5 Steps Drip Education Model

87 / 100 SEO Score

Drip Education Model for Gardening

Drip Gardening Education Model ने बाग समृद्ध करा!

बागकाम शिकण्यातील Drip Education चे महत्त्व

Drip Education Model म्हणजे टप्प्याटप्प्याने कोणतीही अवघड गोष्ट शिकण्याची पध्दत होय. ही पध्दत जर बागकाम शिकतांना वापरली तर आश्चर्यकारक परिणाम समोर येतात. एका दमात न शिकता हळूहळू शिकल्यास बागकाम हे शिकताही येत व त्यात खर्या अर्थाने माहिर होता येते. किंबहूना अधिक यशस्वी होता येते . “बागकाम शिकण्यातील Drip Education Model चे महत्त्व” या लेखात दिले आहे. आपण बागकाम करताना एकदम सर्व काही शिकण्याच्या गोंधळापेक्षा टप्प्याटप्प्याने आणि सातत्याने शिकण्याच्या महत्त्वावर चर्चा करतो. Drip Education Model ही पद्धत कमी वेळात, कमी मेहनतीत आणि जास्त प्रभावीरीत्या बागकाम शिकण्यास मदत करते. वेगाने व कमी वेळात अधिक शिकण्याचा प्रयत्न केल्यास चुका जास्त होतात, पण हळूहळू शिकल्यास बाग अधिक जोमाने वाढते.संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक

Drip Education Model

1. एकाच वेळी सगळं शिकणं कठीण आहे!

विषय सोपा वाटतो. चुटकी सरशी त्याच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील असे वाटते. पण खोलात शिरलं की कळतं “अरे यात तर खूप शिकावं लागणार आहे!” विषय एकतर अवघड वाटायला लागतो किंवा तो सोडून द्यावा लागतो. हे कोणत्याही शिक्षणाविषयी आपण सहजपणे म्हणत असतो. तसेच बागकाम शिकायचं म्हटलं की बहुतेक लोक उत्साहात भरभरून माहिती गोळा करतात. खत, पाणी, बिया, सूर्यप्रकाश, औषधे, आणि अजून बरेच काही. पण एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी शिकण्याचा प्रयत्न केला, तर आपण भरकटतो. त्यातला उत्साह निघून जातो. एका वेळेला खूप माहिती घेतल्याने गोंधळ, चुका आणि कंटाळा वाढतो. बऱ्याच जणांना वाटतं, “हे खूप अवघड आहे!” आणि नंतर ते बागकाम सोडून देतात. याची मुख्य तिन कारणे आहेत. 1. गडबडीत शिकणं, 2. स्वतःच शिकण्याचा प्रयत्न करणे 3. व मार्गदर्शनाचा अभाव. या मुळे चुकीची झाडं, चुकीची काळजी आणि योग्य नियोजनाचा अभाव यामुळे बागकामात अपयश येते. याच कारणामुळे Drip Education Model म्हणजे टप्प्याटप्प्याने शिकण्याची पध्दत गरजेची आहे! जे संदीप चव्हाण हे सुंदर व नियोजन पध्दतीने शिकवत असतात.

2. Drip Education Model म्हणजे काय?

Drip Education Model ही संकल्पना समजून घेण्याआधी या शब्दांची फोड समजून घेतली पाहिजे. Drip म्हणजे Drop By Drop.. थेंबें थेंबें तळे साचे या प्रमाणे पाणी जसं संचयित होते. माती भिजत जाते. पाण्याचा एकही थेंब वाया जात नाही. तसेच Education आहे. ज्ञान व माहितीचं सुध्दा ठिबक सिंचन पद्धतीसारखं Drip Education म्हणजे हळूहळू, छोटे छोटे धडे शिकणं. एखादी गोष्ट पूर्ण समजून घेईपर्यंत तीच शिकणं. एका वेळेस एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. लहान स्टेप्समधून मोठ्या यशाकडे जाणे! बागकाम करताना Drip Learning म्हणजे सर्व काही कंट्रोल मधे ठेवून त्याचं निटसं व्यवस्थापन करणं होय. थोडक्यात Drip Education Model हे आता बागप्रेमीनां आवडू लागले आहे.

3. बागकाम शिकण्याचा योग्य टप्प्याटप्प्याचा प्लॅन

तुमच्या गार्डनसाठी योग्य शिकण्याची पद्धत कोणती? तर बागकामाच्या मूलभूत गोष्टी समजून घ्या, हा पाया 22+ इको सिस्टिम्स व्दारे शिकता येईल. बागकामाची मूलभूत तत्वं शिका. माती आणि खत यांचा अभ्यास करा . कोणत्या प्रकारच्या माती आणि खतात झाडं चांगली वाढतात? योग्य झाडांची निवड करा . आपल्या जागेनुसार योग्य पिकं निवडा. पाणी व्यवस्थापन शिका – झाडांसाठी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पाणी कसं द्यायचं? किड-नियंत्रण आणि निगा , सेंद्रिय पद्धतीने कीटक आणि रोगांपासून बचाव कसा करायचा? अशा बर्याच गोष्टी तर आहेच. हे सर्व शिकण्यासाठी सुध्दा शिकण्याची एक इकोसिस्टिम्स असते. ति अवगत करा. म्हणूनच Drip Education Model येथे बागकाम शिकायला तुम्हाला उपयोगी ठरणार आहे.

4. Drip Education Model चे फायदे

Drip Education Model अंतर्गत बाग शिकण्यात कुठेही गोंधळ नाही! एकाच वेळी भरपूर शिकण्याचा तिळमात्र ताण नाही. सहज सोप्या पद्धतीने समजते! प्रत्येक गोष्ट स्पष्ट आणि अंमलबजावणीसाठी सोपी होते. शिकून विसरण्याचा धोका नाही! सातत्याने थोडं थोडं शिकल्याने माहिती पक्की होते. शिकलेलं लगेच वापरता येतं! एकाच वेळेस एकच मुद्दा शिकायचं आणि त्वरित वापरायचं. तसेच काही शंका असल्यास त्या लगेच मार्गदर्शकास विचारू शकता.

5. बागकाम शिकण्यात Drip Education Model कसं लागू कराल?

  • आठवड्याला दोनदा सखोल विषयावरील 22+ इकोसिस्टिम्स व प्लॅन्ट विषयी ऑनलाईन मार्गदर्शन मिळवा.
  • दिवसाला फक्त 10 मिनिटं बागकाम विषयीचे रेकॉर्डेड सेशन्स व्दारे माहिती शिका.
  • एकावेळी एका टॉपिकवर लक्ष द्या. . प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष गार्डनमध्ये लागू करा. प्रत्यक्ष अमलात आणा!
  • काही अडचण संदीप चव्हाण यांच्याशी थेट संपर्क साधा व मार्गदर्शन मिळवा.

निष्कर्ष

तुमच्या बागेतील झाडांना जसं हळूहळू पाणी पुरवणं गरजेचं असतं, तसंच बागकाम शिकताना Drip Education Model पद्धती वापरणं आवश्यक आहे. ही पद्धत तुमचं गार्डन अधिक सुंदर, सेंद्रिय आणि जोमदार बनवण्यासाठी मदत करेल!

8. बागकाम विषयावरील लेखः

टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डेन, हॅंगीग गार्डन, इंडोअर गार्डेन फार्महाऊस डेव्हलपमेंट, फ्लॉवर गार्डेनिंग, व्हेजेटेबल गार्डेन

Drip Gardening Education, Stepwise Gardening, Organic Gardening, Smart Gardening, गार्डन शिकणे, ऑरगॅनिक गार्डन, बागकाम शिकण्याचे टप्पे, Gardening Step by Step, Gardening Course, #OrganicGardening, #DripEducation, #GardenLearning, #बागकामशिका, #शिकण्याचेयोग्य_तंत्र, #LearnGardening, #GardeningSkills, #TerraceGardening


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Thank You For Your Valuable Commnets

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants