गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र
30 | Updated: 11 Feb 2019, 04:00 AM
म टा प्रतिनिधी, नाशिकनिसर्गात हवामानाशी जुळवून घेण्याची शक्ती असते…
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
निसर्गात हवामानाशी जुळवून घेण्याची शक्ती असते. त्यामुळे बागेचे योग्य तंत्र वापरल्यास बारमाही टवटवीत राहतील अशी झाडे फुलवता येतात. कोणत्याही जागी या तंत्राच्या आधारे बाग साकारता येत असल्याने, घराच्या मोकळ्या जागेत भाजी, फळे आणि फुले लावता येतात, यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबी ‘मटा कल्चर क्लब’च्या सदस्यांना रविवारी समजल्या. निमित्त होते, ‘गच्चीवरची बाग’ कार्यशाळेचे.
बागकामाची आवड असलेल्या आणि विशेषत: घरच्या घरी भाजीपाला पिकवू इच्छिणाऱ्या अनेकांनी यात सहभाग घेतला. ‘गच्चीवरची बाग’चे संदीप चव्हाण यांनी बाग फुलविण्याचे तंत्र यावेळी सांगितले. ते म्हणाले, मोकळ्या जागेत बाग फुलवताना काळी, लाल आणि खतमिश्रीत माती कुंडीत भरावी. कंपोस्ट वापरल्यास बहर लवकर आणि उत्तम येतो. कुंडी फक्त २ ते ४ इंच भरावी. त्याचप्रमाणे झाडांना रोज पाणी घालताना त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांना हळुवार हाताळावे. झाडांची माती महिन्यातून एकदा भुसभुशीत करीत खतपाणी केल्यास झाडांची वाढ लवकर व योग्य होते, असे त्यांनी स्पष्ट केले. चव्हाण यांनी उपस्थितांना घरच्या बागेत झाडे लावण्याचे, खतपाणी करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. उपस्थितांनीही बागकामासंदर्भातील शंकांचे निसरन करुन घेतले.
\Bकीड पडल्यास हे करा
\B- तुम्ही फुलविलेल्या बागेत कदाचित झाडांवर कीड पडू शकते, तेव्हा घाबरुन जाऊ नये, तोदेखील निसर्गाचा एक भाग आहे.
– कीड पडलेल्या ठिकाणी गोमूत्र व पाण्याचे एकत्रित मिश्रण शिंपडावे.
– लसूण मिरचीची चटणी, त्यात तंबाखू व पाणी टाकून हे मिश्रण रात्रभर भिजवावे. त्यानंतर हे मिश्रण झाडांवर फवारावे.
– ताक पाणी, हिंग पाणी, आलं पाणी यांचीदेखील फवारणी करता येईल.
– फवारणी फक्त सायंकाळी ४ किंवा ६ नंतरच करावी.
http://www.gacchivarchibaug.in
9850569644
आणखी वाचा…
Not Only Consultancy …Much more
गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…
पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?
बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…
कार्यशाळेनंतर स्टाॅलवर मिळणार्या गोष्टी…
गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा
Comments are closed.