Monsoon Garden ची तयारी करताय? मग वाचाच..
पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव! या ऋतूमध्ये माती ओलसर असते, हवामान उबदार असतं आणि बियांसाठी रुजण्याची सर्वोत्तम वेळ असते. पण जर तुम्ही वेळेत तयारी केली नाही, तर अनेक चांगल्या बिया आउट ऑफ स्टॉक होतात, आणि बाग फुलवण्याची संधी निसटते. खरेदी केलेल्या बिजावर बिज संस्कार महत्वाचे असतात. म्हणूनच, वेळेआधीच अर्थात Monsoon Garden साठी योग्य बिया खरेदी करणं महत्त्वाचं आहे. त्या योग्य ठिकाणाहून घेणं गरजेचं आहे. – संदीप चव्हाण. ग्रो ऑरगॅनिक, नाशिक.

Table of Contents
1: का करावी पावसाळ्याआधी बियांची खरेदी?
- वेळेत लागवड करता येते- ऐनवेळस धावपळ होत नाही. घरपोहोच बियाणं येत असले तरी त्यात उशीर होतो.
- भाजीपाला लवकर मिळतो- पावसाळा Monsoon Garden सुरूवातीला मातीत वाफसा असतो. तेव्हाच बियाणं रूजवल्यास भाजीपाला लवकर मिळतो.
- निसर्गाशी जुळवून घेतलेली बागकाम, शेती अधिक उत्पादन देते- पावसाळ्यात योग्य वातारवण असते. त्यामुळे निसर्गाशी जुळवून घेतल्याने बाग फूलवतांना अधिक मेहनत, श्रम घ्यावे लागत नाही.
- वेळेत खरेदी केल्यास चांगल्या दर्जाच्या बिया सहज उपलब्ध होतात. या काळात बि बियाणांची सर्वत्र मागणी वाढते. त्यामुळे पुरवठा कमी पडण्याची शक्यता असते.
2: बिया खरेदी करताना लक्षात ठेवायच्या ५ टिप्स
१. हंगामानुसार योग्य बिया निवडा
- पावसाळ्यातील Monsoon Garden भाजीपाला: मेथी, पालक, भेंडी, दोडका, कारली, तुर, माठ, शेपू अशी अनेक प्रकारची खरेदी करून ठेवा. हे बियाणं पावसाळाच्या पहिल्या आठवड्यात सहजतेने उगवून येतात. त्यानंतर वातावरण गार झाल्यावर काही विशिष्ट बियाणंच उगवून येतात.
- उन्हाळी व पावसाळी बियाणं अशी वर्गावारी असते. त्यामुळे मोसमनुसार चांगले उगम घेणाऱ्या जाती निवडा
२. F1 Hybrid की Desi Seeds?
- हायब्रीड बिया उत्पादनासाठी चांगल्या, पण पुन्हा वापरता येत नाही
- देशी बिया नैसर्गिक आणि सेंद्रिय बागेसाठी योग्य, पुन्हा वापरता येतात पण शहरी वातावरणात ज्यास्त पोल्युशनमुळे त्याचे जर्मिनिशेन होत नाही.
३. बियांचा expiry date आणि germination rate तपासा
- पॅकिंग डेट आणि अंकुरणशक्ती % (germination rate) पाहा
- शक्यतो 80% पेक्षा जास्त अंकुरणशक्ती असलेलेच बियाणं निवडा
४. पॅकेजिंग आणि प्रमाण
- बियांचे प्रमाण (gm/mg) आपल्या जागेनुसार ठरवा
- घरगुती बागेसाठी कमी पॅकेज पुरेसे असते
५. ऑनलाइन खरेदी करताना विश्वासार्ह वेबसाइट वापरा
फेक आणि निकृष्ट दर्जाच्या बियांचं नुकसान टाळण्यासाठी, खाली दिलेल्या विश्वसनीय लिंकवरूनच खरेदी करा

3: मी स्वतः कुठून बिया खरेदी करतो? (स्वतःचा अनुभव)
मी गेल्या काही वर्षांपासून खालील वेबसाइट/प्लॅटफॉर्मवरून बिया घेतो आणि त्याचा अनुभव अतिशय सकारात्मक आहे. अंकुरण चांगले झाले, पिक चांगले आले आणि खर्चसुद्धा योग्य झाला. तुमच्यासाठी खास विश्वासार्ह ऑनलाइन बिया खरेदी लिंक्स खाली दिल्या आहेत:
✅ Bhajipala Bia – Link 1
✅ Desi Hybrid Combo Pack – Link 2
✅ Monsoon Season Seed Kit – Link 3
4: पुढची पावले – बिया घेतल्यानंतर काय करावे?
- बिया कोरड्या व थंड ठिकाणी साठवा
- लागवडीसाठी कुंडी, बॅग्ज्स भरून ठेवा.
- लागवड वेळापत्रक ठरवा (कधी कोणती भाजी लावायची) येथे तज्ञांचा सल्ला घ्या.
- ज्यांना लागवड कशी करायची याची शंका असेल त्यांच्यासाठी मी लवकरच विशेष मार्गदर्शन घेऊन येणार आहे.
5: शेवटचा विचार – ही वेळ सोडू नका!
पावसाळा लगेचच सुरु होईल, आणि त्याआधी काही निर्णय घ्या – कारण या छोट्याशा निर्णयामुळे तुमच्या घरातल्या गच्चीवर भाजीपाल्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकतं. आजच बिया खरेदी करा आणि तुमच्या गार्डनचा पहिला पाऊस वेलांटीसारखा सजवा!
6: हे ही साहित्य तुम्ही खरेदी करायचं का?
7: ऑनलाईन गार्डेनिंग कोर्सेस
टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स , फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स
8: बियाणं लागवडीसाठी स्पेशल पर्सनल Monsoon Garden कंन्सलटेशन साठी येथे क्लिक करा.
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.