7 Hidden DIY Gardening Tools !

89 / 100 SEO Score

Struggling Without Tools? Try DIY Gardening Tools!

Be Smart with DIY Gardening Tools !

सुंदर बागेचे स्वप्न साकार करा DIY साधनांनी!

DIY साधनांनी बागकाम सोपे बनवा!

घरगुती वस्तू वापरून बागकामाचे साधनं बनवा. खर्च कमी करा आणि तुमची बाग सुलभतेने फुलवा. खर्च कमी करत DIY गार्डनिंग साधनं DIY Gardening Tools कशी तयार करायची? याविषयी या ब्लॉगमध्ये माहिती दिली आहे. यामुळे बागकाम सुलभ तर होईलच, शिवाय ही माहिती तुम्हाला तुमच्या बागेच्या विकासात मदत करेल.

DIY Gardening Tools

1. आरंभ

आपल्याला गार्डनिंगची आवड आहे, पण महागडी साधनं खरेदी करणं खिशाला परवडत नाही? तुमचंही असंच काहीसं होत असेल, तर काळजीचं कारण नाही. बागकामासाठी महागड्या साधनांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. आपल्या घरात असणाऱ्या साध्या-सोप्या वस्तूंचा उपयोग करून आपण गार्डनिंगला DIY Gardening Tools नवा आयाम देऊ शकतो.

2. घरघुती साधनांची गरज का आहे?

बागकाम करताना बऱ्याचदा आपण विचार करतो, की खास गार्डनिंगसाठी बाजारातून साधनं आणणं गरजेचं आहे. पण खरं सांगायचं झालं, तर काही घरघुती वस्तू आपल्या बागकामासाठी अतिशय उपयुक्त DIY Gardening Tools ठरतात. या वस्तूंनी केवळ खर्च वाचतोच, पण पर्यावरणस्नेही Organic Gardening गार्डनिंगलाही चालना मिळते.

3. घरच्या घरी DIY गार्डनिंग टूल्स कसे तयार कराल?

  • घरातली काही विसरलेली, वापरात नसलेली किंवा टाकाऊ वस्तू कशा प्रकारे गार्डनिंगसाठी वापरता येतील, हे पाहूया:
  • 1. जुन्या बाटल्यांपासून पाणी शिंपडायचं टूल: प्लास्टिकच्या जुन्या बाटलीमध्ये झाकणावर लहान-लहान छिद्रं पाडा. ही बाटली पाण्याने भरून झाडांना शिंपडण्यासाठी वापरा. किंवा ठिबक सिचंनासारखा त्याचा वापर करू शकता.
  • 2. टूथब्रशपासून बी पेरण्याचं टूल: जुन्या टूथब्रशला थोडंसं वाकवून त्याचा उपयोग हा बियाणांना मातीमध्ये व्यवस्थित पेरण्यासाठी करा. तसेच झाडांना लागलेली कीड काढण्यासाठी करू शकता.
  • 3. चाळणीतून कंपोस्ट तयार करा. : जुनी स्टील किंवा प्लास्टिकची चाळणी वापरून घरच्या घरी ओला कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित करा. किंवा त्याचा उपयोग कचरा वाळवण्यासाठी करा.
  • 4. प्लास्टिक डब्यांपासून कुंड्या तयार करा: घरात असलेल्या प्लास्टिकच्या डब्यांना खालून छिद्रं पाडून त्यांचा उपयोग झाडं लावण्यासाठी करा. तसेच यांचा उपयोग हा हॅंगीग गार्डेन तयार करण्यासाठी करता येतो.

