज्या काही समस्या येतील त्यातील बहुंताशी प्रश्नांची उत्तरे ही शहरी शेती केल्याने सुटू शकतील अशी खात्री वाटते. ही नेमकी प्रश्न कोणती आहेत. त्यावर शहरी शेतीने कशी मात करता येईल. या विषयीचेच विवेचन हे या निवडक लेख मालीकेतून देणार आहे. अर्थातच आपलेही काही मुद्दे असतील, प्रश्न असतील ते आपण विचारू शकता. आपल्याला पडलेल्या कचरा व्यवस्थापन कसे करावे, त्यापासून खत कसे तयार करावे, बाग कशी फुलवावी, बियाणे कसे लावावे, रोपांची काळजी कशी घ्यावी, कीड नियंत्रण कसे करावे, अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे या लेख मालीकेतून दिले जातील.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. व्हाट्सअपः 9850569644

http://www.gacchivarchibaug.in