पावसाळयात बाग फुलवण्यासाठी ची संपूर्ण माहिती
बागकामासाठी पावसाळा सर्वोत्तम
रखरखता उन्हाळा संपून पावसाळ्याची चाहूलच थंडगार झुळकेने व्हायला लागतो. जसा जसा पाऊसाळ्याचे दिवस व पाऊस जवळ येऊ लागतो तशा तशा बातम्या ही कानावर पडू लागतात. आणि न कळत शेतकर्यांची पाऊले शेती कडे वळतात. तर शहरात राहणारी मंडळी आपल्या बागेचा विचार करू लागतात. उपलब्ध जागेचा, उपलब्ध पैशाचा व आपल्या हौसेचा ताळमेळ घालत दोन चार फुलांच्या का होईन हुंड्या व कुंड्याची खरेदी करतात. नर्सरीत जाऊन फुलांची, भाज्यांची रोपं आणतात. तर काहीजण ऑनलाईचा पर्याय निवडून खत पाणी, बि बियाणांची खरेदी करतात. मस्त मातीत हात घालतात. मातीशी जोडंलेलं हे नातंच वेगळं आहे. त्याचं हे समाधानच वेगळे असते. ते आपआपल्या पाताळीवर त्याची गहनता, त्याचा आनंद हा नक्कीच असतो. पण प्रत्येक जण हा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो व त्यात य़शस्वी सुध्दा होतात.

भाजीपाला पिकवण्यासाठी उत्तम असतो पावसाळा
पावसाळा हा सर्वच प्रकारच्या गार्डेनिंगसाठी हा उत्त्म असतो. कारण या दिवसातं सृष्टीवर सर्वत्र पाणी बरसते. त्यामुळे सर्वत्रच तृणाच्या सुक्ष्म बियाणांपासून मोठ्या वृक्षांना पालवी फुटते. सर्वत्र हिरवेगार झाल्यामुळे सुक्ष्म जिवांना खायला अन्न निर्मिती होते तसेच आसरा व निवार्याला जागा मिळते. त्यातूनच त्यान पुर्नउत्पादनांचे चक्र सुध्दा या दिवसातच असते. जिव जिवस्य जिवनम् या उक्ती प्रमाणे एक जिव दुसर्या जिवावर जगू लागतो. या दिवसातच प्रत्येक जिव हा अन्नसाखळीचा भाग बनतो. वनस्पतींना हवे तसे वातावरण मिळते. ते सुध्दा जोमाने वाढू लागतात किंवा जे रूजलेले आहेत ते आणखी मजबूत होतात. तर याच दिवसामधे अगदी भारतीय प्रादेशिक ओळख असलेल्या भाज्यांचे उत्पादन घेता येते.
पावसाळ्यातील भाजीपाला
पावसाळ्यात फुल झाडं व इतर झाडांची लागवड करणे सोपे असते. एकदा झाडं, बियाणं कुंडीत अथवा जमिनीत लागवड केली की त्याच्याकडे वारंवार लक्ष देण्याची, त्याची काळजी घेण्याची गरज पडत नाही. कारण एकदा का ही प्रक्रिया झाली की झाडाला सर्वात महत्वाचे असते ते पाण्याची. गरजे पुरता पाण्याची पूर्तता ही पावसाच्या पाण्याने भागून जाते त्यामुळे त्यात जास्तीच्या वेळेची गुंतवणूक करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे उगवण्यास अवघड वाटणारा भाजीपाला सुध्दा सहजतेने येतो.

पावसाळ्यात ही पिकं देतात जबरदस्त उत्पन्न
पावसाळ्यात सर्वच पिकं बंपर पिक देतअसतात. पण त्याची वर्गवारी नुसार त्यास समजून घेतले तर अधिक सोपे होईल. पालेभाज्या या इतर भाज्यांच्या मानाने अधिक व लवकर उत्पादन देतात. कारण त्यांना एकतर फक्त स्वतःचे म्हणजे पानांचेच अन्न तयार करायचे असते. त्यानंतर कंदमुळे व फळभाज्या तयार होण्यास थोडा वेळ लागतो. महिने दोन महिने झाडं स्वतः फळं देण्याची तयार करत असते. झाडं चांगल वाढलं, जगलं तरच फळं येऊ लागतात. तर वेलवर्गीय भाज्यांची वेल ही तयार होण्यास तिन ते चार महिने घेतात. पण वेलवर्गीय हे अधिक चांगले वाढले तर ते सुध्दा भरमसाठ भाज्यांचे उत्पादन देतात. शिवाय वेलवर्गीयांची लागवड या पूर्वीच केली असेन तर त्यांना पावसाळ्यात अधिक प्रमाणात फळे सुध्दा येतात. तसेच फळ वर्गीयांमधे भेंडी व गवार उन्हाळ्यातच त्याची लागवड केलेली असल्यास त्यास उत्तम व अधिक प्रमाणात भाज्या या पावसाळ्यातच येतात.

पावसाळ्यात पिकवायच्या भाज्याची यादी
भेंडी, गवार या दोन भाज्या सोडल्यास इतर सर्व भाज्यांची लागवड ही पावसाळ्यात करता येते. पाले भाज्या, कंदमुळे, फळ भाज्या व वेलवर्गीय भाज्यांच्या बियाणांची लागवड ही पावसाळ्यात करणंच योग्य असतं. तर काही निवडक भाज्यांची रोपे ही भाजीपाल्याच्या नर्सरीत तयार केलेली असतात. ति तयार रोपे आपल्या बागेत लागवड केल्यास वाढीच्या अवस्थेतील काळजी, मेहनत व वेळ वाचतो. पर्यायाने बागेतील इतर कामांकडे अधिकलक्ष देता येते.

या गोष्टी शिका
बागकाम हे एक शाश्त्र आहे. आली लहर व केला कहर असं करू नका. विषय सहज सोपां, लवकरच गुंडाळण्यासारखा दिसला तरी तसा नाही. हा विषयच खोल आहे. कारण तो निसर्ग आहे, जेवढं त्याला समजून घ्याल तेवढा कमी आहे. तुम्ही स्वतःहून प्रयत्न करत आहात ही कौतुकाची बाब आहेच. पण तुमच्या आवडीला, सवडीला जर योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली तर तुम्ही तज्ञांच्या मदतीने या बागकामाचा प्रवास सुखद, आल्हादायक व सुरक्षित करता येतो. तसेच योग्य प्रशिक्षक तुमचा वेळ, मेहनत व श्रम सुध्दा वाचवतो. आज काल सर्वच वर्तमान पत्रात या बाबतचे लेख मालिका प्रसिध्द होत असतात. ते वाचू शकता. पण युट्यूब व फेसबुक वर या विषयीची माहिती देणारी मंडळी खूप असली तरी ति तोडकी पडते. कारण एका प्रश्नातून अनेक उपप्रश्न तयार होत असतात. व या माध्यमांवर तुमच्यासाठी फुकट माहिती दयायला कोणी बसलेले नाही. शिवाय त्यांच्याशी बोलता येईल असा संपर्क नं. नसतो. त्यामुळे विविध वर्तमान पत्राकडून व हौसी लोकांव्दारे ऑनलाईन कोर्सेस चालतात. त्यात सहभागी होणं गरजेचं असते. व कोर्स सोबत तुम्हाला 24x 7 मार्गदर्शन देणांर कोणी असेन तर सोने पे सुहागा असतं. अशा मंडळीशी जोडून तुम्ही विद्यार्थी बनून आयुष्यभर शिकू शकता.


Join Our Social Media Handals
Monsoon vegetable cultivation, How to grow monsoon vegetables, Tips for cultivating monsoon vegetables, Best monsoon vegetables to grow. Growing vegetables in rainy season, Monsoon gardening techniques, Organic monsoon vegetable farming, Seasonal vegetable cultivation, Monsoon vegetable garden care, Planting vegetables during monsoon, Monsoon vegetable planting guide, Monsoon vegetable garden tips, Rainy season vegetable farming, Best practices for monsoon vegetable gardening, Monsoon vegetable cultivation methods. #MonsoonVegetableCultivation#GrowMonsoonVegetables#MonsoonGardening#RainySeasonFarming#OrganicMonsoonVegetables#MonsoonGardenTips#VegetableGardening#MonsoonFarming#MonsoonVegetableGarden#GrowVegetables#MonsoonPlanting#RainySeasonGardening#OrganicFarming#GardeningTips#SeasonalVegetables #पावसाळ्यातभाजीपाल्यालागवड #पावसाळ्यातभाजीपालावाढवा #पावसाळ्यातीलबागकाम #पावसाळ्यातीलशेती #सेंद्रियपावसाळाभाजीपाला #पावसाळीबागेचेटिप्स #भाजीपाल्याचेबागकाम #पावसाळीशेती #पावसाळ्यातीलभाजीपाला #भाजीपालावाढवा #पावसाळ्यातीललागवड #पावसाळ्याच्या बागकाम #सेंद्रियशेती #बागकामटिप्स #हंगामीभाजीपाला पावसाळ्यात भाजीपाल्याची लागवड, पावसाळ्यात भाजीपाला कसा वाढवावा, पावसाळ्यात भाजीपाल्याची लागवड टिप्स, पावसाळ्यात वाढवण्यास योग्य भाजीपाला, पावसाळ्यात भाजीपाल्याचे बागकाम, पावसाळ्यातील सेंद्रिय भाजीपाला, हंगामी भाजीपाल्याची लागवड, पावसाळ्यातील बागेची काळजी, पावसाळ्यात भाजीपाल्याची लागवड, बागकाम मार्गदर्शक, पावसाळ्यात भाजीपाल्याचे बागकाम टिप्स, पावसाळ्यातील भाजीपाल्याची लागवड पद्धती, पावसाळ्यातील बागकाम मार्गदर्शन, पावसाळ्यात भाजीपाला कसा लावावा, पावसाळ्यातील हंगामी भाजीपाला, पावसाळ्यातील सेंद्रिय शेती.

Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.

You must be logged in to post a comment.