4. गार्डनिंगसाठी उपयुक्त घरघुती साधनांची यादी:

  1. जुने कात्री – छाटणीसाठी. बागकामासाठी जुन्या कात्रींचा उपयोग हा छोट्या छोट्या फांद्या किंवा शेंडे कापणीसाठी करू शकता.
  2. तुटलेली चमचे – माती ढिलं करण्यासाठी. कुंड्यामधील माती उकरण्यासाठी घरघुती चमच्यांचा वापर करू शकता.
  3. नारळाच्या करवंटी – माती धरून ठेवण्यासाठी. नारळाच्या करवंट्या या छोट्या व हातात सहजतेने पकडण्यासारख्या असतात. त्यांचा उपयोग कंपोस्ट खत अथवा वर माती टाकण्यासाठी करता येतो.
  4. प्लास्टिकच्या पिशव्या – रोपं लावण्यासाठी. विविध पॅकेजिंग मधील प्लॅस्टिकच्या पिशव्याचा वापर हा छोटी छोटी रोपे तयार करण्यासाठी करता येतो. लक्षात ठेवा यातच रोपे कायस्वरूपी ठेवू नये. फक्त सॅप्लिंग तयार करण्यासाठी करावा.
  5. पुठ्ठ्याचे बॉक्स असतील तर त्यांचा उपयोग आकारानुसार त्यात हंगामी भाज्यांची, फुलांची रोपे लागवड करू शकता.

5. घरघुती साधनं वापरण्याचे फायदे:

  1. खर्च कमी होतो: महागडी साधनं खरेदी करण्याची गरज नाही. त्यामुळे अनावश्यक पैशाची गुंतवणूक होत नाही.
  2. पर्यावरणाचा समतोल राखतो: टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर केल्याने नव्या वस्तू निर्मितीत त्याच्या वितरणात होणारा व्याप, प्रदुर्षन टाळता येते.
  3. सर्जनशीलतेला चालना: नवीन कल्पना आणि उपयोग शोधण्याची सवय लागते. आपल्याकडे काय उपलब्ध आहे त्याचा उपयोग करायला आपण शिकतो. व त्याचे समाधानही वाटत असते.
  4. स्वत:च्या हाताने काहीतरी तयार करण्याचं समाधान: आनंद मिळतो व हा आनंद टिकतो सुध्दा.

6. तुमची बाग फुलवण्यासाठी DIY उपाय:

घरातल्या साधनांनी DIY Gardening Tools बागकाम केल्यामुळे फक्त खर्च वाचतो. शिवाय यामुळे आपल्याला बागेसोबत एक वेगळं नातं जोडता येतं. स्वत: तयार केलेली साधनं वापरल्यामुळे बागकामातली मजा आणखीनच वाढते. साधनांच्या खरेदी पेक्षा तोच पैसा आपण विविधतेने बागकाम शिकण्यात खर्च केल्यास त्याचा आयुष्यभर उपयोग होतो.

7. निष्कर्ष:

गार्डनिंगसाठी घरघुती साधनांचा DIY Gardening Tools वापर करणं म्हणजे आपल्या सर्जनशीलतेला वाव देणं आणि पर्यावरणस्नेही दृष्टिकोन जोपासणं. आता तुमचं घरचं सामान घ्या, थोडं प्लॅनिंग करा, आणि तुमची बाग फुलवायला सुरूवात करा. तुम्हालाही DIY गार्डनिंग टूल्स वापरून मिळालेला अनुभव कसा होता, ते आम्हाला नक्की कळवा! ही साधनं तयार करताना जास्त वेळ आणि पैसा खर्च होणार नाही. फक्त थोडीशी कल्पकता आणि कष्ट आवश्यक आहे. चला, पर्यावरणस्नेही गार्डनिंगचा प्रवास सुरू करूया! व Gardening Benefits चा फायदा घेवू या. अशाच टिप्ससाठी आमच्या ब्लॉगला लाईक कराच पण नेहमीच असे टिप्स मिळत राहव्यात यासाठी शेअर व कॉमेंट करा.

DIY Gardening Tools, Home Gardening Hacks, Gardening Essentials, Kitchen Garden Tools #DIYGardeningTools, #HomeGardening, #GardeningHacks, #KitchenGarden, #GardeningEssentials, #GreenLiving, #GardeningTips

Free gardening Course

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants